Bihar Political Crisis : नितीशकुमारांची शॉक ट्रीटमेंट, राजकीय कोलांटउड्यांचा इतिहास काय?; जाणून घ्या एका क्लिकवर

Bihar Political Crisis : आरजेडी आणि जेडीयूचं सरकार राज्यात 20 महिने चांगलं चाललं. मात्र 2017मध्ये दोन्ही पक्षात पुन्हा वाद सुरू झाले. एप्रिल 2017मध्ये हा वाद अधिकच पेटला. त्यानंतर नितीश कुमार यांनी अत्यंत खुबीने मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. कारण विधानसभेत भाजप हा सर्वात मोठा पक्ष होता.

Bihar Political Crisis : नितीशकुमारांची शॉक ट्रीटमेंट, राजकीय कोलांटउड्यांचा इतिहास काय?; जाणून घ्या एका क्लिकवर
नितीशकुमारांची शॉक ट्रीटमेंट, राजकीय कोलांटउड्यांचा इतिहास काय?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 10, 2022 | 8:21 AM

पाटणा: जेडीयूचे नेते नितीश कुमार (nitish kumar) यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन भाजपशी (bjp) फारकत घेतली आहे. नितीश कुमार यांच्या या धक्कातंत्रामुळे भाजपला जोर का झटका लागला आहे. नितीश कुमार केवळ भाजपशी फारकत घेऊन थांबले नाहीत तर त्यांनी थेट आरजेडी (rjd), काँग्रेस आणि डाव्या पक्षांशी आघाडी केली आहे. तिन्ही पक्षांना घेऊन नितीश कुमार राज्यात सरकार स्थापन करणार आहेत. त्यामुळे पुढचे अडीच वर्ष भाजपला विरोधात बसावं लागणार आहे. नितीश कुमार यांनी यापूर्वीही अनेक पक्षांना अशी राजकीय शॉक ट्रीटमेंट दिली आहे. राजकीय कोलांट उड्या मारण्याचा नितीश कुमार यांचा इतिहास जुनाच आहे. विशेष म्हणजे त्यांचा हा इतिहास माहीत असूनही अनेक राजकीय पक्ष त्यांच्याशी आघाडी करण्यास नेहमीच इच्छूक असतात. त्याला कारण म्हणजे नितीश कुमारांकडील संख्याबळ आणि त्यांची स्वच्छ प्रतिमा. त्यामुळे बिहारमधील कोणताही राजकीय पक्ष त्यांच्या जाळ्यात आपसूक ओढला जातो.

नितीश कुमारांचं धक्कातंत्र कधी कधी

  1. 1994मध्ये नितीश कुमार यांनी आपले जुने मित्र लालूप्रसाद यादव यांची साथ सोडून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. जनता दलमधून बाहेर पडून नितीश कुमार यांनी जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबत समता पार्टीची स्थापना केली होती. 1995मध्ये त्यांनी लालूप्रसाद यादव यांच्या विरोधात आपला पक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरवला होता. मात्र, त्यात त्यांना मोठा पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर ते मित्र पक्षाच्या शोधात होते.
  2. त्यावेळी भाजपचं बिहारमधील अस्तित्व नगण्य होतं. मात्र, लालूप्रसाद यादव यांना टक्कर देण्यासाठी नितीश कुमार यांनी 1996मध्ये भाजपशी हातमिळवणी केली. भाजप आणि समता पार्टीची युती 17 वर्ष चालली. 2003मध्ये समता पार्टीचं रुपांतर जनतादल युनायटेडमध्ये झालं. मात्र, तरीही जेडीयूने भाजपची साथ सोडली नाही. विशेष म्हणजे 2005च्या विधानसभा निवडणुकीत या युतीला मोठं यश मिळालं. 2013मध्ये तर या युतीने राज्यात सरकारही स्थापन केलं.
  3. हे सुद्धा वाचा
  4. 2013मध्ये भाजपने 2014च्या लोकसभा निवडणुकीसाठी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाचा उमदेवार म्हणून घोषित केलं. नितीश कुमारांना ते आवडलंन नाही. त्यामुळे त्यांनी भाजपसोबतचा 17 वर्षाचा घरोबा संपुष्टात आणला. मोदी आणि नितीश कुमार यांचे जुने वैचारिक मतभेद आहेत. त्यानंतर नितीश कुमार यांनी आरजेडीशी युती केली. मात्र, लोकसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या पार्टीचा मोठा पराभव झाला. त्यानंतर नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी जेडीयूचे दलित नेते जीतन राम मांझी यांना मुख्यमंत्री बनविण्यात आले. त्यांनंतर नितीश कुमार 2015च्या विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागले.
  5. 2014च्या लोकसभा निवडणुकीत प्रचंड पराभव झाल्यानंतर 2015च्या विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांनी लालूप्रसाद यादव आणि काँग्रेसशी हातमिळवणी करून महाआघाडी तयार केली. या निवडणुकीत आरजेडीला जेडीयूपेक्षा अधिक जागा मिळाल्या. त्यानंतरही लालूप्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपद दिलं. आणि आपला मुलगा तेजस्वी यादव यांना उपमुख्यमंत्री आणि दुसरा मुलगा तेजप्रताप यादव यांना आरोग्य मंत्री बनवलं.
  6. आरजेडी आणि जेडीयूचं सरकार राज्यात 20 महिने चांगलं चाललं. मात्र 2017मध्ये दोन्ही पक्षात पुन्हा वाद सुरू झाले. एप्रिल 2017मध्ये हा वाद अधिकच पेटला. त्यानंतर नितीश कुमार यांनी अत्यंत खुबीने मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. कारण विधानसभेत भाजप हा सर्वात मोठा पक्ष होता. त्यामुळे भाजपने मध्यावधी निवडणुका घेण्यास नकार देऊन नितीश कुमार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनले. विशेष म्हणजे हे सत्तांतर नाट्य अवघ्या 15 तासात घडलं होतं.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.