Madhu Dandavate | कपडे धुवत होते, अचानक निरोप आला, ‘कपडे कसले धुताय, तुम्हाला मंत्रिपदाची शपथ घ्यायचीय!’

Madhu Dandavate : जनता दलाचे आघाडीचे नेते असलेल्या मधू दंडवते यांचा राजकारणात येण्याचा प्रवास, त्याचे राजकीय निर्णय आणि राजकीय किस्से हे आजही यादगार आहेत

Madhu Dandavate | कपडे धुवत होते, अचानक निरोप आला, 'कपडे कसले धुताय, तुम्हाला मंत्रिपदाची शपथ घ्यायचीय!'
मधु दंडवते, Photo Source - Google Images
Follow us
| Updated on: Jan 21, 2022 | 8:00 AM

मधु दंडवते! हे भारतीय राजकारणाच्या इतिहासातलं एक महत्त्वाचं आणि मोठं नाव आहे. कोकण रेल्वेचे शिल्पकार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, त्या मधू दंडवते यांचा जन्म 21 जानेवारी 1924 रोजी झाला होता. जनता दलाचे आघाडीचे नेते असलेल्या मधू दंडवते यांचा राजकारणात येण्याचा प्रवास, त्याचे राजकीय निर्णय आणि राजकीय किस्से हे आजही यादगार आहेत. रेल्वेमंत्री ते अर्थमंत्री, अशा दोन्ही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या मधू दंडवते यांच्याकडे एक प्रेरणादायी नेतृत्व म्हणून पाहिलं जातं. मूळचे पश्चिम महाराष्ट्रातल्या अहमदगरचे असलेले मधू दंडवते (Madhu Dandavate) हे आजही कोकणातल्या गावागावात, घराघरात चर्चिले जातात. आधी प्राध्यापक असणाऱ्या मधु दंडवते यांनी आपल्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेत. क्रिकेटर बनण्यासाठी मधु दंडवते यांच्या वडिलांनी त्यांना मुंबईत पाठवलं खरं. तर अभ्यासही हुशार असणाऱ्या मधु दंडवते यांनी क्रिकेटसोबत राजकारणही जोरदार फटकेबाजी करत आपल्या टायमिंगची चुणूक विरोधकांना दाखवून दिली होती.

मंत्रिपदाची शपथ घेण्याआधी कपडे धुवत होते!

सामाजिक कार्यकर्ते मंजू मोहन यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा मंत्रिपदासाठी इतर मंत्री लॉबिंग करत होते, तेव्हा मधु दंडवते हे कपडे धुण्यात व्यस्त होते. दंडवते तेव्हा व्हीपी हाऊसच्या 403 नंबर रुममध्ये राहत होते. एक दिवस त्यांच्या घरी एक आईएस अधिकारी आणि नेते दाखल झाले. एक बातमी घेऊन अधिकारी आणि नेते मंडळी मधु दंडवते यांच्या रुमवर पोहोचले होते. दरवाजा उघडणाऱ्या कार्यकर्त्याला अधिकारी आणि नेते मंडळींनी मधु दंडवते कुठे आहेत, अशी विचारणा केली. तेव्हा कार्यकर्त्यानं मधु दंडवते हे तर बाथरुमध्ये आहेत. बाथरुमच्या दिशेनं पाहिलं तर बाथरुमचा दरवाजा उघडाच होता आणि दरवाजातून कपडे धुण्याचा आवाज येत होते. मधु दंडवते आपले कुर्ते हातानं धुवत होते. कुणीतरी आल्याचं ऐकून, अर्धओल्या कपड्यातच ते बाहेर आले आणि सांगू लागले, निवडणुकीच्या धामधुमीत सगळेच कपडे खराब झाले होते. धुवायला वेळच मिळाला नव्हता. म्हणून आता कपडे धुवायाला बसलोय.

त्यावेळी कपडे धुवत असलेल्या मधु दंडवते यांना कुठे माहीत होतं की थोड्या वेळानं आपल्याला मंत्रिपदाची शपथ घ्यायची आहे? ते आपल्याच कामाच्या विचारात होते. बाथरुममधून बाहेर आलेल्या मधु दंडवतें कपडे धूत आहेत हे कळल्यानंतर अधिकारी आणि नेते मंडळीही चकीतच झाली होती. संधी मिळाली म्हणून कपडे धुवायला बसलेल्या मधु दंडवते यांना उद्देशून मंत्रिपदाचं आमंत्रण घेऊन आलेल्या मंडळींनी त्यांनी अखेर गूडन्यूज दिली. संधी मिळाली आहे, पण कपडे धुण्याची नाही, तर मंत्रिपदाची शपथ घेण्याची, असं म्हणत त्यांच्यापर्यंत कपडे धुण्याचं काम थांबवून सरकारच्या शपथविधी सोहळ्याला हजर राहायचं आहे, असं सांगितलं. मोरारई देसाई यांच्या मंत्रिमंडळात मधु दंडवते रेल्वे मंत्री बनले. त्यानंतर त्यांनी कोकण रेल्वेच्या कामाचं स्वप्न नुसतं पाहिलं नाही, तर सत्यातही उतरवलं.

तोच रेल्वेमंत्री ज्यानं रेल्वेडब्यात लाकडावर गादी बसवली

मधु दंडवते रेल्वेमंत्री झाल्यानंतर त्यांनी अनेक धडाडीचे निर्णय घेतले. रेल्वेच्या तिकिटासाठी कुणी आपला वशिला लावत असेल, ओळख सांगत असेल, तर आपलं अशा माणसांची मागणी सगळ्यात आधी फेटाळा, असा निर्णयही त्यांनी आपल्या सगळ्या टीमला जारी केला होता. इतकंच काय तर मधु दंडवते हे त्यांच्या एका ऐतिहासिक निर्णयासाठीही ओळखले जातात. त्या काळात रेल्वेल सेकंड स्लिपर क्लासमध्येही लाकडाचीच बाकडी असायची. या बाकड्यांवर गादी बसवण्याचा निर्णय प्रोफेसर असलेल्या मधु दंडवते यांनी घेतला.

राजकीय कामगिरी

1971 ते 1990 इतका प्रदीर्घ काळ कोकणातल्या राजापूर लोकसभा मतदारसंघातून खासदार

विनोदी आणि उपहासात्मक विधान करणारे संसदपटू म्हणून त्यांची ओळख

1978 साली मोरारजी देसाई यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात रेल्वेमंत्रीपद भूषवलं

1989 साली व्हि.पी. सिंह सरकारमध्ये अर्थमंत्री

देवगौडा पंतप्रधान असताना नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष

जेजेमध्ये देदहान

मधू दंडवते यांचं निधन झालं, तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रा हळहळला होता. पण सर्वात जास्त दुःख हे कोकणाला झालं होतं. कोकणातल्या लोकांचा अशक्यप्राय समजला जाणारा कोकण रेल्वेचा प्रवास मधु दंडवते यांच्या दूरदृष्टीनं शक्य करुन दाखवला होता. 12 नोव्हेंबर 2005 साली त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले नव्हते. मधु दंडवते यांनी दहनाऐवजी आपला देहदान करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार त्यांचा देह हा मुंबईतील जे जे रुग्णालयत दान करण्यात आला होता.

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.