आम्हीच बाबा सिद्दीकींना मारलं… बिश्नोई गँगने जबाबदारी स्वीकारली; पोस्टमध्ये मोठे खुलासे

Baba Siddique Death: बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या, बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतल्याची माहिती समोर येत आहे. सर्वत्र खळबळ...

आम्हीच बाबा सिद्दीकींना मारलं... बिश्नोई गँगने जबाबदारी स्वीकारली; पोस्टमध्ये मोठे खुलासे
Follow us
| Updated on: Oct 13, 2024 | 1:02 PM

बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतल्याची माहिती समोर येत आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट करत बिश्नोऊ गँगने हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. दाऊदचे निकटवर्तीय असल्याने हत्या केल्याचा उल्लेख पोस्टमध्ये करण्यात आला आहे. या पोस्टमध्ये बिश्नोई गँगकडून दावा करण्यात आली आहे की, त्यांना सलमान खानसोबत कोणतंही युद्ध नको होतं, परंतु बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचं कारण त्यांचे दाऊद इब्राहिम आणि अनुज थापन यांच्याशी संबंध होते.

बिश्नोई गँगकडून एक फेसबूक पोस्ट करण्यात आली आहे. ‘ओम् जय श्री राम, जय भारत… जीवनाचं मुल्य मला माहिती आहे… मी शरीर आणि पैसा धूळ मानतो. मी पाळलेलं ते सत्कर्म होतं, ते मैत्रीचं कर्तव्य होतं.’ अशी पोस्टची सुरवात करण्यात आली.

बिश्नोई गँगने पुढे पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ‘सलमान खान आम्हाला हे युद्ध नको होतं. पण तू आमच्या भाईचं आज नुकसान केलं आहे. आज जे बाबा सिद्दीकींच्या प्रामाणिकपणाचं गुणगान गात आहेत एकेकाळी दाऊद मकोका प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात होते. सिद्दीकीयांच्या मृत्यूचं कारण म्हणजे अनुज थापन आणि दाऊदला बॉलिवूड, राजकारण, प्रॉपर्टी डीलिंगशी जोडणं…

‘आमचं कोणासोबत देखील शत्रुत्व नाही. पण जो सलमान खान आणि दाऊद गँगची मदत करेल. त्यांनी यापुढे सावध राहा… आमच्या कोणत्याही भावाच्या जीवाला धोका झाल्यास आम्ही प्रतिक्रिया नक्की देऊ.. पहिला वार आम्ही कधीच केला नाही…जय श्री राम जय भारत…’ असं देखील पोस्टमध्ये लिहिण्यात आलं आहे.

दरम्यान, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खान याच्या जीवाला देखील धोका असल्याचं सांगितलं जात. कारण सिद्दीकी यांच्या हत्येचा संबंध बिश्नोई गँगशी आहे. गुंड बिश्नोई याने सलमान खान याला देखील अनेकदा जीवे मारण्याची धमकी दिली आहे. अभिनेत्याच्या घरावर देखील गोळीबार करण्यात आला. तेव्हा देखील बिश्नोई गँगने गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली होती.

संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.