Breaking : विधान परिषदेसाठी भाजपची उमेदवार यादी जाहीर, चंद्रशेखर बावनकुळे, राजहंस सिंह निवडणुकीच्या रिंगणात

राज्यातील विधान परिषदेच्या पाच जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपने कोल्हापूर, धळे आणि नंदूरबार, नागूप, अकोला-बुलडाणा-वाशिम आणि मुंबईच्या पाच जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना संधी देण्यात आली आहे.

Breaking : विधान परिषदेसाठी भाजपची उमेदवार यादी जाहीर, चंद्रशेखर बावनकुळे, राजहंस सिंह निवडणुकीच्या रिंगणात
चंद्रशेखर बावनकुळे, राजहंस सिंह, अमल महाडिक
Follow us
| Updated on: Nov 19, 2021 | 10:31 PM

मुंबई : राज्यातील विधान परिषदेच्या पाच जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपने कोल्हापूर, धळे आणि नंदूरबार, नागूप, अकोला-बुलडाणा-वाशिम आणि मुंबईच्या पाच जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर अमल महाडिक, अमरीश पटेल, वसंत खंडेलवाल आणि राजहंस सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. (BJP announces list of candidates for Legislative Council)

विधान परिषदेसाठी भाजप उमेदवारांची यादी

कोल्हापूर : अमल महाडिक

धुळे-नंदुरबार : अमरीश पटेल

नागपूर : चंद्रशेखर बावनकुळे

अकोला-बुलडाणा-वाशिम : वसंत खंडेलवाल

मुंबई : राजहंस सिंह

BJP Candidate List

विधान परिषदेसाठी भाजप उमेदवार यादी

नागपुरातून चंद्रशेखर बावनकुळेंना संधी

विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपकडून काही मोठे चेहरे डावलण्यात आले आहेत. त्यात माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचाही पत्ता कट झाला होता. त्यानंतर बावनकुळे नाराज असल्याच्या चर्चा झाल्या. मात्र, बावनकुळे सातत्याने पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात सक्रीय राहिले. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा, वाढीव वील बिल विरोधी आंदोलन, अशा अनेक आंदोलनात बावनकुळेंनी नेतृत्व केलं. त्यानंतर आता नागपूर विधान परिषदेसाठी पक्षाकडून बावनकुळे यांना संधी देण्यात आली आहे.

कोल्हापुरात सतेज पाटील विरुद्ध अमल महाडिक सामना

भाजपकडून अमल महाडिक यांचं नाव निश्चित झालं आहे. सतेज पाटील यांच्या विरोधात भाजपकडून कोण उमेदवार असेल यासंदर्भात चर्चा सुरु होत्या. अखेर अमल महाडिक यांचं नाव भाजपनं निश्चित केलं आहे. 2014 मध्ये कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघात अमल महाडिक विरुद्ध सतेज पाटील अशी लढत झाली होती. अमल महाडिक यांनी त्यावेळी सतेज पाटील यांचा पराभव केला होता. त्यानंतर सतेज पाटील कोल्हापूर स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडून गेले होते.

भाजपकडून अमरिश पटेल विधान परिषदेच्या रिंगणात

विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आता सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षात खलबत्ते सुरू झाली आहेत. भाजपने या ठिकाणी आपला उमेदवारी जाहीर करून सर्वच राजकीय पक्षांच्या कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपाकडून विद्यमान आमदार अमरिशभाई पटेल यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र महाविकास आघाडीकडून अजूनही कोणताही उमेदवार जाहीर केलेला नाही.

इतर बातम्या :

‘निवडणुकीत हरवा, भाजपची जिरवा’, काँग्रेस नेते डॉ. नितीन राऊत यांची मोदींच्या घोषणेवर बोचरी टीका

मोदी सरकारला शेतकऱ्यांवरील अत्याचाराची जबाबदारी टाळता येणार नाही, बाळासाहेब थोरातांचं टीकास्त्र

BJP announces list of candidates for Legislative Council

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.