मीरा-भाईंदर भाजपमधील धुसफूस चव्हाट्यावर, जिल्हाध्यक्षपदी रवी व्यास यांच्या निवडीवरुन भाजपचे 40 नगरसेवक नाराज
मीरा-भाईंदरच्या महापौर जोत्सा हसनाळी यांच्यासह नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानसभेतील विरोधी पक्षनेते चंद्रकांत पाटील आणि कोकण विभागीय प्रभारी रविंद्र चव्हाण यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात रवी व्यास यांच्या निवडीवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आलीय.
मीरा-भाईंदर : मीरा भाईंदर भाजपमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आलाया. भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी रवी व्यास यांनी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. पण व्यास यांच्या नियुक्तीला आता स्थानिक भाजपकडून तीव्र विरोध होत आहे. मीरा-भाईंदरच्या महापौर जोत्सा हसनाळी यांच्यासह नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानसभेतील विरोधी पक्षनेते चंद्रकांत पाटील आणि कोकण विभागीय प्रभारी रविंद्र चव्हाण यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात रवी व्यास यांच्या निवडीवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आलीय. इतकंच नाही तर माजी आमदार नरेंद्र मेहता, महापौर, उपमहापौर आणि अनेक नगरसेवक आज भाजप प्रदेश कार्यालयात वरिष्ठांची भेट घेण्यासाठी पोहोचले. (BJP appoints Ravi Vyas as Mira Bhayander BJP district president)
‘हे आमचं हक्काचं कार्यालय आहे. चंद्रकातदादांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहोत. सर्वांना विश्वासात घेऊन पदाधिकाऱ्यांच्या निवडीचा अधिकार प्रदेशाध्यक्षांना आहे. निरीक्षक म्हणून व्यक्ती पाठवला जातो, पण तसं झालं नाही. ही पद्धत चुकीची आहे, असं आम्हाला वाटलं म्हणून निवेदन देण्यासाठी आलो आहोत’, असं जोत्स्ना हसनाळे यांनी म्हटलंय. जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीचे पक्ष सोळल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आम्हाला नियुक्तीबाबत माहिती मिळाली. येत्या 24 तारखेपर्यंत प्रदेश कार्य समितीच्या बैठकीनंतर काय तो निर्णय होईल. निर्णय मान्य झाला नाही तर आम्ही पुढचा निर्णय घेऊ, असंही हसनाळे यांनी म्हटलंय.
पाटील, फडणविसांना पत्र
मीरा भाईंदरचे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांचं संघटनात्मक काम नसल्यामुळे पक्षाचे नगरसेवक आणि पदाधिकारी वारंवार तक्रार करत होते. त्यामुळे सर्वांच्या सहमतीने नव्या जिल्हाध्यक्षाची निवड केली जाईल असं वरिष्ठांकडून सांगण्यात आलं. मात्र, 21 जून रोज रवी व्यास यांनी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं. या नियुक्तीबाबत पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केली गेली नाही. या नियुक्तीवर पक्षात तीव्र नाराजी आहे. भाजपचे जवळपास 52 नगरसेवक, 10 पैकी 9 मंडळ अध्यक्षांनी व्यास यांच्या निवडीला विरोध दर्शवलाय. अशावेळी पक्षात फूट पडल्यामुळे मोठं नुकसान होण्याची भीती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. याची दखल वरिष्ठ पातळीवर घेतली जावी, अशी विनंती या पत्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
रवी व्यास यांची प्रतिक्रिया काय?
प्रत्येक कुटुंबात नाराजी असते. भाजपही एक परिवार आहे. लोक नाराज असतील तर वरिष्ठांसमोर बसून त्याची शहानिशा केली जाईल. पक्ष जी जबाबदारी देईल ती आपल्याला मान्य असल्याची प्रतिक्रिया भाजपचे मीरा भाईंदर जिल्हाध्यक्ष रवी व्यास यांनी दिली आहे.
‘राज्यात तिसरी लाट अटळ, पण वेळ अनिश्चित; डेल्टा प्लस व्हेरीयंटचा तितकासा धोका नाही’ https://t.co/9lJcPY8UE4 #Coroanvirus #DeltaVariant #Maharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 22, 2021
संबंधित बातम्या :
शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन मीरा भाईंदर पालिकेत आरोप-प्रत्यारोप, शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा
मीरा-भाईंदर महापालिकेच्या महापौर पदासाठी चुरस, भाजपमध्ये गटबाजी
BJP appoints Ravi Vyas as Mira Bhayander BJP district president