भाजपने एक डाव भुताचा टाकला तर महागात पडेल, शेलारांचा संजय राऊतांना इशारा

राज्यपालांनी 12 आमदारांच्या नियुक्त्या रखडवल्याच्या आरोपावर आशिष शेलार यांनी भाष्य केलं.  कोरोनाच्या काळात 12 आमदारांचा विषय कुठून आला? असा प्रश्न त्यांनी विचारला.

भाजपने एक डाव भुताचा टाकला तर महागात पडेल, शेलारांचा संजय राऊतांना इशारा
आशिष शेलार, भाजप
Follow us
| Updated on: May 25, 2021 | 2:03 PM

मुंबई : भाजप नेते आणि माजी मंत्री आशिष शेलार (BJP Ashish Shelar) यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीवर (Maha Vikas Aaghadi) हल्लाबोल केला आहे. राज्यपालांनी 12 आमदारांच्या नियुक्त्या रखडवल्याच्या आरोपावर आशिष शेलार यांनी भाष्य केलं.  कोरोनाच्या काळात 12 आमदारांचा विषय कुठून आला? कोरोनच्या पार्शवभूमीवर कोणत्याही निवडणुकीचं काम केलं तर त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार जबाबदार. आज कोरोनाच्या काळात आणि बालकांच्याही चिंतेच्या काळात यांना 12 आमदारांची आठवण कशी येते? स्वतःचं राजकारण सुरु आहे, अशी टीका शेलारांनी केली. (BJP Ashish Shelar attacks on Maha Vikas Aaghadi shivsena over 12 MLC appointment by Governor Bhagat Singh Koshyari)

भुताचा डाव भारी पडेल

महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून काय भाषा वापरली जात आहे? रोज 12 , 12 ची टिमकी काय लावली आहे? तुमचे 12 वाजले आहेत काय? अशी प्रश्नांची सरबत्ती शेलारांनी केली.

भुताने जर फाईल पळवली असेल तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, भाजप तर काही करत नाही, पण भाजपने एक डाव भुताचा टाकला तर तुम्हाला भारी पडेल हे सुद्धा संजय राऊत यांनी लक्षात ठेवावे, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला.

संजय राऊत यांचं टीकास्त्र 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांच्या पदाला शोभेणारे काम केले पाहिजे. आता त्यांनी विधानपरिषदेतील 12 आमदारांच्या फाईलवर सही केली की आम्ही पेढे वाटू, अशी खोचक प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केली. 12 आमदारांच्या नावाची फाईल भुताने पळवली नसून ती राजभवनातच आहे, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता राज्यपालांनी त्यावर सही करावी, असे संजय राऊत यांनी म्हटले.

12 आमदारांची यादी राजभवनात ‘सुरक्षित’

राज्यपालनियुक्त 12 नामनिर्देशित आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. राज्यपालांना दिलेली 12 आमदारांची यादी भुतांनी पळवली तर नाही ना?, अशी खोचक टिप्पणी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली होती. त्यानंतर आता 12 आमदारांची यादी राजभवनात (RajBhavan) सुरक्षित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

गेल्यावर्षी 6 नोव्हेंबरला महाविकासघाडीतील नवाब मलिक, अमित देशमुख आणि अनिल परब या तीन मंत्र्यांनी राजभवनात जाऊन ही यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केली होती. मात्र, तेव्हापासून राज्यपालांनी आमदारांच्या नियुक्तीबाबत चकार शब्दही काढलेला नाही. या पार्श्वभूमीवर माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्यपाल सचिवालयाकडे 12 आमदारांच्या नावाचा यादी मागितली होती. मात्र, सचिवालयाने अशी यादी उपलब्ध नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे यावरुन राजकारण सुरु झाले होते.

संबंधित बातम्या: 

राज्यपालांनी 12 आमदारांच्या फाईलवर सही केली तर पेढे वाटू, संजय राऊतांचा टोला

संजय राऊतांची राज्यपालांवरील टीका हा पोरखेळ; देवेंद्र फडणवीसांनी फटकारले

राजभवनात भुताटकीचा वावर, एकदा शांतीयज्ञ करून घ्या, शिवसेनेचं टीकास्त्र

सर्जिकल स्ट्राईकही 24 तासात झाला होता, पण राज्यपालांचं संशोधन सुरूच; राऊतांची खोचक टीका

(BJP Ashish Shelar attacks on Maha Vikas Aaghadi shivsena over 12 MLC appointment by Governor Bhagat Singh Koshyari)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.