मुख्यमंत्र्यांचं अज्ञान, अनिल परबांचा दबाव, राणेंच्या अटकेमागची CBI चौकशी करा, Video दाखवून भाजपची मागणी
मंत्री अनिल परब यांनी काल गृहखात्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. तसंच कोर्टाच्या निर्णायाआधी त्यांनी जामीनाचा निवाडा घोषित केला. यातून मुंबई उच्च न्यायालयाची बदानामी आणि अपमान झाला. हे सगळं प्रकरण संशयित आहे. त्यामुळे दबाव टाकणाऱ्या मंत्र्यासह IPS अधिकाऱ्यांची CBI चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन केली.
मुंबई : “केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या अटकेसाठी मंत्री अनिल परब (ADV Anil Parab) यांनी दबाव टाकला. त्यांनी काल गृहखात्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. तसंच कोर्टाच्या निर्णायाआधी त्यांनी जामीनाचा निवाडा घोषित केला. यातून मुंबई उच्च न्यायालयाची बदानामी आणि अपमान झाला. हे सगळं प्रकरण संशयित आहे. त्यामुळे दबाव टाकणाऱ्या मंत्र्यासह IPS अधिकाऱ्यांची CBI चौकशी झाली पाहिजे”, अशी मागणी भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन केली. हे सगळे मुद्दे मांडताना त्यांनी टीव्ही 9 डिजीटलची व्हिडीओ क्लिप दाखवून अनिल परब यांच्यासह सरकारवर हल्लाबोल केला.
आशिष शेलार काय म्हणाले?
“अनिल परब गृहखात्यात हस्तक्षेप करत असल्याबद्दल शरद पवार यांनी एकदा नाराजी व्यक्त केली होती. कालही हेच अधोरेखित झालं आहे. हा मुद्दा गंभीर आहे. कालही हेच अधोरेकित झालंय, अनिल परब यांचा गृह खात्यामधला हस्तक्षेप गंभीर आहे…”
“जी आमची माहिती आहे, ज्यामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज 4 ते साडे चारच्या दरम्यान निकाली निघाला, त्याआधीच मंत्री अनिल परब सांगायातय की नाकारण्यात येणार आहे, याचा अर्थ दलालांमार्फत किंवा या प्रक्रियेमध्ये हस्तेक्षेप करण्याचा मंत्रिमहोदयांना प्रयत्न केलाही शंका दाट आहे. मुंबई उच्च न्यायालयाचा उल्लेख आहे. याचा अर्थ मुंबई उच्च न्यायालयाची बदानामी आणि अपमान करण्याचा हा प्रयत्न आहे”
“या सगळ्या प्रकारामध्ये अंतिमत: आयपीएस अधिकारी केंद्राला जबाबदार असतात. नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत, राज्याचा एक मंत्री आयपीएस अधिकाऱ्यांना केंद्रीय मंत्र्याच्या अटकेसाठी फोन करत होते… कोर्टात त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात येईल, असा निवाडा ते घोषित करत होते. हे सगळं प्रकरण संशयास्पद आहे. याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे”, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली.
मुख्यमंत्र्याचं अज्ञान उघड पडलं, म्हणून हा सगळा थयथयाट
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं जाहीर कार्यक्रमात स्वताचं अज्ञान उघड पडलं. स्वताचं अज्ञान उघड पडलं म्हणून हा सगळा थयथयाट चाललेला आहे. राणेसाहेब याआधीही अनेकदा बोलले आहेत त्यांची बोलण्याची एक शैली आहे. परंतु सेनेने राडा केला. झालेल्या घटनेमुळे आपण देशाची माफी मागणार का?, असा सवाल आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला.
आशिष शेलार यांची पत्रकार परिषद :
शरद पवारांना कानशिलात मारली, तरीही त्यांनी संयम पाळला
शरद पवारांना कानशिलात लावलेली देशाने पाहिली, पण त्यावेळी शरद पवारांनी संयम पाळून त्या व्यक्तीला माफ केलं. पण संयमी माणसासोबत राहूनही शिवसेनेला ते कळत नाही, असा हल्लाबोल आशिष शेलार यांनी केला
नारायण राणे मंत्री झाल्याने उद्धव ठाकरेंच्या पोटात दुखतंय
नारायण राणे मुख्यमंत्री होते त्यावेळीही उद्धव ठाकरेंनी षडयंत्र केलं. सुरेश प्रभूंना केंद्रात मंत्रिपद मिळालं त्यावेळी ठाकरेंनी तेच केलं आणि आता कोकणातील नेत्याला केंद्रात मोठं पद मिळालं म्हणून उद्धव ठाकरेंच्या पोटात दुखत आहे, असा आरोप शेलार यांनी केला.
भाजप युवा मोर्चा मुख्यमंत्र्यांना 75 हजार पत्र पाठवणार
भारताने 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. जो मुख्यमंत्र्यांच्या लक्षात राहिला नाही. त्यासाठी भाजप युवा मोर्चाकडून मुख्यमंत्र्यांना 75 हजार पत्र लिहणार आहे. तसंच फुलांऐवजी आम्ही मुख्यमंत्र्यांना आम्ही काटे पाठवणार आहोत, असंही आशिष शेलार यांनी सांगितलं.
अनिल परब यांचा हाच तो व्हिडीओ :
(BJP Ashish Shelar Demand CBI Inquiry over Minister Anil parad phone Call to IPS Officer )
हे ही वाचा :
शरद पवारांना कानशिलात मारली, तरीही त्यांनी संयम पाळला, राणेंना डिफेंड करण्यासाठी शेलारांकडून दाखला