Rajya Sabha Election 2022: आव्हाड, कांदे, ठाकूर यांचं मत बाद करा, भाजपची थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार, दोन मुख्य मुद्दे समजून घ्या

Rajya Sabha Election 2022: काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी राज्यसभा निवडणुकीत मतदान करताना नियमांचा भंग केला आहे.

Rajya Sabha Election 2022: आव्हाड, कांदे, ठाकूर यांचं मत बाद करा, भाजपची थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार, दोन मुख्य मुद्दे समजून घ्या
आव्हाड, कांदे, ठाकूर यांचं मत बाद करा, भाजपची थेट निवडणूक आयोगाकडे तक्रारImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 7:01 PM

मुंबई: राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान (Rajya Sabha Election) होऊन दोन तास उलटले तरी अजून मतमोजणी सुरू झालेली नाही. भाजपने (bjp) घेतलेल्या आक्षेपामुळे ही मतमोजणी सुरू झालेली नाही. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, काँग्रेस (congress) नेत्या यशोमती ठाकूर आणि आमदार सुहास कांदे यांची मते बाद करण्याची मागणी भाजपने केली आहे. या तिन्ही आमदारांनी नियमांचा भंग केल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. तसेच या तिन्ही नेत्यांचे मते बाद करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे मतदानाच्या मोजणीस विलंब होत आहे. आता या प्रकरणावर निवडणूक आयोग काय निर्णय देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर, दुसरीकडे भाजपच्या शिष्टमंडळानंतर आता काँग्रेसच्या शिष्टमंडळानेही निवडणूक आयोगाची भेट घेण्याचा निर्णय घेतला असून भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांचं मत बाद करण्याची मागणी केली आहे.

काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी राज्यसभा निवडणुकीत मतदान करताना नियमांचा भंग केला आहे. या तिघांनीही आपली मतपत्रिका इतरांना दाखवली आहे. त्यामुळे निवडणूक कार्यपद्धतीचा भंग झाला आहे, असं या लेखी तक्रारीत नमूद केलं आहे.

हे सुद्धा वाचा

रिटर्निंग ऑफिसरचं दुर्लक्ष

2017मध्ये अहमद पटेल प्रकरणानंतर निवडणूक आयोगाने काही नियम घालून दिले होते. त्यानुसार निवडणुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यानंतर त्याचवेळी संबंधित व्यक्तीचं मत रद्द करण्याची तरतूद होती. या तिन्ही प्रकरणात भाजपच्या एजंटने रिटर्निंग ऑफिसरकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, रिटर्निंग ऑफिसरने निवडणूक अधिनियम 1961च्या नियमाकडे दुर्लक्ष करून कोणत्याही तथ्यावर विचार न करता मतदान करण्याची परवानगी दिली होती. त्यामुळेच आम्ही तुमच्याकडे तक्रार दाखल केली आहे, असं या तक्रार अर्जात म्हटलं आहे.

पटेल प्रकरणात काय झालं?

निवडणूक आयोगाने घालून दिलेले नियम आणि पटेल केसचा संदर्भ पाहता आम्ही या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी करत आहोत. तसेच ही मते रद्द करण्याची मागणी करत आहोत. पटेल प्रकरणात 2017मध्ये निवडणूक नियमांचं उल्लंघन करण्यात आलं होतं. त्यावेळी निवडणूक आयोगाने मत रद्द करण्याचे आदेश दिले होते, याकडेही या पत्रात लक्ष वेधण्यात आलं आहे.

हरियाणातील प्रकाराचीही तक्रार

भाजपचे नेते मुख्तार अब्बास नकवी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. 2017 च्या निवडणुकीचा दाखला आम्ही दिला आहे. महाराष्ट्र, हरियाणातील निवडणूक प्रक्रियेबाबतही तक्रार केली आहे. आव्हाड, कांदे, ठाकूर यांची मतं बाद करा, अशी आमची मागणी आहे, असं नकवी यांनी सांगितलं.

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.