Eknath Shinde : सगळ्यात मोठी राजकीय घडामोड! भाजपची एकनाथ शिंदे गटाला मोठी ऑफर? नेमकी किती मंत्रिपदं देणार?

आताच्या घडीची सगळ्यात मोठी राजकीय घडामोड समोर येतेय.

Eknath Shinde : सगळ्यात मोठी राजकीय घडामोड! भाजपची एकनाथ शिंदे गटाला मोठी ऑफर? नेमकी किती मंत्रिपदं देणार?
भाजपची शिंदे गटाला ऑफरImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jun 23, 2022 | 11:41 AM

मुंबई : आताच्या घडीची सगळ्यात मोठी राजकीय घडामोड समोर येतेय. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला भाजपकडून (BJP) मोठी ऑफर देण्यात आली असल्याची चर्चा आहे. राज्यात आठ कॅबिनेट (cabinet) मंत्रिपदं  आणि पाच राज्यमंत्रिपदं शिंदे गटाला देण्याची ऑफर भाजपकडून देण्यात आल्याचं सांगितलं जातंय. याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. या शिवाय केंद्रातही शिंदे गटाला दोन मंत्रिपदं दिलं जातील, असं बोललं जातंय. एकनाथ शिंदे गटाचा विचार केल्यास, शिंदे यांच्याकडे 41 आमदार आणि सहा अपक्ष असे एकूण 47 आमदारांचं संख्याबळ असल्याचं बोललं जातंय. तर एकीकडे भाजपकडून शिंदेंना मंत्रीपदाची ऑफर दिली जातेय. तर दुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक विधान केलंय. हे विधान सध्या चांगलंच चर्चेत आहे.

सत्तेचं गणित –

बंडानंतर एकनाथ शिंदे गट मजबूत!

हे सुद्धा वाचा
  1. एकनाथ शिंदे – 47
  2. भाजप – 106
  3. अपक्ष – 13
  4. एकूण – 166

बंडानंतरची महाविकास आघाडीची अवस्था

  1. शिवसेना – 14
  2. राष्ट्रवादी – 53
  3. काँग्रेस – 44
  4. अपक्ष – 10
  5. एकूण – 121

थोडक्यात पण महत्त्वाचं

  1. शिंदे यांच्यासोबत 41 आमदार
  2. अपक्ष 6 आमदारांचाही शिंदे यांना पाठिंबा
  3. शिवसेना फोडण्यात यश आल्याचं समोर
  4. शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडावी, ही शिंदे गटाची प्रमुख मागणी

शिंदेंकडे पुरेसं संख्याबळ

आशिष जैस्वाल यांच्यासह मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर आणि दीपक केसरकर या सर्व आमदारांसह गुवाहाटी इथं पोहोचलेले आहेत. सकाळी साडे नऊ वाजता ते गुवाहाटी विमानतळावर दाखल झाले. हे सर्व आमदार गेल्या 24 तासांपासून नॉट रिचेबल होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आशिष जैस्वाल गेल्या काही दिवसांपासून नाराज होते. काँग्रेसने नेते टक्केमारी मागत असल्याचा कारणाचा आरोप करत त्यांनी उद्धव ठाकरे यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. मात्र या आरोपांवर कोणतीही कारवाई न झाल्यानं ते नाराज असल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर आता आशिष जैस्वाल हे गुवाहाटीत दाखल झालेत. शिवाय आपल्यासह आणखी तिघा आमदारांनाही आणलंय.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.