Loksabha Election 2019 : भाजपची पहिली यादी जाहीर

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस उरले आहेत. निवडणुकांसाठी आचारसंहिताही लागू करण्यात आली आहे. सर्वच पक्ष उमेदवारांच्या याद्या जाहीर करत आहेत. त्यातच भाजपने (BJP) पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत 182 उमेदवारांचा समावेश आहे. पहिल्या यादीत महाराष्ट्रातील अनेक अपेक्षित मतदारसंघातील उमेदवारांची नावंही जाहीर झाली आहेत. पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव […]

Loksabha Election 2019 : भाजपची पहिली यादी जाहीर
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस उरले आहेत. निवडणुकांसाठी आचारसंहिताही लागू करण्यात आली आहे. सर्वच पक्ष उमेदवारांच्या याद्या जाहीर करत आहेत. त्यातच भाजपने (BJP) पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत 182 उमेदवारांचा समावेश आहे. पहिल्या यादीत महाराष्ट्रातील अनेक अपेक्षित मतदारसंघातील उमेदवारांची नावंही जाहीर झाली आहेत.

पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव आहे. वाराणसीतून नरेंद्र मोदी लढणार आहेत. तर गांधीनगरमधून अमित शाह आणि नागपुरातून नितीन गडकरी लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहे.

महाराष्ट्र

  1. नागपूर – नितीन गडकरी
  2. नंदुरबार – हिना गावित
  3. धुळे – सुभाष भामरे
  4. रावेर – रक्षा खडसे
  5. अकोला – संजय धोत्रे
  6. वर्धा – रामदास तडस
  7. चिमूर-गडचिरोली – अशोक नेते
  8. जालना – रावसाहेब दानवे
  9. भिवंडी – कपिल पाटील
  10. उत्तर मुंबई  – गोपाळ शेट्टी
  11. उत्तर मध्य मुंबई – पूनम महाजन
  12. नगर – सुजय विखे
  13. बीड – डॉ. प्रीतम मुंडे
  14. लातूर – सुधाकरराव श्रंगारे
  15. सांगली – संजयकाका पाटील
  16. चंद्रपूर – हंसराज अहीर

महत्त्वाची नावं :

  • वाराणसी – नरेंद्र मोदी
  • गांधीनगर – अमित शाह
  • लखनौ – राजनाथ
  • बागपत – सत्यपाल सिंग
  • गाझियाबाद – व्ही के सिंग
  • मथुरा – हेमा मालिनी
  • उन्नाव – साक्षी महाराज
  • अमेठी – स्मृती इराणी
  • जयपुर ग्रामीण – राज्यवर्धन सिंह राठोड

निवडणुकीच्या तारखा जाहीर :

केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.

महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.