Lok Sabha Election 2024 | भाजपाची आज 125 उमेदवारांची पहिली यादी येऊ शकते, महाराष्ट्रातून कोणाला संधी?

Lok Sabha Election 2024 | भारतीय जनता पार्टी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी करत आहे. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची गुरुवारी बैठक आहे. बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय निवडणूक समितीचे सर्व सदस्य उपस्थित असतील. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपा आज उमेदवारांची पहिली यादी जाहीर करु शकते.

Lok Sabha Election 2024 | भाजपाची आज 125 उमेदवारांची पहिली यादी येऊ शकते, महाराष्ट्रातून कोणाला संधी?
PM Narendra Modi-Amit Shah
Follow us
| Updated on: Feb 29, 2024 | 10:33 AM

Lok Sabha Election 2024 (संदीप राजगोळकर) | भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत 125 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतं. बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत केंद्रीय निवडणूक समितीचे सर्व सदस्य उपस्थिक राहतील. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपाकडून आज उमेदवारांची पहिली यादी जाहीर होऊ शकते. पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच नाव असू शकतं. त्याशिवाय राज्यसभा खासदार असलेल्या काही मंत्र्यांच नाव असू शकतं. या यादीतून 3 प्रकारच्या उमेदवारांची घोषणा होऊ शकते. एक व्हीआयपी सीट, दुसरे राज्यसभा खासदार आणि भाजपाची शक्ती कमी असलेल्या जागा.

सीईसी बैठकीआधी काल बुधवारी भाजपा अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली 6 राज्यांच्या कोर ग्रुपची बैठक झाली. या बैठकीत उमेदवारांच्या निवडीवर चर्चा झाली. प्रत्येक राज्यातील उमेदवारांच्या नावावर चर्चा झाली. आज संध्याकाळी 7 वाजता भाजपाच्या कोर कमिटीची बैठक होईल. यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि संघटन मंत्री सहभागी होतील. लोकसभा निवडणुकीसाठी काही जागाचे उमेदवार निश्चित होऊ शकतात. कोर कमेटीनंतर लगेचच निवडणूक समितीची बैठक आहे. सध्या सगळ्यांच्या नजरा सीईसीच्या बैठकीवर आहेत. आता CEC च्या बैठकीनंतर काय निर्णय होतो, ते समजेल.

महाराष्ट्रातून कोणाला उमेदवारी?

महाराष्ट्रात भाजपाची मित्र पक्षांसोबत जागा वाटपाची बोलणी अंतिम झालेली नाहीत. त्यामुळे भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश नसणार. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज राजधानी दिल्ली इथं बैठक होत आहे. या बैठकीनंतर भाजप लोकसभा उमेदवाराची पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, या यादीत महाराष्ट्र आणि बिहार लोकसभेच्या जागांचा समावेश नसणार आहे. कारण महाराष्ट्रात अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याशी जागा वाटप अद्यापपर्यंत पूर्ण झालेलं नाही.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.