संजय राऊत हे गडकरींनाच काय, अमेरिका-इंग्लंडच्या अध्यक्षांनाही सल्ला देतात : चंद्रकांत पाटील

संजय राऊत यांच्या आवाहनानंतर भाजप नेते नितीन गडकरी यांचा बेळगाव दौरा रद्द झाल्याची माहिती समोर येत आहे. (Chandrakant Patil Sanjay Raut Nitin Gadkari)

संजय राऊत हे गडकरींनाच काय, अमेरिका-इंग्लंडच्या अध्यक्षांनाही सल्ला देतात : चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील, नितीन गडकरी, संजय राऊत
Follow us
| Updated on: Apr 15, 2021 | 12:39 PM

पंढरपूर : “संजय राऊत अमेरिका आणि इंग्लंडच्या अध्यक्षांनाही सल्ला देऊ शकतात, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनाही देऊ शकतात” अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना कानपिचक्या लगावल्या. बेळगावातील मराठी बांधवांना मदत करता येत नसेल तर किमान मराठी मतदारांमध्ये तोडफोड करु नका, असा सल्ला राऊतांनी गडकरींना दिली होता. (BJP Chandrakant Patil taunts Shivsena MP Sanjay Raut over suggestion to Minister Nitin Gadkari)

“संजय राऊत यांचं कसं आहे, की अमेरिका, इंग्लंड, बेळगांव हे त्यांना माहिती असतं. आम्ही सामान्य माणसं आहोत. संजय राऊत ते कोणालाही सल्ला देऊ शकतात. अमेरिकेच्या, इंग्लंडच्या अध्यक्षांनाही सल्ला देतात, तर ते गडकरींनाही देऊ शकतात” असा टोला चंद्रकांतदादांनी लगावला.

संजय राऊत काय म्हणाले होते?

बेळगावातील लोकसभा पोटनिवडणुकीत मराठी उमेदवाराविरोधात प्रचार करण्याची बेईमानी करु नये, या संजय राऊत यांच्या आवाहनानंतर भाजप नेते नितीन गडकरी यांचा बेळगाव दौरा रद्द झाल्याची माहिती समोर येत आहे. याची अधिकृत घोषणा झाली नसली तरी गडकरींचा दौरा रद्द झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, त्याऐवजी आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी बेळगावात भाजपच्या प्रचारासाठी येणार असल्याची माहिती समोर आहे.

जयंत पाटलांवरही निशाणा

“जयंत पाटील यांचे स्वप्नरंजन आहे. अठरा महिने झाले, ते सांगत आहेत की आमच्याकडून गेलेले परत येणार आहेत, परत येणार आहेत. दिवसा स्वप्नं पाहायला कुणाला अडचण नसते. मात्र भाजप पूर्वीपेक्षाही जबरदस्त होत चाललेली आहे. सामान्य लोकांना माहिती आहे, की कुठल्याही क्षणी सरकार जाऊ शकतं, अशा दिशेने त्यांची वाटचाल सुरु आहे. दिवा विझण्यापूर्वी जास्त मोठा होतो” असं चंद्रकांत पाटील पंढरपुरात बोलत होते. (Chandrakant Patil Sanjay Raut Nitin Gadkari)

“कालचक्र नेहमी फिरत असतं”

आम्ही आणि त्यांनीही अहंकार कधी दाखवू नये. कालचक्र नेहमी फिरत असतं. पंधरा वर्ष त्यांचं सरकार होतं, मग आमचं आलं, पुन्हा त्यांचं आलं, पुन्हा आमचं गेलं, त्यांचं आलं, त्यांना नीट माहिती आहे की सरकार केव्हा जाणार आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढण्याकरता अशी धडपड त्यांना करावी लागते. आम्ही मात्र सातत्याने सरकारच्या विरोधात संघर्ष करतोय. काल दिलेलं पॅकेजही आम्ही वर्षभर पाठी लागल्यावर फुटकं तुटकं दिलेलं आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

संबंधित बातम्या :

बेळगावची मराठी जनता कुणाचं ऐकणार? राऊतांचं की फडणवीसांचं? राऊतानंतर आता फडणवीस दौऱ्यावर

‘भगव्याला हात लावाल तर झेंडा खिशात ठेवून दांडा घालू’, संजय राऊतांचा कन्नडिगांना थेट इशारा

बेळगाव प्रशासनाला संजय राऊतांची धास्ती, स्टेज, साऊंड सिस्टिमची मोडतोड! राऊतांचा कडक शब्दात इशारा

(BJP Chandrakant Patil taunts Shivsena MP Sanjay Raut over suggestion to Minister Nitin Gadkari)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.