भाजपचं ‘मिशन मुंबई महापालिका’, मुंबईत विजयाचा ‘हैदराबाद पॅटर्न?’; जेपी नड्डांच्या तीन दिवस मॅरेथॉन बैठका!

| Updated on: Dec 08, 2020 | 8:27 PM

हैदराबाद महापालिकेत दणदणीत यश मिळविल्यानंतर आता भाजपने मुंबई महापालिकेकडे मोर्चा वळवला आहे. मुंबई महापालिकेतील सत्ता काबीज करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.

भाजपचं मिशन मुंबई महापालिका, मुंबईत विजयाचा हैदराबाद पॅटर्न?; जेपी नड्डांच्या तीन दिवस मॅरेथॉन बैठका!
Follow us on

नागपूर: हैदराबाद महापालिकेत दणदणीत यश मिळविल्यानंतर आता भाजपने मुंबई महापालिकेकडे मोर्चा वळवला आहे. मुंबई महापालिकेतील सत्ता काबीज करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पालिका निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा मुंबईत तीन दिवस तळ ठोकून राहणार आहेत. यावेळी ते मॅरेथॉन बैठका घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. मुंबईतही हैदराबादच्या विजयाचा पॅटर्न लागू करण्याच्या हालचाली भाजपकडून सुरू असल्याचंही सूत्रांनी सांगितलं. (BJP chief JP Nadda will visit mumbai for begins preparations for bmc elections)

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा 18, 19 आणि 20 डिसेंबर रोजी मुंबईत येणार आहेत. तीन दिवस नड्डा हे मुंबईतच तळ ठोकणार आहेत. यावेळी ते महाराष्ट्रासह मुंबईतील भाजपच्या संघटनात्मक स्थितीचा आढावा घेणार आहेत. तसेच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मॅरेथॉन बैठका घेऊन अनेक सूचना करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. यावेळी ते मुंबईतील भाजपचे सर्व नगरसेवक, आमदार आणि खासदारांशीही संवाद साधणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. तसेच भाजपच्या मुंबई कार्यकारिणीने निवडणुकीची काय तयारी केली आहे याचाही आढावा ते घेणार आहेत.

हैदराबादची पुनरावृत्ती होणार?

हैदराबादमध्ये भाजपचे अवघे चार नगरसेवक होते. त्याबळावर भाजपने हैदराबादमध्ये 49 नगरसेवक निवडून आणले. हैदराबादच्या पालिका निवडणुकीत वापरण्यात आलेले प्रचाराचे हातखंडे, उमेदवारांची निवड, स्थानिक पातळीवरील समस्यांवरून उठवलेले रान आणि विभागनिहाय करण्यात आलेली बांधणी आदी गोष्टींचा मुंबई महापालिका निवडणुकीत उपयोग होऊ शकतो का? यावरही ते मुंबईतील नेत्यांशी चर्चा करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. थोडक्यात मुंबईत विजयाचा हैदराबाद पॅटर्न राबवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महापालिकेतील पक्षीय बलाबल

शिवसेना ९४

भाजप ८२

काँग्रेस २९

राष्ट्रवादी ८

समाजवादी पक्ष ६

मनसे १ (BJP chief JP Nadda will visit mumbai for begins preparations for bmc elections)

 

संबंधित बातम्या:

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून आमदार अतुल भातखळकरांची प्रभारीपदी नियुक्ती

मुंबई महापालिकेची रुग्णालये दुर्लक्षित, डायबिटीजचे दररोज 26 बळी, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल

सावधान ! विनामास्क आढळल्यास मुंबई महापालिका पोलिसांच्या मदतीनं कारवाई करणार

(BJP chief JP Nadda will visit mumbai for begins preparations for bmc elections)