‘रडने का नही, भिडने का’, चित्रा वाघ पारनेरच्या महिला तहसिलदारांच्या भेटीला

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आमदार निलेश लंके यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत सुसाईड ऑडिओ क्लिप जारी करणाऱ्या महिला तहसिलदारांची भेट घेतलीय. यावेळी त्यांनी पारनेरच्या तहसिलदार ज्योती देवरे यांना 'रडने का नही, भिडने का' म्हणत पाठिंबा दिला.

'रडने का नही, भिडने का', चित्रा वाघ पारनेरच्या महिला तहसिलदारांच्या भेटीला
Follow us
| Updated on: Aug 26, 2021 | 10:28 AM

अहमदनगर : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आमदार निलेश लंके यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत सुसाईड ऑडिओ क्लिप जारी करणाऱ्या महिला तहसिलदारांची भेट घेतलीय. यावेळी त्यांनी पारनेरच्या तहसिलदार ज्योती देवरे यांना ‘रडने का नही, भिडने का’ म्हणत पाठिंबा दिला. तसेच आम्ही सर्व तहसीलदार देवरे यांच्यासोबत असल्याचंही जाहीर केलं. यामुळे वाघ यांनी लंकेंविरोधात दंड थोपटल्याचं बोललं जातंय.

विशेष म्हणजे आमदार निलेश लंके यांचा नुकताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा फोटो समोर आला होता. त्यावर चित्रा वाघ यांनी सडकून टीका केली होती. त्यांनी ट्विट करत निलेश लंके यांच्यावर हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या, “कमाल आहे. निलेश लंके यांनी आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोटो काढून लगेच भाजपची दोन पावले माघारची बातमी छापून आणली.

“ओ लंके, 2 पावलं माघार नाही, तर 200 पाऊलं पुढे जात ठोकणार”

“ओ लंके, ते आमचे नेते देवेंद्र फडणवीस आहेत. दोन पावले माघार घेतं नाही, तर 200 पाऊलं पुढे जात ठोकणार आहे हे हे ध्यानात ठेवा. आम्ही सगळे ज्योतीताई देवरेच्या मागे सक्षमतेने उभे आहोत,” असं सांगत चित्रा वाघ यांनी निलेश लंके यांना आव्हान दिलं.

“देव माणूस म्हणून मिरवणाऱ्याच्या नाकात महिला सशक्तीकरणावर बाता मारणारे वेसन घालणार का?”

दरम्यान, याआधी देखील चित्रा वाघ यांनी या प्रकरणावरुन निलेश लंके यांच्यावर हल्लाबोल केलाय. ‘सत्तेतले हे बेलगाम घोडे…देवमाणूस म्हणून मिरवणार्या पारनेरच्या या लोकप्रतिनीधीच्या नाकात वेसणं घालायचं काम महिला सशक्तीकरणाच्या बाता मारणार्यांकडून होतयं का तेचं आता पहायचयं’, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.

तिथल्या लोकप्रतिनिधीच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्येचा इशारा दिलाय. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केलेल्या दिपाली चव्हाण यांना उद्देशून त्यांनी एक पत्र लिहिलं आहे आणि त्यांनी म्हटलंय की मी ही तुझ्याकडे लवकरच येतेय. त्यात त्यांनी प्रशासनाकडून कसा छळ होतो, लोकप्रतिनिधी कसे त्रास देतात, वरिष्ठ त्यांना कसे पाठिशी घालतात याचं दाहक वास्तव त्यांनी उभं केलंय. मध्येच त्या हमसून हमसून रडतानाही दिसत आहेत आणि हिच माझी सुसाईड नोट समजा असंही त्यांनी त्या पत्रात म्हटलंय. खरं तर सुसाईड नोटमध्ये सगळ्यांची नावं लिहून ठेवायची आणि कोर्टात ती खोटी ठरली तर? हिरा बनसोडेसारखं फिर्याद कुणाकडे मागायची? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय.

चित्रा वाघ यांच्या संतप्त सवाल

लसीकरण केंद्रात एका आरोग्य कर्मचाऱ्याला लोकप्रतिनिधीकडून मारहाण होते. कारण फक्त एकच की तिथं दुकानदारांचं लसीकरण केलं. तिथे रात्रीच लोकप्रतिनिधी जातात. महिला आरोग्य कर्मचाऱ्याला खोदून-खोदून विचारतात. तिल्या लिपिकाला मारतात. थोड्यावेळाने लिपिकाचा व्हिडीओ येतो की मला काही लोकप्रतिनिधींनी मारलं नाही. महिला अधिकाऱ्यांना किंवा महिलांना कुणी वालीच राहिला नाही. त्यामुळे प्रत्येकीने सुसाईड नोट ही ड्रॉवरमध्ये ठेवा, असंही सांगायला त्या विसरलेल्या नाहीत, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं होतं.

हे सगळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात होत आहे. माँसाहेब जिजाऊंच्या महाराष्ट्रात होत आहे आणि आम्ही सावित्रीच्या लेकी, आमच्यासोबत हे सगळं होतंय. सत्तेच्या या बेलगाम घोड्यांना वेळीच वेसण घालणं गरजेचं आहे. देवमाणूस म्हणून वापरणाऱ्या पारनेरच्या या लोकप्रतिनिधीच्या नाकात महिला सशक्तीकरण आणि सक्षमीकरणाच्या बाता मारणारे कशी वेसण घालतात हेच आता पाहायचं आहे. नाहीतरी या महाराष्ट्रात बाई मेल्याशिवाय, तिने आत्महत्या केल्याशिवाय, तिने जीव दिल्याशिवाय तिच्या म्हणण्याला कुठे किंमत आहे? असा संतप्त सवाल चित्रा वाघ यांनी ट्विटरवरुन उपस्थित केला होता.

हेही वाचा :

पारनेरच्या तहसीलदाराचा ऑडिओ क्लिपद्वारे आत्महत्येचा इशारा, चित्रा वाघ यांचा निलेश लंकेंवर हल्लाबोल

कायदे आणि नियम फक्त भाजपलाच का? नारायण राणेंच्या अटकेवरुन चित्रा वाघ आक्रमक

संजय राठोड यांना शरीरसुख आरोप प्रकरणात क्लीनचीट, पण मधल्या दिवसांत बऱ्याच गोष्टी घडल्या ? चित्रा वाघ म्हणतात…

व्हिडीओ पाहा :

BJP Chitra Wagh verbal attack on MLA Nilesh Lanke over Parner Tehsildar Jyoti Devare issue

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.