‘बविआ’ची निशाणी ‘रिक्षा’, म्हणून पालघरमध्ये मतदानाच्या दिवशी रिक्षा बंद ठेवा : भाजप

वसई : पालघर लोकसभा मतदार संघात मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील रिक्षा बंद ठेवण्याची मागणी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. भाजपच्या या मागणीचे कारणही अजब आहे. बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांची निवडणूक निशाणी ‘आटो रिक्षा’ आहे. मतदानाच्या दिवशी बहुजन विकास आघाडी शहरातील रिक्षाचा पूर्णपणे वापर करणार असून, रस्त्यावरुन फिरणाऱ्या रिक्षा मतदारांना प्रभावित करुन आचारसंहितेचा […]

‘बविआ’ची निशाणी ‘रिक्षा’, म्हणून पालघरमध्ये मतदानाच्या दिवशी रिक्षा बंद ठेवा : भाजप
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

वसई : पालघर लोकसभा मतदार संघात मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील रिक्षा बंद ठेवण्याची मागणी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. भाजपच्या या मागणीचे कारणही अजब आहे. बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांची निवडणूक निशाणी ‘आटो रिक्षा’ आहे.

मतदानाच्या दिवशी बहुजन विकास आघाडी शहरातील रिक्षाचा पूर्णपणे वापर करणार असून, रस्त्यावरुन फिरणाऱ्या रिक्षा मतदारांना प्रभावित करुन आचारसंहितेचा भंग करतील. त्यामुळे मतदानाच्या दिवशी रिक्षा बंद ठेवाव्या, अशी मागणी भाजपाने केली आहे.

भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष शिवकुमार शुक्ला यांनी एका निवेदनाद्वारे निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र पाठवून पालघरमध्ये मतदानाच्या दिवशी रिक्षा बंद करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे निवडणूक अधिकारीही विचारात पडले आहेत. वसई-विरारमधील रिक्षाचालकांनी मात्र या मागणीचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

पालघर लोकसभा मतदारसंघात 29 एप्रिलला मतदान

पालघरमध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये आणि भाजपमधून शिवसेनेत गेलेले राजेंद्र गावित आणि बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.