लोकसभेत मताधिक्य घटल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचे आदेश, म्हणाले “आता विधानसभा निवडणुकीत…”

जागावाटप, युती गणित, उमेदवारांची निवड यांसह विविध विषयांवर पक्षांतर्गत चर्चा सुरु आहेत. त्यातच आता भाजपची एक महत्त्वाची बैठक पार पडली.

लोकसभेत मताधिक्य घटल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचे आदेश, म्हणाले आता विधानसभा निवडणुकीत…
देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Jul 03, 2024 | 11:21 AM

Assembly Election 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यातील सर्व पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. यंदाच्या विधानसभेत चांगली कामगिरी करता यावी, यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. जागावाटप, युती गणित, उमेदवारांची निवड यांसह विविध विषयांवर पक्षांतर्गत चर्चा सुरु आहेत. त्यातच आता भाजपची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत बेसावध राहू नका, असे आदेश दिले आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सूचना

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला मोठ्या प्रमाणात फटका बसला. लोकसभा निवडणुकीत भाजपला केवळ 9 जागांवर समाधान मानावं लागलं. त्यानंतर आता भाजपने विधानसभेसाठी कंबर कसली आहे. देवेंद्र फडणवीसांनी नुकतंच भाजपची एससी आणि एसटी मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळी त्यांनी नेत्यांना विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.

देवेंद्र फडणवीसांची रात्री उशीरा बैठक

भाजपला लोकसभेत एससी आणि एसटी मतांचा मोठा फटका बसला होता. विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात नरेटिव्ह करण्यात आले, असा आरोप सातत्याने पाहायला मिळाला. त्याच पार्श्वभूमीवर काल एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. एससी आणि एसटी या भाजपच्या आघाड्यांसोबत देवेंद्र फडणवीसांनी रात्री उशीरा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी आगामी विधानसभेच्या तयारीला लागा, असे आदेश त्यांना दिले.

विधानसभेसाठी भाजपने कंबर कसली

विरोधकांचे नरेटिव्ह खोडून काढण्यात आपण अपयशी ठरलो. त्यामुळे विधानसभेत अशाप्रकारे जर नरेटिव्ह आले, तर आपण त्याला चोख प्रत्युत्तर दिलं पाहिजे, अशी सूचनाही या बैठकीत करण्यात आली. तसेच विधानसभा निवडणुकीत बेसावध राहू नका, असेही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.