राज्यपालांशी वाद घालण्याची ही वेळ आहे का?; फडणवीस संतापले

तुमचे राज्यपालांशी मतभेद सुरुच राहतील. पण आता ती वेळ आहे का? असा सवाल फडणवीस (BJP Devendra Fadnavis) यांनी उपस्थित केला.

राज्यपालांशी वाद घालण्याची ही वेळ आहे का?; फडणवीस संतापले
Follow us
| Updated on: Oct 19, 2020 | 11:55 AM

पुणे : “राज्यपालांचं एखादं वाक्य आणि त्यावरुन झालेला विवाद याआधीदेखील झाला आहे. पण ही काय वादाची वेळ आहे का? आधी शेतकऱ्यांकडे लक्ष द्या”, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (BJP Devendra Fadnavis) यांनी ठणकावून सांगितलं. फडणवीस आज (19 ऑक्टोबर) बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. बारामतीतील उंडवडी गावाची पाहणी केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली.

“राज्यातील शेतकरी सध्या गंभीर परिस्थितीत आहे. तुमचे राज्यपालांशी मतभेद सुरुच राहतील. यापूर्वी एकाच पक्षाचे सरकार असताना, त्याच पक्षाने राज्यपाल नियुक्त केलेले असतानादेखील राज्यपालांशी मतभेद झालेले आहेत. त्यामुळे आता तो विषय नाही. आता शेतकऱ्याला काय मदत मिळणार हे महत्त्वाचं आहे”, अशी भूमिका फडणवीसांनी (BJP Devendra Fadnavis) मांडली.

“राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवरांबाबत मी बोलणार नाही. पण अशी सोयीची राजकीय भूमिका कोणीही घेऊ नका. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना टोलवाटोलवी नकोय. तुम्ही काय करणार हे सांगा. पंचनाम्याची वाट न पाहता तात्काळ मदत करा. गुरांना चारा द्या”, असं फडणवीस म्हणाले.

“राज्यात अतिवृष्टी झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत: मुख्यमंत्र्याना फोन करुन मदतीचं आश्वासन दिलं आहे. केंद्र सरकार नेहमीच मदत करतं. पण राज्याची पहिली जबाबदारी आहे. त्यांनी तात्काळ शेतकऱ्यांना भरघोस मदत करावी. मी काळजीवाहू मुख्यमंत्री असताना 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं”, असं फडणवीसांनी सांगितलं.

‘राज्य सरकारला डिफेन्ड करणं एवढंच पवारांना काम’

“शरद पवार यांना राज्य सरकारला डिफेन्ड करावं लागत आहे. या सरकारचा इतका नाकर्तेपणा बाहेर येतोय की प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे या सरकारला डिफेन्ड करणं एवढंच काम शरद पवार यांच्याकडे आहे”, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला.

“आमचा दौरा घोषित झाल्यानंतर या सरकारमधील अनेक पालकमंत्री आपल्या मतदारसंघात गेले. तोपर्यंत ते गेले नव्हते. आमचा दौरा घोषित झाल्यानंतर तात्काळ सर्वांची झोप उडाली. सगळे पटापट मुंबईहून आपापल्या मतदारसंघात गेले”, असंदेखील फडणवीस म्हणाले.

संबंधित बातम्या :

सरकारच्या नाकर्तेपणामुळे पवार साहेबांना मुख्यमंत्र्यांचा बचाव करावा लागतोय- देवेंद्र फडणवीस

अतिवृष्टी ते राजकारण; शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे

शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने कर्ज घ्यावं; शरद पवारांची मागणी

अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात, मी आलो म्हणजे लगेच मदत मिळेल असे नाही : शरद पवार

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.