Gautam Gambhir | आयपीएल, लोकसभा निवडणुकीआधी गौतम गंभीरची राजकारणाबाबत मोठी घोषणा

Gautam Gambhir | आगामी IPL 2024 आणि लोकसभा निवडणूक 2024 आधी गौतम गंभीरने राजकारणाबाबत मोठी घोषणा केली आहे. क्रिकेटच मैदान गाजवल्यानंतर गौतम गंभीर राजकारणाच्या मैदानात उतरला होता. मैदानावरील वादांमुळे देखील गौतम गंभीर नेहमीच चर्चेत राहतो. मागच्या आयपीएल सीजनमध्ये गौतम गंभीर थेट विराट कोहलीला भिडला होता.

Gautam Gambhir | आयपीएल, लोकसभा निवडणुकीआधी गौतम गंभीरची राजकारणाबाबत मोठी घोषणा
Gautam Gambhir
Follow us
| Updated on: Mar 02, 2024 | 11:23 AM

Gautam Gambhir | आगमी IPL 2024 आधी माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने मोठी घोषणा केली आहे. त्याने राजकारणातून निवृत्ती घेत असल्याच जाहीर केलय. त्याने स्वत:च लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलाय. त्यानंतर गौतम गंभीर तिकीटाच्या शर्यतीतून बाहेर गेलाय. या संदर्भात त्याने टि्वट करुन माहिती दिलीय. आगामी आयपीएल 2024 सीजनआधी गौतम गंभीरने भाजपा अध्यक्ष जे.पी.नड्डा यांना, राजकीत कर्तव्यातून मुक्त करण्याच अपील केलय. गौतम गंभीर कोलकाता नाइट रायडर्स टीममध्ये मेंटॉर म्हणून आपला कार्यकाळ सुरु करत आहे.

“मला माझ्या राजकीय कर्तव्यातून मुक्त करा, अशी मी पक्षाध्यक्ष जे.पी.नड्ड यांच्याकडे विनंती केली आहे. क्रिकेटसाठी मी जी कमिटमेंट केलीय त्याकडे मला लक्ष देता येईल. मला लोकांची सेवा करण्याची जी संधी दिली, त्या बद्दल मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानतो” असं गौतम गंभीरने टि्वटमध्ये म्हटलं आहे.

किती लाख मतांनी गौतम गंभीरने विजय मिळवलेला?

गौतम गंभीर मार्च 2019 मध्ये भाजपामध्ये सहभागी झाला होता. तेव्हापासून दिल्लीमधील पक्षाचा प्रमुख चेहरा होता. 2019 मध्ये त्याने पूर्व दिल्लीमधून लोकसभेची निवडणूक लढवली. आम आदमी पार्टीच्या उमेदवाराला गंभीरने पराभूत केलं होतं. त्याने 6,95,109 इतक्या मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. 2007 आणि 2011 साली टीमला वर्ल्ड कप जिंकवून देण्यात गौतम गंभीरने महत्त्वाची भूमिका बजावली होती. इंडियन प्रीमियर लीगमधील मोठ्या नावांपैकी गौतम गंभीर एक आहे.

गंभीरच्या नेतृत्वात KKR ने कितीवेळा IPL ट्रॉफी जिंकलीय?

गौतम गंभीर कोलकाता नाइट राइडर्स (केकेआर) फ्रेंचायजी टीमचा मेंटॉर म्हणजे मार्गदर्शक आहे. मुख्य कोच चंद्रकांत पंडित सोबत मिळून काम करेल. गंभीरच्या नेतृत्वाखाली केकेआरने 2012 आणि 2014 साली आयपीएलच विजेतेपद मिळवलं होतं. यावर्षी आयपीएल 22 मार्चपासून सुरु होणार आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.