Vinod Tawde : ‘मोदी भक्तांनी मतदान केलं नाही, म्हणून…’, विनोद तावडे काय म्हणाले?

Vinod Tawde : भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी टीव्ही 9 मराठीला मुलाखत दिली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील प्रचार, अनुभव त्यांनी शेअर केला. लोकसभेला भाजपाची गाडी 400 पार का जाऊ शकली नाही? विधानसभेला भाजपा किती जागा जिंकेल? त्या बद्दल विनोद तावडे यांनी आपला अंदाज व्यक्त केला आहे.

Vinod Tawde : 'मोदी भक्तांनी मतदान केलं नाही, म्हणून...', विनोद तावडे काय म्हणाले?
Vinod Tawde
Follow us
| Updated on: Nov 14, 2024 | 2:03 PM

“हरियाणात काँग्रेसने एकाच समाजाचा विषय केला. त्यानंतर ओबीसी एकत्र आले आणि आम्ही हरियाणात 10 वर्ष काम केलं होतं. विकास केला होता. समाज सोबत आला आणि आमचा विजय सोपा झाला” असं भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणी विनोद तावडे म्हणाले. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. “ज्या पद्धतीने महायुतीने पॉलिटिक्स ऑफ इनडायरेक्ट बेनिफिट आणि डायरेक्ट बेनिफिट केलं. रस्ते, मेट्रो आणि पंतप्रधान ग्राम सडक योजना आणली. रुग्णांना, विद्यार्थ्यांना मदत झाली. रस्ते बांधल्याचा हा परिणाम झाला. हा इनडायरेक्ट बेनिफिट आणि शून्य वीज बिल, पिक विमा योजना आणि लाडकी बहीण योजना हा डायरेक्ट बेनिफिट मिळणार आहे” असं विनोद तावडे म्हणाले.

“हरियाणात जे घडलं ते विधानसभेला घडेल. लोकसभेत आम्हाला जागा कमी आल्या. फार कमी होत्या. आता एमआयएम, वंचित, समाजवादी पार्टी हे काही मते घेणार आहे. पण महायुतीत अशी मतांची विभागणी होणार नाही. त्यामुळे आमच्या जागा वाढणार आहे. अब की बार 400 पार झालं. मोदी भक्तांनी मतदान केलं नाही. मोदी येणारच आहे, असं म्हणून मतदान झालं नाही. त्यामुळे चार पाच टक्के मतदान कमी झालं. त्याचा फटका बसला” असं विनोद तावडे म्हणाले.

‘उद्धव ठकारेंना वरळीत मुस्लिम मते अधिक पडली’

“वंचित, सपा आणि एमआयएम स्ट्राँग आहेत. त्यांची पाच-दहा हजार मते घेण्याची क्षमता आहे. उद्धव ठकारेंना वरळीत मुस्लिम मते अधिक पडली हे लोकसभेत दिसली. पण अशी मते तिकडे गेल्यावर हिंदुत्वाची मते आमच्याकडे येतात. गेल्यावेळी जो मतदार बाहेर नव्हता पडला. तो वोट जिहाद पाहत आहे. त्याला उत्तर देण्यासाठी आपण एकजुटीने उतरलं पाहिजे. हे त्याला वाटत आहे. म्हणून म्हणतो बटेंगे तो कटेंगे. एक है तो सेफ आहे. मोदीही तसं म्हणाले आहेत. आपण एकजूट राहिलो तर आपण सेफ राहू. आम्ही लोकांपर्यंत हे पोहोचवलं आहे” असं विनोद तावडे म्हणाले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.