एकनाथ शिंदेंच्या मागे आमदारांची फौज, शिवसेनेनं त्यांचं कौतुक केलं पाहिजे- हर्षवर्धन पाटील
एकनाथ शिंदे तुमच्याकडे होते तेव्हा चांगले होते आता ते मुख्यमंत्री झाले. त्यांच्या मागे 40 आमदार आलेत, त्याबद्दल तुम्ही त्यांचं कौतुक केलं पाहिजे, असं भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलंय.
सोलापूर : एकनाथ शिंदे तुमच्याकडे होते तेव्हा चांगले होते आता ते मुख्यमंत्री झाले. त्यांच्या मागे 40 आमदार आलेत, त्याबद्दल शिवसेनेने त्यांचं कौतुक केलं पाहिजे, असं भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshawardhan Patil) यांनी म्हटलंय. शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी देवेंद्र फडणवीस एका अडाणी मुख्यमंत्र्याच्या हाताखाली काम करतात, असं म्हटलं होतं. त्याला पाटलांनी उत्तर दिलं आहे. राज्यातून त्यांची सत्ता गेल्यामुळे त्यांची बाजू खिळखिळी झाली. या निराशेतून ते अशी विधानं करत आहेत. विनायक राऊतांचं वक्तव्य हे हास्यास्पद आहे. त्यांच्या वक्तव्याचा मी निषेध करतो. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या बद्दल वक्तव्य करणे हा लोकशाहीचा अपमान आहे.