Rajya Sabha Election 2022: मोबाईलवर बोलताना काळजी घ्या, हॉटेलबाहेर पडू नका, भाजपला फोन टॅप होण्याची भीती?

Rajya Sabha Election 2022: उद्या 10 जून रोजी राज्यसभेची निवडणूक आहे. रात्री 8 वाजेपर्यंत राज्यसभा निवडणुकीचं चित्रं स्पष्ट होणार आहे. राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा मोडीत काढत तब्बल 23 वर्षानंतर ही निवडणूक होत आहे.

Rajya Sabha Election 2022: मोबाईलवर बोलताना काळजी घ्या, हॉटेलबाहेर पडू नका, भाजपला फोन टॅप होण्याची भीती?
मोबाईलवर बोलताना काळजी घ्या, हॉटेलबाहेर पडू नका, भाजपला आमदारांच्या फोन टॅपिंगची भीती?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 5:33 PM

मुंबई: महाविकास आघाडीप्रमाणेच (mahavikas aghadi) भाजपने (bjp) त्यांच्या आमदारांना मुंबईत बोलावून घेतलं आहे. या सर्व आमदारांची ताज हॉटेलात राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व आमदारांना भाजपकडून काही सूचनाही देण्यात आल्या आहेत. मोबाईलवर बोलताना काळजी घ्या. मोजकच बोला. अधिकचं बोलू नका. समोरून बोलणारी व्यक्ती विश्वासातील आहे का? याची खात्री करा, अशा सूचना या आमदारांना देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. तसेच हॉटेलबाहेर न पडण्याच्या सूचनाही या आमदारांना देण्यात आल्या आहेत. याशिवाय काहीही अडचण आली तर भाजपच्या संबंधितांशी तात्काळ संपर्क साधण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत, असं सूत्रांनी सांगितलं. भाजपला आपल्या आमदारांचे फोन टॅप होण्याची आणि आपली रणनीती उघड होण्याची भीती वाटत असल्यानेच हे फर्मान सोडण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी (rajya sabha election) उद्या मतदान होणार आहे. या निवडणुकीचं काऊंटडाऊन सुरू झाल्यानं आजचा दिवस आघाडी आणि भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळेच सर्वच राजकीय पक्षांकडून काळजी घेण्यात येत आहे.

उद्या 10 जून रोजी राज्यसभेची निवडणूक आहे. रात्री 8 वाजेपर्यंत राज्यसभा निवडणुकीचं चित्रं स्पष्ट होणार आहे. राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा मोडीत काढत तब्बल 23 वर्षानंतर ही निवडणूक होत आहे. भाजपने सातवा उमदेवार दिल्याने ही निवडणूक अधिकच रंगतदार झाली आहे. भाजपकडून कोल्हापुरातील नेते धनंजय महाडिक आणि शिवसेनेकडून कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार निवडणुकीत उभे आहेत. त्यामुळे महाडिक राज्यसभेत जाणार की पवार राज्यसभेत जाणार याचं चित्रं उद्या रात्रीपर्यंत स्पष्ट होणार आहे.

हे सुद्धा वाचा

फडणवीस सक्रिय होणार

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अवघे काही तास उरले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सक्रिय होणार असल्याचं सांगितलं जातं. फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ते होम क्वॉरंटाईन आहे. त्यांच्या कोरोनाचा रिपोर्ट आला. हा रिपोर्ट निगेटिव्ह आला असून ते पुन्हा एकदा सक्रिय होणार आहेत. आज रात्री उशिरापर्यंत फडणवीस हे आमदारांच्या भेटी घेऊन त्यांना मार्गदर्शन करणार असल्याचं सांगितलं जातं.

आदित्य ठाकरेंचा ट्रायडंटमध्ये तळ

शिवसेनेने आपले सर्व आमदार ट्रायडंटमध्ये ठेवले आहेत. उद्या मतदानाचा दिवस आहे. त्यामुळे दिवसभरात या आमदारांना भाजपकडून संपर्क होऊ नये म्हणून शिवसेनेने खबरदारी घेतली आहे. शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत आज ट्रायडंट हॉटेलमध्ये जाणार आहेत. दिवसभर हे दोन्ही नेते हॉटेलात तळ ठोकणार आहे. आमदारांशी संवाद साधून त्यांच्या विभागातील समस्याही जाणून घेणार आहेत. तसेच शिवसेना वाढीच्या दृष्टीकोणातून या आमदारांशी चर्चाही करणार आहेत. यावेळी अपक्षव आमदारांशीही हे दोन्ही नेते संवाद साधणार आहेत. हे दोन्ही नेते दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवणही या आमदारांसोबतच घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.

महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले...
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले....
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'.
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.