एकनाथ शिंदेंचा ‘तो’ निर्णय योग्यच होता हे पुन्हा सिद्ध झालं; आशिष शेलांरांची ग्रामपंचायत निकालावर पहिली प्रतिक्रिया
आज राज्याच्या विविध जिल्ह्यातील 547 ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाची घोषणा होत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालामध्ये भाजप आणि शिंदे गट आघाडीवर आहेत.
मुंबई : आज राज्याच्या विविध जिल्ह्यातील 547 ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाची घोषणा होत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालामध्ये भाजप (BJP) आणि शिंदे गट आघाडीवर आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात भाजप आणि शिंदे गटाने बाजी मारली आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या युतीने सर्वाधिक 138 जागा जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीच्या वाट्याला 100 जागा आल्या आहेत. या निकालावर भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही या विजयाचा शांततेत स्विकार करतो. आम्ही यापुढे अधिक जोमाने जनतेची सेवा करू असं त्यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, एकनाथ शिंदे हे ज्या मुद्द्यावर शिवसेनेतून बाहेर पडले, तो त्यांचा निर्णय योग्यच असल्याचे पुन्हा एकदा या निकालाने स्पष्ट झाले आहे. त्यांनी यावेळी राष्ट्रवादीला देखील टोला लगावला आहे. राष्ट्रवादी हा पक्ष काही राज्यस्थरीय पक्ष नसून दोन, अडीच जिल्ह्यांपुरता पक्ष असल्याचे शेलार यांनी म्हटलं आहे.