राज ठाकरेंबद्दल तेव्हापासूनच अट्रॅक्शन, व्हेरी नाईस पर्सनॅलिटी, फक्त दिसणंच नाही… : चंद्रकांत पाटील

तुमची भूमिका जरा बदला की हो, तुम्ही महाराष्ट्राचे नेते झाले पाहिजेत, मनसेचं इन्फ्रास्ट्रक्चर, या आधारे व्हाल तुम्ही महाराष्ट्राचे नेते, पण याला वेळ लागेल, असं चंद्रकांत दादा राज ठाकरेंविषयी म्हणाले

राज ठाकरेंबद्दल तेव्हापासूनच अट्रॅक्शन, व्हेरी नाईस पर्सनॅलिटी, फक्त दिसणंच नाही... : चंद्रकांत पाटील
Follow us
| Updated on: Aug 06, 2021 | 12:56 PM

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची कृष्णकुंज निवासस्थानी जाऊन भेट घेतली. राज्याच्या राजकारणातील दोन बड्या नेत्यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळाचे डोळे याकडे लागले होते. मात्र या भेटीत मनसे आणि भाजप एकत्र येऊन निवडणुका लढवण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असं चंद्रकांतदादांनी स्पष्ट केलं. राज ठाकरेंबद्दल आपल्याला आधीपासूनच अट्रॅक्शन वाटत होतं, व्हेरी नाईस पर्सनॅलिटी, फक्त दिसणंच नाही, तर बोलणंही, अशा शब्दात चंद्रकांत पाटील राज ठाकरेंवर स्तुतिसुमनं उधळत होते. नाशिकमध्ये अचानक झालेल्या भेटीनंतर राज ठाकरे-चंद्रकांत पाटलांची काही दिवसातील ही दुसरी भेट होती.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

“ज्यावेळी मी सिद्धार्थमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम करत होतो, तेव्हापासूनच माझ्या मनामध्ये राज ठाकरेंबद्दल अॅट्रॅक्शन होतं. व्हेरी नाईस पर्सनॅलिटी, फक्त दिसण्यापुरती नाही, तर बोलणं, बोलण्यातील स्पष्टता, आपल्या मुद्द्यांवर आग्रही राहणं, फ्लेक्जिबल आहेत, पण थोडे रिजीडही आहेत ते, व्यक्ती म्हणून एकमेकाचं सुख पाहणं, यश पाहणं, हा भाग आहेच. पण तुमची भूमिका जरा बदला की हो, तुम्ही महाराष्ट्राचे नेते झाले पाहिजेत, मनसेचं इन्फ्रास्ट्रक्चर, या आधारे व्हाल तुम्ही महाराष्ट्राचे नेते, पण याला वेळ लागेल. मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये, मोठ्या भूमिकेत तुम्ही यायला पाहिजे, हे एक माणूस म्हणून सांगणं वेगळं, पण मी भाजपचा राज्याचा अध्यक्ष आहे, त्यामुळे मनसे आणि भाजप एकत्र येऊन निवडणुका लढवण्याचा कोणताही प्रस्ताव नाही” असं चंद्रकांतदादांनी स्पष्ट केलं.

चंद्रकांत पाटील काय काय म्हणाले?

“महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज साहेब ठाकरे यांची माझी नाशिकला अचानक भेट झाली. तेही प्रवासात होते, मीही प्रवासात होतो. त्यावेळी आमचं बोलणं झालं, मुंबईत केव्हातरी घरी भेटूया. कुठल्याही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे, घरी बोलावणं.. पहिला प्रश्न आहे भाजप महाराष्ट्र अध्यक्ष राजसाहेबांच्या घरी का गेले, भाजप प्रदेश कार्यालयात का गेले नाहीत, मुळात मी असा अहंकार बाळगणारा नाही. भाजपचीच नाही तर महाराष्ट्राची संस्कृती आहे, कोणी घरी बोलावलं तर येतो म्हणणं. त्यांच्या निमंत्रणाचं स्वीकार करुन मी घरी आलो.. दोन राजकीय नेते भेटतात तेव्हा राजकीय चर्चा होतेच, ती झाली. परंतु भाजप-मनसे युतीचा प्रस्ताव या बैठकीत नव्हता. एकमेकांना समजून घेणं, हा विषय होता. मनसे आणि राज ठाकरेंनी परप्रांतीयांची भूमिका बदलल्याशिवाय आम्ही चर्चाही करु शकत नाही. त्यांनी एक क्लिप मला भाषणाची दिली होती. यूपीमध्ये भाषण व्हायरल झालं होतं. ते मी ऐकलं. त्यावर चर्चा झाली. सदिच्छा भेट झाली, राजकीय चर्चा असेल तर ती युतीची नाही, एकमेकांच्या भूमिकांची झाली” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

“कुठल्याही माणसाच्या दोन भूमिका असतात, एक माणूस म्हणून आणि कार्यकर्ता म्हणून, नेता म्हणून. माणूस म्हणून मला त्यांच्या भूमिकांवर चर्चा करायची होती. मी सिद्धार्थमध्ये विद्यार्थी परिषदेत होतो. तेव्हा हे BVS चे काम करायचं. तेव्हापासून माझ्या मनात यांच्याबद्दल आकर्षण होतं, व्यक्ती म्हणून एकमेकांचं सुख पाहणं, यश पाहणं हे आहेच. राज ठाकरेंना भूमिका बदला, तुम्ही महाराष्ट्राचे नेते व्हायला हवे हे मी माणूस म्हणून सांगणं वेगळं, सध्या मनसे आणि भाजप एकत्र येऊन निवडणुका लढवण्याचा प्रस्ताव नाही प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते, नाशिकला तेही जातात, मीही जातो, आम्ही अचानक भेटलो. मी गेले वर्षभर बोलतोय त्यांनी त्यांची भूमिका बदलावी. नाशिकमध्ये समोरासमोर भेटलो, आज चर्चा झाली” असंही ते म्हणाले.

“राजसाहेब म्हणाले, यूपीतील माणसाला यूपीमध्ये 80 टक्के नोकऱ्या हव्या, हे मी यूपीत जाऊन म्हणेन, तसंच मी महाराष्ट्रातील मराठी मुलांना इथेच रोजगार मिळायला हवा, यात गैर काय? कुठलीही दोन महाराष्ट्रातील हिंदू माणसं भेटतात, तेव्हा निघाताना पुन्हा या असं सांगणं असतंच, या पुन्हा भेटीला राजकीय संदर्भ नाही, विशेषता वहिनी जेव्हा आल्या त्या म्हणाल्या पुढल्यावेळी पत्नीला घेऊन या असं म्हटलं, मी त्यांना सांगितलं इथून 50 पावलांवर त्यांचं ऑफिस आहे. त्याही येतील” असं चंद्रकांतदादांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

राजकीय चर्चा नक्कीच झाली, पण युतीची चर्चा नाही; चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान

राज ठाकरेंसोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली?, चंद्रकांत पाटील यांनी डिटेल सांगितलं!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.