‘महाविकास आघाडीत किती आलबेल हे त्यांच्या येरझाऱ्यांवरुनच दिसतंय’, चित्रा वाघ यांचा राऊतांना टोला

भाजपच्या नेत्या आणि प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांना जोरदार टोला लगावलाय. महाविकास आघाडीत किती आलबेल आहे हे राऊत यांच्या येरझाऱ्यांवरुनच पाहायला मिळत अशल्याची खोचक टीका वाघ यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलीय.

'महाविकास आघाडीत किती आलबेल हे त्यांच्या येरझाऱ्यांवरुनच दिसतंय', चित्रा वाघ यांचा राऊतांना टोला
भाजप नेत्या चित्रा वाघ, शिवसेना खासदार संजय राऊत
Follow us
| Updated on: Jun 29, 2021 | 4:40 PM

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या गेल्या 2-3 दिवसांपासून मातोश्री, वर्षा आणि सिल्व्हर ओक या बंगल्यावरील भेटी वाढल्याचं पाहायला मिळालं. राऊतांच्या या भेटीगाठींमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात काही मतभेत निर्माण झाल्याची, तसंच पवार नाराज असल्याची चर्चा जोर धरु लागली आहे. हाच धागा पकडत भाजपच्या नेत्या आणि प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांना जोरदार टोला लगावलाय. महाविकास आघाडीत किती आलबेल आहे हे राऊत यांच्या येरझाऱ्यांवरुनच पाहायला मिळत अशल्याची खोचक टीका वाघ यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलीय. (Chitra Wagh criticizes Sanjay Raut over Mahavikas Aghadi government )

“संजय राऊतांच्या अस्वस्थेमुळे महाविकास आघाडीत किती आलबेलं आहे हे त्यांच्या येरझाऱ्या करण्यावरून दिसतचं आहे. एकच कोडं, कुणीही हरामखोर म्हणलेलं नसताना, ‘मी हरामखोर नाही’, हे कशाला सिद्ध करावं लागतंय? संजयजी, माझं एकच आवाहन आहे की, तुम्ही सहा आठवड्याचं अधिवेशन बोलवावं आणि मगच विरोधकांच्या भूमिकेवर आपलं मत व्यक्त करावं”, असं ट्वीट करुन वाघ यांनी संजय राऊत यांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय. तसंच पावसाळी अधिवेशनावरुन थेट आव्हानही दिलं आहे.

महाविकास आघाडी सरकार 5 वर्षे टिकणारच, राऊतांचा दावा

शरद पवार नाराज या चर्चेला अर्थ नाही. तिन्ही पक्षांचं व्यवस्थित सुरु आहे. केव्हातरी पूर्णविराम द्यावा लागेल. सरकारला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. मनुष्य म्हटल्यावर मतभेद असू शकतात पण नाराज कुणीच नाही, असं राऊत यांनी आवर्जुन सांगितलं. अहमदाबादमध्ये कुणालाही भेटल्याचा इन्कार शरद पवार यांनी केलाय. मोदी-ठाकरे यांच्यात चर्चा झाली असली तरी वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. या दोन्ही बैठकांमध्ये काहीही राजकारण नसल्याचा दावाही राऊत यांनी यावेळी केलीय.

‘भाजपवाले राजा हरिश्चंद्राचे अवतार आहेत का?’

अनिल देशमुख यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे. त्याबाबत विचारलं असता अनिल देशमुख आणि प्रताप सरनाईक यांची बाजू समजून घेतली पाहिजे. त्यांची कोंडी केली जातेय. भाजपमध्ये काही धुतल्या तांदळाचे आहेत का? राजा हरिश्चंद्राचे अवतार आहेत का? असा सवाल राऊत यांनी केलाय. तसंच तिन्ही पक्ष एकत्रित बसून याबाबत पुढील वाटचाल ठरवतील असंही राऊत म्हणाले.

संबंधित बातम्या : 

मराठा समाज त्यांच्या गाड्यांमागे धावला, त्यांनी समाजाला काय दिलं? चंद्रकांत पाटलांचा पवारांवर घणाघात

संजय राऊत आणि शरद पवार भेट व्हाया उद्धव ठाकरे! राजकीय विश्लेषकांच्या मते गाठीभेटीचं कारण काय?

Chitra Wagh criticizes Sanjay Raut over Mahavikas Aghadi government

Non Stop LIVE Update
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.