चित्रा वाघ यांना पुन्हा धमकीचे फोन? लढा सुरुच राहणार असल्याचं ट्वीट

भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांना पुन्हा काही धमकीचे फोन आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

चित्रा वाघ यांना पुन्हा धमकीचे फोन? लढा सुरुच राहणार असल्याचं ट्वीट
Follow us
| Updated on: Mar 03, 2021 | 10:04 PM

मुंबई : पूजा चव्हाण प्रकरणात शिवसेनेचे नेते संजय राठोड यांच्याविरोधात आवाज उठवणाऱ्या भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांना धमकीचे फोन आल्याची माहिती त्यांनी दिली होती. त्यानंतर बुधवारी पुन्हा एकदा त्यांनी काही ट्वीट केले आहेत. त्यातून त्यांना पुन्हा काही धमकीचे फोन आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, चित्रा वाघ आणि भाजपच्या बड्या नेत्यांविरोधात बंजारा समाजाकडून पोलिस ठाण्यात तक्रारीही दाखल करण्यात आल्या आहेत.(Chitra Wagh once again received a threatening phone call)

“दारू पिऊन मला अर्वाच्य अश्लील शिव्या जीवे मारण्याच्या धमक्या देण्यातच बलात्काऱ्यांच्या समर्थकांचा पुरूषार्थ उरला आहे का ??? FIR होऊनही परीस्थितीत फरक पडला नाही”, असं ट्वीट वाघ यांनी बुधवारी रात्री 9 च्या सुमारास केलं आहे. या ट्वीटवरुन त्यांना पुन्हा एकदा धमकीचे फोन आल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

त्याचबरोबर त्यांनी अजून एक ट्वीट करत जुनी घटना सांगितली आहे. “मला आठवतंय मागे माझ्या दहिसरच्या मैत्रिणीचा मोबाईल नंबर टॉयलेट मध्ये तर कलिनाच्या मैत्रिणीचा नंबर ट्रेन मध्ये लिहीलेला त्यावेळी त्यांना काय व कसे फोन करून त्रास दिला गेला ज्याची मी साक्षीदार आहे. लढलेलो तेव्हाही. त्यांचा लढा सुद्धा प्रस्थापितांविरोधात होता. लडेंगे..जितेंगे.”

चित्रा वाघांना यापूर्वीही धमकी

यापूर्वीही चित्रा वाघ यांना पूजा चव्हाण प्रकरणात धमकीचे फोन आले होते. त्यावेळीही त्यांनी ट्वीट करुन माहिती दिली होती. इतकच नाही तर धमक्यांना घाबरणारी चित्रा वाघ अजिबात नाही, असा इशाराही त्यांनी दिला होता. “राजसत्तेकडे प्रचंड ताकद असते. सर्वसामान्य माणसाचा पाशवी राजसत्तेपुढे टिकाव लागू शकत नाही. मीडिया आणि सोशल मीडियाच्या व्यासपीठावरून ज्यांनी राजसत्तेला आव्हान देण्याचा प्रयत्न केला, त्यांना पोलीस बळाचा वापर करून चिरडण्याचे प्रकार दिवसाआड होतायत”, असं चित्रा वाघ ट्विटरवर म्हणाल्या.

“राजसत्ता पाठीशी असल्यानेच तर कर असली तरी डर कशाला? ही मानसिकता बळावली आहे. राजदंडाचे अभय मिळाले आणि सामाजिक न्याय अबाधित राहिलं. पूजा चव्हाणला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, तिच्यावर अत्याचार केले, त्यालाही कदाचित असंच अभय मिळेल?”, असा सवाल चित्रा वाघ यांनी ट्विटरवर केला आहे.

संबंधित बातम्या : 

पूजाच्या आत्महत्येची CID सारख्या संस्थेकडून चौकशी करा, आजोबांची मागणी

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मंत्री संजय राठोड यांच्यावर थेट आरोप, चित्रा वाघांना धमकीचे फोन

Chitra Wagh once again received a threatening phone call

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.