भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचा प्रचाराचा अनोखा फंडा, संतांचे अभंग अन् मोदी सरकारची कामे, सोशल मीडियाचा वापर

devendra fadnavis: देवेंद्र फडणवीस यांनी ‘संतवचन’ नावाने समाजमाध्यमावर सिरिज सुरु केली आहे. 15 एप्रिलपासून दररोज ते एक पोस्ट करत आहेत. संतांची ओवी किंवा अभंगांचा संदर्भ देत मोदी सरकारमध्ये काय काम झाली आहेत, त्याचा दाखला देत आहेत.

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचा प्रचाराचा अनोखा फंडा, संतांचे अभंग अन् मोदी सरकारची कामे, सोशल मीडियाचा वापर
devendra fadnavis
Follow us
| Updated on: May 05, 2024 | 1:08 PM

भारतीय जनता पक्षाकडून प्रचारात नेहमी आघाडी घेतली जाते. सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्यात भाजप नेते आघाडीवर असतात. प्रचारसभा, रॅलीप्रमाणे सोशल मीडियातील सर्व माध्यमांचा वापर ते करत असतात. भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराचा वेगळाच फंडा राबवला आहे. मोदी सरकारने केलेली कामे आणि संतवचन यांचा वापर ते करत आहेत. जगदगुरु तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज यांचे ओवी किंवा अभंगांचा संदर्भ देत त्यादृष्टीने मोदी सरकारमध्ये काय काम झाले आहेत, त्याचा दाखला देत आहेत. मतदानासंबंधी आवाहन करताना मतदानाच्या दिवशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे संदेश देत आहे.

फडणवीस यांचे लाखो फॉलोअर्स

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, कू, टेलिग्राम, शेअरचॅट, व्हॉटसअ‍ॅपचा प्रभावी वापर देवेंद्र फडणवीस करतात. देवेंद्र फडणवीस यांचे ट्विटरवर 59 लाख फॉलोअर्स आहेत. फेसबुकवर 92 लाख फॉलोअर्स तर इस्टाग्रामवर 20 लाख फॉलोअर्स आहे. कू वर 9 लाख त्यांचे फॉलोअर्स आहेत. शिवाय व्हॉटसअ‍ॅप आणि टेलिग्राम चॅनलच्या माध्यमांतून कोट्यवधी लोकांपर्यंत ते थेट संपर्कात असतात. मग या प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर ते मोदी सरकारच्या कामांचा प्रचारासाठी करत आहेत.

हे सुद्धा वाचा

मोदींच्या योजनांचा प्रचार

देवेंद्र फडणवीस यांनी ‘संतवचन’ नावाने समाजमाध्यमावर सिरिज सुरु केली आहे. 15 एप्रिलपासून दररोज ते एक पोस्ट करत आहेत. संतांची ओवी किंवा अभंगांचा संदर्भ देत मोदी सरकारमध्ये काय काम झाली आहेत, त्याचा दाखला देत आहेत. महाराष्ट्रातील निवडणुकीचा शेवटचा टप्पा पूर्ण होईपर्यंत म्हणजे 20 मे पर्यंत ही सिरिज सुरु राहणार आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणतात…

याबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, महाराष्ट्राला संतांची थोर परंपरा आहे. आपल्या संतसाहित्यात विकासाच्या अनेक संकल्पना सापडतात. आज केंद्रातील मोदी सरकार जी कामे करते आहे, त्यात संतांचा संदेश कसा हुबेहुब आढळून येतो, हेच सप्रमाण देण्यासाठी ही एक अभिनव कल्पना सुचली. त्यादृष्टीनेच 15 एप्रिलपासून मी दररोज एक ट्विट करीत आहे. महाराष्ट्रातील निवडणुकीचा शेवटचा टप्पा संपेपर्यंत 20 मे पर्यंत मी दररोज एक अशी एक पोस्ट माझ्या समाजमाध्यमांवरील सर्वच व्यासपीठांवर करणार आहे. यामाध्यमातून कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ होते.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.