Devendra Fadnavis | उद्धवजी माझ्या मोठ्या भावासारखे, त्यांना अपयशी ठरले म्हणणार नाही : देवेंद्र फडणवीस

कोरोना विषाणूचा प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका (Devendra Fadnavis Exclusive Interview) केली आहे.

Devendra Fadnavis | उद्धवजी माझ्या मोठ्या भावासारखे, त्यांना अपयशी ठरले म्हणणार नाही : देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: May 30, 2020 | 3:42 PM

मुंबई : “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे माझे मित्र आहे. ते माझ्या मोठ्या भावासारखे आहेत, ते नवे आहेत, त्यांना शिकण्यासाठी काही महिने हवे ते आम्ही दिले. मात्र या परिस्थितीत कठोर निर्णयाची आवश्यक आहे. तो निर्णय ते घेताना दिसत नाहीत,” असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. टीव्ही 9 मराठीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी टीका केली. 

“राजकारण बाजूला ठेवा, ही राजकारणाची वेळदेखील नाही. पण अशा परस्थितीत कोरोनाचा सामना करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्याऐवजी सरकार आकड्यांची फेकाफेक करत असेल, तर कुठेतरी आम्हाला सरकारला नक्कीच आरसा दाखवावा लागेल. सरकारला सांगावं लागेल की, कोरोनाविरोधात लढाई सुरु आहे. त्यादृष्टीने योग्य कारवाई करा,” असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

डिस्चार्ज रेट वाढवण्याचा प्रयत्न

“देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे महाराष्ट्रातील आणि मुंबईतील परिस्थिती तुम्ही रोज बघत आहात. ज्याप्रकारे महाराष्ट्रात कोरोना वाढत आहे. देशात एकूण उपचार घेणाऱ्या रुग्णांपैकी 41 टक्के रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. याशिवाय कोरोनामुळे देशात होणाऱ्या मृत्यूंपैकी 41 टक्के मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. रोज ही संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत केवळ आकड्यांचे हेरफेर करायची. काल एका दिवसात 8 हजार रुग्ण डिस्चार्ज झाल्याचं दाखवलं आणि डिस्चार्ज रेट वाढवण्याचा प्रयत्न केला गेला,” अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर केली.

“लोक डिस्चार्ज होत असतील याचा आम्हाला आनंद आहे. लोकं चांगली झालीच पाहिजेत. पण, नंबर गेम करण्यापेक्षा आज मुंबईतील लोकांना बेड्स, ऑक्सिजन आणि रुग्णवाहिकादेखील मिळत नाही, रस्त्यावर लोकांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे यासंदर्भात कारवाई होणं अपेक्षित आहे,” अशी मागणी देवेंद्र फडणवीसांनी केली.

4 हजार बेड्ससाठी डॉक्टर, नर्स नाही

“आपल्याकडे रुग्णसंख्या वाढणार हे आयसीएमआर आणि केंद्राकडून आलेल्या पथकाने देखील सांगितलं होतं. पण आपण काय व्यवस्था केली? आम्ही रेस कोर्स, एमएमआरडी, डोममध्ये बेड्स तयार केले, असं सांगितलं जातं. हे सर्व मिळून एकूण 4 हजार बेड्स आहेत. आपल्याकडे रोज दीड हजार रुग्ण वाढत आहेत. त्या 4 हजार बेड्ससाठी डॉक्टर, नर्सेस, नाहीत. त्यामुळे ते रुग्णालयं सुरुच होऊ शकलेले नाहीत,” असेही फडणवीस म्हणाले.

“आयसीएमआरचा चुकीचा दाखला सरकारकडून देण्यात आला. आयसीएमआरने सुरुवातीला सीम्टोमॅटिक टेस्टिंग करा, असं सांगितलं होतं. त्यावेळी आम्ही असिम्टोमॅटिक टेस्टिंग केलं. ज्यावेळी कोरोना रुग्णांची संख्या वाढली आणि टेस्टिंग सुविधा देशभरात सुरु झाली. तेव्हा आयसीएमआरने असीम्टोमॅटिक टेस्टिंग करा, असं सांगितलं, आम्ही ते केलं नाही. आयसीएमआरने स्पष्टपणे सांगितलं की, जेवढे हायरिस्क कन्टॅक्ट आहेत, त्यांची टेस्टिंग करणे बंधनकारक आहे. मात्र, आम्ही आवश्यकता असल्यास करु, असा निर्णय घेतला,” असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

दोन्ही राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात प्रादुर्भाव जास्त

“महाराष्ट्राचे एका मंत्र्यांनी जगात आम्ही सर्वात जास्त टेस्ट केल्या असा दावा केला आहे. महाराष्ट्रापेक्षा राजस्थान, हरियाणा, आंध्र आणि तमिळनाडू या राज्यांनी दुप्पट टेस्टिंग केल्या. महाराष्ट्रात प्रति मिलियन 2513 टेस्ट केल्या आहेत. तर गुजरातने 2464 आणि कर्नाटकने 2467 केल्या आहेत. याचा अर्थ फक्त 20 ते 25 जास्त रुग्णांची टेस्ट आपण केली आहे. पण या दोन्ही राज्यांच्या तुलनेत आपल्या राज्यात प्रादुर्भाव अधिक आहे.”

“मे महिन्यात 1 मे ते 24 मे या कालावधीत मुंबईत टेस्टिंग पैकी 32 टक्के नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळले. याशिवाय 17 मे 24 मे या आठवड्यात करण्यात आलेल्या टेस्टपैकी 42 टक्के नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळले. तर दिवसाला 10 हजार टेस्टिंग क्षमता असताना तीन ते साडेतीन हजार टेस्टिंग केली जाते. मात्र तरीही सर्वाधिक टेस्टिंग केला जात असल्याचा दावा करायचा,” अशी टीकाही फडणवीसांनी केली.

आकड्यांची जुबलगी बंद करुन योग्य उपचार करा

“आम्हाला सरकारला  उभं करायचं नाही. पण किमान ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्या गोष्टी सरकार करत नसेल, अशाप्रकारे लपवाछपवी सरकार करत असेल, तर विरोधीपक्ष आणि प्रसारमाध्यमांनी या गोष्टी सरकारच्या लक्षात आणून द्यावं लागेल. हा बनवाबनवीचा खेळ नाही. आपल्याला एकत्रितपणे लढायचं आहे. उद्या आकडे वाढले तरी त्याच्यावर आपल्याला उपाय काढावा लागेल. त्यामुळे आकड्यांची जुबलगी बंद करायला पाहिजे. योग्य प्रकारे ट्रिटमेंट प्रोटोकॉल चालू केला पाहिजे,” असेही देवेंद्र फडणवीसांनी यावेळी म्हटलं.

मुंबईत कोरोना वाढण्यामागचं कारण काय?

“मुंबईच्या प्रत्येक वॉर्डमध्ये कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सरकारकडून मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला जातो, तो दावा अत्यंत चुकीचा आहे.”

“सुरुवातीला धारावीत रुग्ण आढळत होते तेव्हा आयसीएमआरने काय सांगितलं होतं? धारावीसारख्या ठिकाणी जास्तीत जास्त संस्थात्मक क्वारंटाईन केलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही 40 ते 50 हजार नागरिकांच्या राहण्याची व्यवस्था करा. आम्ही काही दिवसच संस्थात्मक क्वारंटाईनला पाठवले. त्यानंतर लोकांना होम क्वारंटाईन केलं. हायरिस्क कॉन्टॅक्टची तपासणी करणं गरजेचं होतं. त्यामुळे खोटे दावे करण्याऐवजी काहीतरी चांगली भूमिका घेतली पाहिजे,” अशी टीकाही फडणवीसांनी यावेळी केली.

सरकार कुठे कमी पडतंय?

“आम्ही लॉकडाऊनचा नियोजन योग्य प्रकार करु शकलो नाहीत. मार्च आणि एप्रिलमध्ये 30 कोटी रेशन कार्ड लाभार्थ्यांना अन्नधान्य मिळालं नाही. क्वारंटाईन संदर्भात जे निर्णय घ्यायचे होते, ते घेतले गेले नाहीत.

मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन आणि ज्या व्यवस्था उभ्या करायच्या होत्या त्या व्यवस्था आम्ही उभ्या केल्या नाहीत. मी सातत्याने प्रयत्न करुन, मागे लागून बेड्सची माहिती देणारा डायनॅमिक डॅशबोर्ड बीएमसीने तयार केला. तो सुरुवातीलाच तयार केला असता तर मुंबईकरांना रस्त्यावर मरावं लागलं नसतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आयसीएमआरने जे सांगितलं होतं. कव्हरअप करण्याचा प्रयत्न केला. कुठेही ते वरळी पॅट्रन वगैरे बोललेच नव्हते. पण आपणच न्यूज छापून आणली. वरळी पॅटर्न देशभरात स्वीकारणार आणि सत्ताधारी मंत्र्यांनी ते ट्विट केलं,” असेही फडणवीस म्हणाले.

पाहा व्हिडीओ :

LIVE UPDATE 

  • केंद्राकडून किती आणि काय मिळालं आहे याची माहिती आशिष शेलारांनी दिली आहे, या सरकारला कोरोनाची चर्चा नको आहे, त्यांना माहिताय की यामध्ये आपण अपयशी ठरलो आहे
  • या सरकारला कोरोनावर चर्चा नको आहे, त्यांना राष्ट्रपती राजवटीची चर्चा करुन कोरोना परिस्थितीकडे दुर्लक्ष हवं आहे
  • आम्ही सरकार पाडण्याचा प्रयत्न करणार नाही, आता वेळ नाही, हे सरकार अंतरविरोधाने पडेल, ही राजकारणाची वेळ नाही
  • धमक्यांना आम्ही भीक घालत नाही, संजय राऊत सकाळी वेगळं लिहितात, संध्याकाळी वेगळं लिहितात, आमचं सोडा, अपक्षही इकडे तिकडे होणार नाहीत, तुम्ही तुमचं बघा, तुमचा पक्ष सांभाळा
  • आम्ही सरकारला पूर्ण पाठिंबा देऊ, ते म्हणतील तसे करु, फक्त सरकारने बनवाबनवी सोडावी
  • पत्रकारांवर दबाव आणला जात आहे, ट्रोल गँग तयार करुन विरोधकांवर आक्षेपार्ह टीका करण्यात येत आहे, फेक अकाऊंटवरुन काहीही केलं तरी सत्य जनतेपर्यंत पोहोचतं, आज महाराष्ट्रात संतापाची लाट, असा संताप मी यापूर्वी पाहिला नाही
  • माझी दूरदृष्टी चांगली आहे, उद्धवजींबद्दल चांगलं बोलत असतील तर चांगलं आहे, मला त्यांच्याबद्दल असुया नाही, जे सेलिब्रिटी आधी बोलत होते, ते आता गप्प का आहेत?
  • पृथ्वीराज चव्हाण, राहुल गांधी यांनीही उद्धव ठाकरेंकडे बोट दाखवलं, मला आताच्या क्षणी उद्धवजींवर टीका करायची नाही, कुठल्या वेळी काय बोलायचं आणि काय नाही हे मला कळतंय
  • उद्धवजी माझे मित्र, माझ्या मोठ्या भावासारखे आहेत, ते नवे आहेत, त्यांना शिकण्यासाठी काही महिने हवे ते आम्ही दिले, मात्र या परिस्थितीत कठोर निर्णयाची आवश्यक आहे, ते घेताना दिसत नाहीत
  • सरकारचं अस्तित्व कुठे आहे? अधिकारी सरकार चालवत आहेत, राजकीय नेतृत्त्वाने मोठे निर्णय घ्यावे लागतात, मात्र ते दिसत नाहीत, त्यांचे सहकारी दोन्ही पक्ष जबाबदारी झटकत आहेत
  • ICMR ने स्पाईक येईल असं म्हटलं, पण किती रुग्ण होतील याचे आकडे सांगितले नव्हते
  • वरळी पॅटर्न असा काहीच नव्हता, ICMR ने असं काही म्हटलं नाही, केवळ बातम्यांमधूनच ते समोर आणण्यात आलं
  • लॉकडाऊनचं पालन तंतोतंत झालं नाही, मार्च आणि एप्रिलमध्ये ३ कोटी रेशनधारकांना रेशन मिळालं नाही, पुरवठ्याचं विकेंद्रीकरण झालं नाही, रुग्णालयांचा डॅशबोर्ड सुरुवातीला करता आला असता
  • धारावीसारख्या ठिकाणी रुग्णांच्या संपर्कातील किंवा त्या भागातील प्रत्येकाची टेस्ट आवश्यक होते, मात्र बीएमसीने नियम बदलल्याने रुग्णांची संख्या वाढली
  • मुंबईत केवळ धारावी, वरळीत रुग्ण वाढले नाहीत, प्रत्येक वॉर्डमध्ये रुग्ण आहेत, सोसायट्यांमध्ये रुग्ण वाढलेत, धारावीसारख्या ठिकाणी जास्तीत जास्त संस्थात्मक क्वारंटाईन गरजेचं होतं
  • महाराष्ट्रात ३२ टक्के पॉजिटिव्ह केसेस येत आहेत, त्यामुळे टेस्टचं प्रमाण वाढवायला हवं, मात्र यांनी अनेकांना सोडून दिले, प्रतिकारशक्तीने जगले तर जगतील, नाहीतर मरतील, सरकारने बनवाबनवी न करता, उपाय शोधायला हवे
  • सरकार आकड्यांची फेकाफेकी करत असेल तर त्यांना आरसा दाखवायलाच हवा

संबंधित बातम्या 

सरकारच्या फेकाफेकीचा पर्दाफाश आम्हाला करावाच लागेल : देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीसांच्या प्रत्येक दाव्याला अनिल परब यांचं प्रत्युत्तर

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.