Devendra Fadnavis : ‘बरच सत्य हे माझ्याजवळ आहे’, देवेंद्र फडणवीसांचा अनिल देशमुखांना सूचक इशारा

Devendra Fadnavis : राज्याचे तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मोठा गौप्यस्फोट केला. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याशी समझौता करण्यासाठी माणूस पाठवला होता असा दावा देशमुख यांनी केला. त्यावर आता देवेंद्र फडणवीस बोलले आहेत. त्यांनी अत्यंत सूचक शब्दात इशारा दिला आहे.

Devendra Fadnavis : 'बरच सत्य हे माझ्याजवळ आहे', देवेंद्र फडणवीसांचा अनिल देशमुखांना सूचक इशारा
Devendra Fadnavis-Anil deshmukh
Follow us
| Updated on: May 10, 2024 | 11:17 AM

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याशी समझौता करण्यासाठी माणूस पाठवला होता, असा मोठा गौप्यस्फोट अनिल देशमुख यांनी केला. त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “ते सर्व कल्पित गोष्टी बोलत आहेत. बरच सत्य हे माझ्याजवळ आहे, योग्य वेळी मी ते बाहेर काढेन” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. “आज त्यांना निवडणुकीच्या निमित्ताने सनसनी पसरवायची आहे, मात्र ज्यावेळेस मी सत्य बाहेर काढेन, त्यावेळी त्यांच्या लक्षात येईल. त्यामुळे याच्यावर जास्त काही मी बोलत नाही” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“खरं म्हणजे, या ठिकाणी जी काही घटना घडलेली आहे, त्या घटनेमध्ये हे सरकारमध्ये होते. त्यांचं सरकार त्या ठिकाणी होतं, त्यांच्याच काळात सगळा तो फॉर्मचा आणि शंभर कोटीचा घोटाळा झाला आणि त्यानंतर त्यांनी मला काय निरोप पाठवले या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत. काळजी करू नका, योग्यवेळी मी बाहेर काढेन” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अनिल देशमुख यांच्यावर काय आरोप झालेले?

अनिल देशमुख यांचा काल वाढदिवस होता. त्या निमित्ताने त्यांच्या पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी आयोजित कार्यक्रमात अनिल देशमुख यांनी, देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याशी समझौता करण्यासाठी माणूस पाठवला होता हा गौप्यस्फोट केला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री होते. त्यांच्यावर तत्कालीन मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी कथित 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप केले होते. या आरोपांमुळे अनिल देशमुख यांना मंत्रीपद सोडाव लागलेलं. या आरोपांमुळे अनिल देशमुख यांना एकवर्षापेक्षा जास्त काळ तुरुंगात राहावं लागलं.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.