देवेंद्र फडणवीस काल शरद पवारांच्या निवासस्थानी, आज थेट एकनाथ खडसेंच्या घरी!

एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजप (BJP) सोडून राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात प्रवेश केल्यानंतर, देवेंद्र फडणवीस हे प्रथमच खडसेंच्या मतदारसंघात आहेत.

देवेंद्र फडणवीस काल शरद पवारांच्या निवासस्थानी, आज थेट एकनाथ खडसेंच्या घरी!
एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Jun 01, 2021 | 10:52 AM

जळगाव : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज जळगावातील मुक्ताईनगरमध्ये आहेत. ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजप (BJP) सोडून राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात प्रवेश केल्यानंतर, देवेंद्र फडणवीस हे प्रथमच खडसेंच्या मतदारसंघात आहेत. महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस हे आज एकनाथ खडसे यांच्या घरी जाऊन भाजप खासदार रक्षा खडसे यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, देवेंद्र फडणवीस आज मुक्ताईनगरमधील ग्रामीण रुग्णलयाचीही पाहणी करणार आहेत. याशिवाय वादळ आणि पावसामुळे झालेल्या नुकसानीचीही ते पाहणी करतील. (BJP Leader Devendra Fadnavis to meet BJP MP Raksha Khadse daughter-in-law of  Eknath Khadse at Muktainagar Jalgaon Maharashtra )

जळगाव जिल्ह्यातील भाजपची पडझड बघता पक्षबांधणी संदर्भात ही रक्षा खडसेंसोबत चर्चा होण्याची शक्यता आहे.  गेल्या आठवड्यात  मुक्ताईनगर पंचायतीमधील भाजपच्या आजी माजी दहा नगरसेवकांनी सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्याबाबत फडणवीस रक्षा खडसे यांच्याशी चर्चा करु शकतात.

आधी पवारांची भेट, आज खडसेंच्या घरी

देवेंद्र फडणवीस यांनी कालच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी फडणवीस हे पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर पोहोचले होते. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस हे एकनाथ खडसे यांच्या घरी जाणार आहेत.

एकनाथ खडसे यांनी 23 ऑक्टोबर 2020 रोजी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर तुफानी हल्ला चढवला होता. देवेंद्र फडणवीस यांनीच आपल्याला अतोनात त्रास दिला, अक्षरश: पक्षातून बाहेर पडण्यासाठी भाग पाडलं असा आरोप त्यावेळी एकनाथ खडसे यांनी केला होता.

“काही मिळालं, नाही मिळालं याचं दु:ख नाही, देवेंद्र फडणवीसांनी छळले. मी फक्त फडणवीसांवर नाराज आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले होते. माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आणि तो देवेंद्र फडणवीसांना गुन्हा दाखल करायला लावला याचा मनस्ताप झाला,” असं खडसे म्हणाले होते.

देवेंद्र फडणवीस शरद पवारांच्या भेटीला

विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आजकाल 31 मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक इथे जाऊन फडणवीस शरद पवारांना भेटले. स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. (BJPs Devendra Fadnavis meets NCP leader Sharad Pawar)

माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते श्री शरद पवारजी यांची आज त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली, असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

संबंधित बातम्या  

देवेंद्र फडणवीस भेटीसाठी शरद पवारांच्या घरी, सिल्व्हर ओकवर भेट

एकनाथ खडसे यांचा अखेर राष्ट्रवादीत प्रवेश, नव्या राजकीय इनिंगला सुरुवात!

(BJP Leader Devendra Fadnavis to meet BJP MP Raksha Khadse daughter-in-law of  Eknath Khadse at Muktainagar Jalgaon Maharashtra )

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.