विष्णू सवरा: हॉलीबॉल खेळाडू, बँक अधिकारी ते यशस्वी राजकारणी!

हॉलीबॉल खेळाडू, बँक अधिकारी ते यशस्वी राजकारणी असा माजी आदिवासी विकास मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते विष्णू सवरा यांचा राजकीय आणि सामाजिक कार्याचा आलेख राहिला आहे. (BJP leader, former Maharashtra minister vishnu savara biography and political career)

विष्णू सवरा: हॉलीबॉल खेळाडू, बँक अधिकारी ते यशस्वी राजकारणी!
Follow us
| Updated on: Dec 10, 2020 | 12:26 PM

मुंबई: राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री, मितभाषी आणि आदिवासींच्या समस्यांचा दांडगा अभ्यास असलेले नेते विष्णू सवरा यांचे बुधवार दिनांक 9 डिसेंबर रोजी वयाच्या 70व्या वर्षी निधन झालं. हॉलीबॉल खेळाडू, बँक अधिकारी ते यशस्वी राजकारणी असा त्यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याचा आलेख राहिला आहे. मितभाषी पण सर्वांशी मिळून वागणारा नेता, दांडगी स्मरशक्ती असलेला नेता आणि गोरगरिबांच्या, आदिवासींच्या उत्थानासाठी अहोरात्र झटणारा नेता म्हणूनही ते सर्वपरिचित होते. सवरा यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याचा घेतलेला हा आढावा. (BJP leader, former Maharashtra minister vishnu savara biography and political career)

वाणिज्य शाखेचे पदवीधर

विष्णू सवरा यांचा जन्म 1 जून 1950 रोजी झाला. त्यांनी वाणिज्य शाखेतून पदवी घेतली होती. त्यानंतर त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियात नोकरी पत्करली. मोठ्या पगाराची नोकरी असली तरी या नोकरीत ते दीर्घकाळ रमले नाहीत. आदिवासी समाजाची होत असलेली परवड… त्यांचं दारिद्रय आणि पाण्यासाठीही मैलो न् मैल करावी लागणारी पायपीट या सर्व गोष्टी पाहून सवरा अस्वस्थ होत. आपल्या बांधवांसाठी आपण काही तरी केलं पाहिजे, या भावनेतून त्यांनी 1980मध्ये बँकेतील नोकरी सोडली.

व्हॉलीबॉल खेळाडू

सवरा यांना खेळाची प्रचंड आवड होती. ते स्वत: उत्तम व्हॉलीबॉल खेळाडू होते. त्यांनी त्यांच्या मतदारसंघात आमदार चषकाच्या माध्यमातून क्रीडा स्पर्धा सुरू करून नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन दिलं. त्यामुळे आदिवासी पाड्यातील या विद्यार्थ्यांना नवं प्लॅटफॉर्म मिळालं. त्यातील शेकडो खेळाडूंना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधीही मिळाली.

मितभाषी नेता, दांडगी स्मरणशक्ती

सवरा हे अत्यंत मितभाषी होते. बोलण्यापेक्षा त्यांचा कामावर अधिक भर होता. मितभाषी असले तरी स्पष्टवक्ते म्हणूनही त्यांची ख्याती होती. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्यांची स्मरणशक्ती अत्यंत दांडगी होती. त्यांच्या मतदारसंघातील लोकांना, कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांना ते अगदी नावाने ओळखत असत. वृद्ध आणि तरुणांमध्येही ते लोकप्रिय होते. त्यांच्यासाठी जनरेशन गॅप असा कधी राहिलाच नव्हता.

संघाच्या कार्यात झोकून दिले

ऐंशीच्या दशकात आदिवासी पट्टयांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मोठे काम सुरू केले होते. त्याकडे सवरा आकर्षित झाले आणि त्यांनी संघाच्या कार्यात स्वत:ला झोकून दिले. संघाने सुरू केलेल्या आदिवासी विकासासाठीच्या प्रत्येक कार्यात त्यांनी भाग घेतला.

आदिवासी आघाडीचे अध्यक्ष ते भाजपचे जिल्हाध्यक्ष

संघात आल्यानंतर त्यांनी भाजपमध्येही कामाला सुरुवात केली. सुरुवातीला आदिवासी आघाडीचे अध्यक्ष, प्रदेश सचिव अशी जबाबदारी त्यांनी सांभाळली. त्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी आदिवासी पाड्यात मोठं काम केलं. आदिवासी भागांमध्ये भाजपची पाळंमुळं रुजवण्यात त्यांनी मोठं योगदान दिलं.

शिक्षणावर भर

आदिवासी समाज शिकला पाहिजे. शिक्षणामुळेच त्यांची प्रगती होऊ शकते, ही त्यांची धारणा होती. त्यामुळेच त्यांनी आदिवासी समाजात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून प्रचंड परिश्रम घेतले. त्यातून त्यांनी निवासी शाळांचे व्यवस्थापनही केले.

दोन पराभव

संघात काम करत असतानाच भाजपने त्यांना 1980मध्ये विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवले. वाडा मतदारसंघातून सवरा यांनी निवडणूक लढवली. पण राजकारणात नवख्या असलेल्या सवरा यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर 1985मध्ये त्यांनी पुन्हा वाडा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. यावेळीही त्यांचा अगदी थोड्या मतांनी पराभव झाला. दोनदा पराभव झाल्यानंतरही खचून न जाता सवरा यांनी त्यांचे सामाजिक आणि राजकीय कार्य सुरूच ठेवले होते.

… आणि विजयाची परंपरा सुरू झाली

दोनदा पराभव झाल्यानंतर सवरा यांनी पुन्हा एकदा मतदारसंघाची बांधणी सुरू ठेवली. त्यानंतर 1990, 1995, 1999 आणि 2004च्या चारही विधानसभा निवडणुकीत त्यांना भरघोस यश मिळाले. मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर 2009मध्ये त्यांनी भिवंडी ग्रामीण मतदारसंघातून निवडणूक लढवून विजयी परंपरा कायम ठेवली. 2014मध्येही विक्रमगड मतदारसंघातूनही ते विजयी झाले. मतदारसंघ बदलला तरी सवरा यांची लोकप्रियता आणि विजयी परंपरा खंडित झाली नाही. (BJP leader, former Maharashtra minister vishnu savara biography and political career)

तीस वर्षे विधानसभेत

सवरा यांनी सुमारे ३० वर्ष विधिमंडळात प्रतिनिधीत्त्व केले. विधिमंडळाचे एवढ्या दीर्घ काळ प्रतिनिधीत्व करणारे कदाचित ते एकमेव आदिवासी नेते असतील. 1990, 1995, 1999, 2004, 2009 आणि 2014 असे सलग सहा वेळा ते निवडून आले.

आदिवासी विकास मंत्री म्हणून उल्लेखनीय कार्य

पालघर जिल्ह्यातून सलग सहा वेळा निवडून आलेल्या सवरा यांना 2014मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी मिळाली. फडणवीस सरकारमध्ये त्यांनी आदिवासी विकास मंत्री म्हणून काम केलं. त्यांनी मंत्रिपदाची सूत्रे हाती घेताच अनेक प्रश्न मार्गी लावले. खासकरून आदिवासी विद्यार्थ्यांच्या आश्रम शाळेचा प्रश्न त्यांनी आस्थेवाईकपणे हाताळला. धडाकेबाजपणे काम करणारा मंत्री म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. (BJP leader, former Maharashtra minister vishnu savara biography and political career)

निवडणुकीतील विजयी परंपरा

>> 1990 : आमदार भिवंडी (ग्रा) मतदारसंघ >> 1995 : आमदार भिवंडी (ग्रा) मतदारसंघ >> 1999 : आमदार भिवंडी (ग्रा) मतदारसंघ >> 2004 : आमदार वाडा मतदारसंघ >> 2009 : आमदार वाडा मतदारसंघ >> 2014 : आमदार विक्रमगड मतदारसंघ

सवरांचे सामाजिक, राजकीय कार्य

>> आमदार म्हणून आदिवासींच्या कल्याणासाठी त्यांनी विधानसभेत शेकडो कपात सूचना मांडल्या. लक्षवेधी आणि तारांकित प्रश्न मांडून आदिवासींच्या प्रश्नाकडे राज्याचे लक्ष वेधले.

>> सवरा यांनी आमदार निधी, डोंगरी विकास निधी, विशेष घटक योजना, नाबार्ड, हुडको, विशेष दुरुस्ती, वैज्ञानिक विकास, कोकण विकास व अर्थसंकल्पाच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील अनेक कामे मार्गी लावली.

>> त्यांनी आदिवासी शेतकरीही कर्जमुक्त व्हावा म्हणून कर्जमुक्तीचा लढाही उभारला होता.

>> दुष्काळ, अतिवृष्टी असो की कुपोषणाचा प्रश्न… त्यांनी प्रत्येक आघाडीवर आदिवासी समाजाची बाजू लावून धरली.

>> ठाणे जिल्हा अत्यंत मोठा असल्यामुळे प्रशासकीय कामासाठी वाडा, मोखाडा आणि जव्हार येथील आदिवासींना ठाण्यात यावे लागायचे. त्यासाठी त्यांचा खर्चही व्हायचा आणि वेळही प्रचंड जायचा. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातून पालघरला वेगळं करून नवा पालघर जिल्हा निर्माण व्हावा ही मागणी त्यांनी लावून धरली. नुसती त्यांनी मागणी केली नाही तर पालघर जिल्ह्याच्या निर्मितीसाठी स्वत: प्रयत्नही केले. (BJP leader, former Maharashtra minister vishnu savara biography and political career)

संबंधित बातम्या:

माजी आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांचे निधन

(BJP leader, former Maharashtra minister vishnu savara biography and political career)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.