‘सामना’चं नाव बदलून आता ‘बाबरनामा’ ठेवा, गोपीचंद पडळकरांची शिवसेनेवर जळजळीत टीका
Gopichand Padalkar on Shivsena | गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेना आणि काँग्रेसमधील जवळीक सातत्याने वाढत आहे. खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यातही संवाद वाढताना दिसत आहे.
मुंबई: शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’चं नाव आता ‘बाबरनामा’ ठेवा, अशी झणझणीत टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. शिवसेना खासदार यांच्या ‘सामाना’तील रोखठोक सदरात लिहलेल्या लेखावरुन पडळकर यांनी शिवसेनेला लक्ष्य केले. जनाब संजय राऊत यांनी सामनाचे रूपांतर बाबरनामात केल्यानंतर आता हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब #ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे विलीनीकरण काँग्रेसमध्ये करण्याचा जणू काही विडाच उचललेला दिसतोय, असे गोपीचंद पडळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता शिवसेनेकडून गोपीचंद पडळकर यांना कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेना आणि काँग्रेसमधील जवळीक सातत्याने वाढत आहे. खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यातही संवाद वाढताना दिसत आहे. नुकतीच दिल्लीत या दोन्ही नेत्यांची भेट झाली होती. या भेटीचा तपशील संजय राऊत यांनी ‘रोखठोक’मधून जाहीर केला होता. त्याचे पडसाद सध्या राजकीय वर्तुळात उमटत आहेत.
जनाब #संजय राऊत यांनी #सामनाचे रूपांतर बाबरनामात केल्यानंतर आता हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब #ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे विलीनीकरण #कॉंग्रेसमध्ये करण्याचा जणू काही विडाच उचललेला दिसतोय.#BJPMaharashtra pic.twitter.com/i9jQI46gRy
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) October 10, 2021
संजय राऊत आणि राहुल गांधींची भेट
मंगळवारी दुपारी मी दिल्लीत राहुल गांधीं यांना भेटले. 12, तुघलक लेन हे त्यांचे निवासस्थान. राहुल गांधी लाल रंगाचे टी-शर्ट व पायजमा अशा साध्या वेशात गप्पा मारत होते. ‘या लोकांनी देशात काय चालवले आहे पाहा.’ अशी सुरुवात राहुल गांधी यांनी केली. ‘यह लोक लोकतंत्र को पुरी तरह से खतम करने जा रहे है। लेकीन हम लढेंगे!’ हे त्यांचं पुढचे विधान अधिक महत्त्वाचे. प्रियंका गांधी तुरुंगात होत्या व उत्तर प्रदेश सरकारने राहुल यांच्या या बहिणीस 36 तास बेकायदेशीरपणे डांबून ठेवले. ‘आप चिंता मत करिये,’ असे मी म्हणताच, ‘हम जेल की चिंता नही करेंगे। प्रियंका में हिम्मत है। मी उद्याच लखनौला निघतोय. मला अटक झाली तरी हरकत नाही,’ असे राहुल गांधी म्हणाले.
‘पंजाबचा तिढा सुटला काय?” – संजय राऊत ‘नक्कीच. सगळे आमदार काँग्रेससोबतच आहेत. जुन्या व्यवस्थेवरच त्यांची नाराजी होती.” – राहुल गांधी. ‘सिद्धूचे काय करणार?” – संजय राऊत ‘तेसुद्धा शांत होतील.” – राहुल गांधी.
आप आणि तृणमूल काँग्रेस मतांचे विभाजन घडवून भाजपचाच फायदा करुन देतायत, राहुल गांधींना खंत
आप आणि तृणमूल काँग्रेस मतांचे विभाजन घडवून भाजपचाच फायदा करून देत आहेत. गोव्यात काही संबंध नसता तृणमूल व आप आली आणि त्यांनी काँग्रेसचे आमदार फोडले. पैशांचा वापर त्यासाठी सगळेच करतात ही खंत गांधींनी बोलून दाखवल्याचं राऊतांनी रोखठोकमध्ये म्हटलंय.
हे ही वाचा :