…मग, शरद पवारांची XXXX ची टोळी आहे का? भाजपा आमदाराच संजय राऊतांना प्रत्युत्तर, VIDEO
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची आज सत्ताधारी पक्षावर टीका करताना जीभ घसरली. फडणवीसांची गांडू बुळचट शिवसेना म्हटलं, त्यावर आता भाजपाने त्याच भाषेत प्रत्युत्तर दिलय. "मराठी माणसाने आयुष्यभर नोकरी करावी, वडापाव खावा आणि संजय राऊतच्या मुलीने वाईनच्या कंपनी उघडाव्यात" अशी टीका सुद्धा केली.
खासदार संजय राऊत यांची आज सत्ताधारी पक्षावर टीका करताना जीभ घसरली. घाटकोपर येथील एका गुजराती बहुल सोसायटीत महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दीना पाटील यांची पत्रक वाटण्यापासून रोखण्यात आलं, असा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यावर आज खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी खालच्या पातळीची टीका केली. “शिवसेना शिंदेगट ही बुळचट शिवसेना आहे. ही फडणवीसांची गांडू शिवसेना गप्प आहे. हिम्मत असेल आवाज द्या, आम्ही बघतो काय करायचं ते. काल बहुसंख्य गुजराती राहत असलेल्या घाटकोपरच्या एका सोसायटीत शिवसैनिकांना मराठी आहेत म्हणून येण्यापासून रोखलं, ही फडणवीसांची गांडू बुळचट शिवसेना काय करतेय? उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेने हे आव्हान स्वीकारलय” असं संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी, फडणवीसांची गांडू बुळचट शिवसेना म्हटलं, त्यावर कणकवलीचे भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं. “मग, शरद पवारांच्या टोळीला XXXX म्हणायचं का? ती भाषा आम्हाला सुद्धा करता येते. भाषा योग्य वापरा. भाषेची स्पर्धा लावली तर तुम्ही कुठे रेंजमध्ये सुद्धा दिसणार नाही” असं नितेश राणे म्हणाले. घाटकोपरमध्ये गुजराती बहुल इमारतीत मविआला पत्रक वाटण्यापासून रोखण्यावर नितेश राणे म्हणाले की, “आमचे मिहिर कोटेचा निवडून आल्यात जमा आहे, उद्धव ठाकरे गट रडीचा डाव खेळतोय”
‘राऊतच्या मुलीने वाईनच्या कंपनी उघडाव्यात’
“मराठी माणसाने आयुष्यभर नोकरी करावी, वडापाव खावा आणि संजय राऊतच्या मुलीने वाईनच्या कंपनी उघडाव्यात. मराठी माणसाला नोकरी, वडापावपर्यंत ठेवण्याच काम यांनी केलय. मराठी माणसावर बोलण्याचा नैतिक अधिकार यांना नाहीय. कारण अजूनपर्यंत मराठी माणसाचा जो टक्का कमी झाला, मराठी माणसाला मुंबई सोडण्याची पाळी आली, त्याला हे जबाबदार आहेत” अशी टीका नितेश राणे यांनी केली.