Video : कोव्हिड काळात मुख्यमंत्री पैसे मोजण्यात व्यस्त म्हणून मानेचा त्रास, किरीट सोमय्यांचं ठाकरेंच्या दुखण्यावर बोट

कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पैसे मोजण्यात व्यस्त होते. तर बायकोचा बंगला वाचवण्यात व्यस्त होते. मिलिंद नार्वेकर यांचा बंगला वाचवण्यात व्यस्त होते. अनिल परब यांच्या बांधकामात व्यस्त होते, अशा अनेक कामात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्यक्त होते, अशी खोचक टीका सोमय्या यांनी केलीय. ठाकरे सरकारने लुटीच्या साम्राज्याची स्थिती उभी केलीय. तर अजित पावरांचे मेहुणे आणि मामाला ईडीचे निमंत्रण आलं असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय.

Video : कोव्हिड काळात मुख्यमंत्री पैसे मोजण्यात व्यस्त म्हणून मानेचा त्रास, किरीट सोमय्यांचं ठाकरेंच्या दुखण्यावर बोट
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, किरीट सोमय्या
Follow us
| Updated on: Nov 13, 2021 | 4:02 PM

बुलडाणा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मान आणि मणक्याचा त्रास सुरु झाल्याने त्यांच्यावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, लवकरच ते कामावर रुजू होतील अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. अशावेळी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका केलीय. मुख्यमंत्री कोरोना काळात पैसे मोजण्यात व्यस्त होते, असा घणाघात सोमय्या यांनी केलाय. (BJP leader Kirit Somaiya criticizes CM Uddhav Thackeray)

किरीट सोमय्या यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पैसे मोजण्यात व्यस्त होते. तर बायकोचा बंगला वाचवण्यात व्यस्त होते. मिलिंद नार्वेकर यांचा बंगला वाचवण्यात व्यस्त होते. अनिल परब यांच्या बांधकामात व्यस्त होते, अशा अनेक कामात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्यक्त होते, अशी खोचक टीका सोमय्या यांनी केलीय. ठाकरे सरकारने लुटीच्या साम्राज्याची स्थिती उभी केलीय. तर अजित पावरांचे मेहुणे आणि मामाला ईडीचे निमंत्रण आलं असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय.

येत्या 31 डिसेंबरपर्यंत ठाकरे सरकारमधील 40 मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढून महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करण्याचा आमचा संकल्प आहे. तर अजित पवार यांच्यावर आयकर विभागाने टाकलेल्या धाडीत त्यांचे मामा आणि मेहुणे यांना ईडीचे निमंत्रण आले आहे. येत्या 31 डिसेंबर पर्यंत ठाकरे सरकार मधील 40 मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढून महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करण्याचा संकल्प आमचा आहे, असा इशाराही सोमय्या यांनी दिलाय.

मुख्यमंत्र्यांसाठी सोमय्यांची प्रार्थना!

सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली असली तरी त्यांची प्रकृती चांगली व्हावी यासाठी प्रार्थना करतो. नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राने करावी असंही किरीट सोमय्या म्हणाले.

एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारवर टीका

राज्यातील एसटी कर्मचारी संपावर आहेत. त्यावर तोडगा निघालेला नाही. असं असलं तरी सरकारमधील मंत्री फक्त वसुलीमध्ये व्यस्त असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय. तसंच कर्मचाऱ्यांना पगार मिळत नाही म्हणून ते आत्महत्या करत आहेत. त्यांनी आंदोलन केलं तर त्यांना जेलमध्ये टाकलं जात आहे. राज्य सरकारनं एसटी कर्मचारी संपावर तोडगा काढला पाहिजे, असं आवाहन सोमय्या यांनी केलंय.

सोमय्यांकडून बुलडाणा अर्बन बँकेला क्लीन चिट?

सार्वजनिक बामधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेड जिल्ह्यातील 4 साखर कारखान्यांना कर्ज दिल्या प्रकरणी आयकर विभागाने बुलडाणा अर्बन बँकेवर धाड टाकून खळबळ उडवून दिलीय होती. बँकेतील 1200 खाती बनावट असल्याचे सांगून 54 कोटी रुपयांचा हिशेब लागत नसल्याचं सांगत, ती खाती होल्ड ठेवली आहेत, असा आरोप करत सोमय्या आज बुलडाण्यात आले होते. सोमय्या यांनी बँकेत जाऊन अध्यक्ष राधेशाम चांडक यांची भेट घेत सर्व माहिती घेतली. तसंच बँक आयकर विभागालाही सहकार्य करेल असं बँकेकडून सांगण्यात आल्याचं सोमय्या म्हणाले.

इतर बातम्या :

आक्रोशाची ठिणगी संभाजीनगरात, वणवा दिल्लीत पोहोचणार, संजय राऊत यांचा केंद्र सरकारला इशारा

न घडलेल्या घटनेचे निषेध मोर्चे धोकादायक, सरकारने गांभीर्याने घ्यावे, देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

BJP leader Kirit Somaiya criticizes CM Uddhav Thackeray

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.