रविंद्र वायकरांना क्लीन चीट मिळाल्यानंतर किरीट सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “मी याप्रकरणी…”

जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी रविंद्र वायकरांना मुंबई पोलिसांनी क्लीन चीट दिली आहे. आता यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भाष्य केले आहे.

रविंद्र वायकरांना क्लीन चीट मिळाल्यानंतर किरीट सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले मी याप्रकरणी...
रविंद्र वायकर किरीट सोमय्या
Follow us
| Updated on: Jul 06, 2024 | 4:30 PM

Kirit Somaiya Reaction on Ravindra Waikar Clean Chit : मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे नवनियुक्त खासदार रविंद्र वायकर यांना क्लीन चीट मिळाली आहे. जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी रविंद्र वायकरांना मुंबई पोलिसांनी क्लीन चीट दिली आहे. मुंबई महापालिकेने गैरसमजातून हा गुन्हा दाखल केल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे. त्यामुळे रविंद्र वायकरांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. आता यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भाष्य केले आहे.

जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी क्लीन चीट

किरीट सोमय्या यांनी मुंबईतील जोगेश्वरी या भागात भूखंड घोटाळा झाल्याचा आरोप रविंद्र वायकरांवर केला होता. या कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणात रविंद्र वायकर यांचा हात असल्याचे बोललं जात होतं. मुंबई महापालिकेच्या जागेवर 500 कोटींच्या 5 स्टार हॉटेलचं बांधकाम केल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला होता. मातोश्री स्पोर्ट्स ट्रस्टचा आणि सुप्रिमो बँक्वेटच्या नावाने शेकडो कोटींच्या घोटाळ्याचा आरोप असल्याचे ते म्हणाले होते.

यानंतर याप्रकरणी सर्वोच्च न्यायलयात सुनावणी सुरु होती. आता याप्रकरणी मुंबई पोलिसांनी रविंद्र वायकरांना क्लीन चीट दिली आहे. जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी EOW कडून कोर्टात सी समरी रिपोर्ट सादर करण्यात आला. यानंतर आता मुंबई महापालिकेने गैरसमजातून हा गुन्हा दाखल केल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटलं. त्यानंतर रविंद्र वायकरांवरील सर्व गुन्हे मागे घेत त्यांना क्लीन चीट दिली गेली.

हे सुद्धा वाचा

किरीट सोमय्या काय म्हणाले?

किरीट सोमय्या यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांना रविंद्र वायकर यांच्या क्लीन चीटबद्दल प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी थोडक्यात उत्तर दिलं. “हे प्रकरण सर्वोच्च न्यायलयापर्यंत गेलं होतं. त्यामुळे मी याप्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही”, असे किरीट सोमय्या म्हणाले.

तुमचं रक्त शुद्ध असेल तर बोला, संजय राऊतांची टीका

या प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर निशाणा साधला होता. सोमय्या हा फडतूस माणूस आहे. त्याने वायकरांवरील खटला मागे घेतला त्यावर बोलावं. जर हे कोणी सत्यवचनी असतील तर हे भ्रष्टाचारी वॉशिंग मशीनमध्ये घेऊन धुवायचं काम चालू आहे, त्यावर बोलावं. वायकरांसारख्या लोकांवरील खटले कसे मागे घेतले जातात, त्यावर बोलावं. जर तुम्ही खरे असाल, तुमचं रक्त शुद्ध असेल तर बोला. तुम्ही बनावट असाल तर तुम्ही बोलणार नाहीत, अशी टीका संजय राऊतांनी केली होती.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.