खोतकर नरमले, आता परभणीत बंडाळी, युतीचं टेन्शन वाढलं!
परभणी : जालना लोकसभा मतदारसंघातील शिवसेना नेते अर्जुन खोतकर आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यातील वाद मिटल्यानंतर सेना-भाजप युतीने सुटकेचा निश्वास सोडला होता. तोच आता परभणीत नवा वाद उभा राहिला आहे. परभणीतील भाजप नेत्या मेघना बोर्डीकर यांनी बंड केले आहे. परभणी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय जाधव यांच्यासमोर मेघरना बोर्डीकर यांनी मोठं आव्हान उभं […]
परभणी : जालना लोकसभा मतदारसंघातील शिवसेना नेते अर्जुन खोतकर आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यातील वाद मिटल्यानंतर सेना-भाजप युतीने सुटकेचा निश्वास सोडला होता. तोच आता परभणीत नवा वाद उभा राहिला आहे. परभणीतील भाजप नेत्या मेघना बोर्डीकर यांनी बंड केले आहे. परभणी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय जाधव यांच्यासमोर मेघरना बोर्डीकर यांनी मोठं आव्हान उभं केलं आहे.
मेघना बोर्डीकर या भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या सदस्या आहेत. शिवसेना-भाजपच्या फॉर्म्युल्यानुसार परभणीची जागा शिवसेनेच्या पारड्यात पडते. परभणीतून संजय जाधव हे शिवसेनेचे विद्यमान खासदारही आहेत. मात्र, इथून लढण्यास इच्छुक असलेल्या भाजपच्या मेघना बोर्डीकर यांनी बंडखोरी केली आहे.
मेघना बोर्डीकर यांच्या पाठीमागे परभणी लोकसभा मतदारसंघातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते उभे असल्याने, शिवसेना-भाजप युतीचे धाबे दणाणले आहे.
परभणी लोकसभा मतदारंसघातून अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवणार असे जाहीर करत मेघना बोर्डीकर यांनी शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय जाधव यांच्यासमोर मोठं संकट उभं केलं आहे. परभणीतून मेघन बोर्डीकर अपक्ष लढणार असल्याने आता शिवसेना, राष्ट्वादी आणि वंचित बहुजन आघाडी यांचेही उमेदवार असतील. त्यामुळे परभणीत यंदा चौरंगी लढत असेल.
निवडणुकीच्या तारखा जाहीर
केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.
लोकसभा निवडणूक : तुमच्यासाठी 5 अत्यंत महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.