मुंबई : सध्या राज्यात ईडी (ED) अॅक्टिव्ह आहे. विरोधीपक्षातील नेते त्यांच्या निशाण्यावर आहेत. नुकतंच शिवसेनेचे खासदार संजय राऊतांना ईडीने अटक केली. त्यानंतर नेक्स्ट कोण? याचं उत्तर भाजपचे नेते मोहित कंबोज(Mohit Kamboj) यांनी भविष्यवाणी करणाऱ्या ट्विटमधून दिलंय. “माझं हे ट्विट सेव्ह करुन ठेवा! अनिल देखमुख, नवाब मलिकांपाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याची बारी आहे. लवकरच हा नेता मलिक, देशमुखांच्या भेटीला जाणार आहे. तेव्हा जेलवारीसाठी तयार राहा!”, असं सूचक इशारा देणारं ट्विट मोहित कंबोज यांनी केलंय. त्यांच्या या ट्विटने जेलमध्ये जाणारा राष्ट्रवादीचा तिसरा नेता कोण असा प्रश्न चर्चेत आला आहे. तर दुसरीकडे पुढे घडणाऱ्या घडामोडी कंबोज यांना आधीच कश्या माहिती होतात असा प्रश्न विचारला जातोय.
मोहित कंबोज यांच्या ट्विटनंतर राष्ट्रवादीचा तिसरा नेता कोण? असा प्रश्न चर्चेत आला आहे. राष्ट्रावादीतील काही नेत्यांनी ईडीकडून चौकशी सुरु आहे. खुद्द शरद पवार यांच्यासह अजित पवारांचीही ईडीकडून चौकशी सुरु आहे. तर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचीही सीजे हाऊसमधील पुनर्बांधणी प्रकरणी चौकशी सुरू आहे. पटेल यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता राजकीय वर्तुळात प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची चर्चा आहे. कंबोज सुचवू पाहणारे ‘राष्ट्रवादीचे मोठे नेते’ प्रफुल्ल पटेलच असल्याची जोरदार चर्चा आहे.
प्रफुल्ल पटेलांची ईडी चौकशी
प्रफुल्ल पटेल यांच्या मुंबईतील सीजे हाऊसमधील घरावराची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. वरळीमध्ये सीजे हाऊस ही मोठी इमारत आहे. या इमारतीच्या बांधकामाआधी त्या जागेवर एक छोटीशी इमारत होती. ही इमारत गँगस्टर इक्बाल मिर्ची याच्या ताब्यात होती. या कंपनीची पुनर्बांधणी प्रफुल्ल पटेल यांच्या कंपनीने केली होती. त्या मोबदल्यात प्रफुल पटेल यांनी इक्बाल मिर्ची आणि त्याच्या कुटुंबीयांना काही जागा आणि रोख रक्कम दिली होती. या व्यवहारात गैरप्रकार झाल्याचा ईडीला संशय आहे. त्यामुळे पैशांची अफरातफर झाल्याचे कारण पुढे करून मनी लॉंडरिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी प्रफुल्ल पटेलांची चौकशी सुरू आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. आता प्रफुल पटेल ईडीच्या रडारवर आहेत. 2019 मध्ये विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीआधी काही नेत्यांना ईडीने नोटीस बजावली होती. प्रफुल पटेल यांनाही तेव्हाच नोटीस देण्यात आली होती.
कंबोज भाजपच्या वरच्या फळीत?
सध्या कंबोज यांचं भाजपतील वाढतं वजन पाहता ते भाजपच्या वरच्या फळीत पोहोचले असल्याची चर्चा आहे. चंद्रकांत पाटील, किरीट सोमय्या ईडी प्रकरणांवर बोलताना दिसतात. तेवढंच आक्रमकपणे कंबोजही आपली बाजू मांडतात. त्यामुळे त्यांची गणना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये होत असल्याची चर्चा आहे.
एक दिवस तीन ट्विट!
सिंचन घोटाळा प्रकरणाची पुन्हा चौकशी झाली पाहिजे, 2019 मध्ये परमबीर सिंग यांनी चौकशी बंद केली होती!, असं ट्विट कंबोज यांनी केलं आहे.
मी लवकरच पत्रकार परिषद घेऊन एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचाी पोलखोल करणार आहे त्यात देशातील आणि परदेशातील मालमत्तेची यादी, बेनामी कंपन्या, गर्ल फ्रेंड्सच्या नावावरील मालमत्ता, विविध पोर्टफोलिओमध्ये मंत्री म्हणून केलेला भ्रष्टाचार ,कौटुंबिक उत्पन्न आणि मालमत्ता यादी!, अस ट्विट कंबोज यांनी केलंय.
I Will Be Doing Press Conference Soon And Exposing NCP BIG Leader :-
1:- List Of Assets India & Abroad
2:- Benami Companies
3:- Properties on Girl Friends Name
4:- Corruption Done As Minister in Various Portfolio
5: Family Income And Assets List !
मोहित कंबोज यांचं एक ट्विट सध्या चर्चेत आलंय. “माझं हे ट्विट सेव्ह करुन ठेवा! अनिल देखमुख, नवाब मलिकांपाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याची बारी आहे. लवकरच हा नेता मलिक, देशमुखांच्या भेटीला जाणार आहे. तेव्हा जेलवारीसाठी तयार राहा!”, असं सूचक इशारा देणारं ट्विट मोहित कंबोज यांनी केलंय.