आदेश बांदेकर जय महाराष्ट्र म्हणतात, की होम मिनिस्टर, हेच कळत नाही, निलेश राणेंचा हल्लाबोल
जे बाहेरून आलेले लोक आहेत, ते शिवसेना भवनाविषयी अशी वक्तव्यं करतात, या शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना निलेश राणेंनी आदेश बांदेकरांवर निशाणा साधला.
मुंबई : आदेश बांदेकर जय महाराष्ट्र म्हणतो, की होम मिनिस्टर म्हणतो, हेच कळत नाही, ही अवस्था आजच्या अखंड शिवसेनेची. आजचे शिवसैनिक धड जय महाराष्ट्र बोलू शकत नाहीत, अशा शब्दात माजी खासदार आणि महाराष्ट्र भाजपचे सचिव निलेश राणे (Nilesh Rane) यांनी शिवसेना नेते आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यांच्यावर टीकास्त्र डागलं. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना निलेश राणेंनी बांदेकरांवर निशाणा साधला.
काय म्हणाले निलेश राणे?
“शिवसेनेत बाहेरच्यांचीच संख्या जास्त आहे, संजय राऊत मोजून बघा. मोबाईलची बटणं दाबणारे शिवसैनिक भरलेत आजच्या शिवसेनेत. आदेश बांदेकर जय महाराष्ट्र म्हणतो की होम मिनिस्टर म्हणतो हेच कळत नाही, ही अवस्था आजच्या अखंड शिवसेनेची. आजचे शिवसैनिक धड जय महाराष्ट्र बोलू शकत नाही, संजय राऊत काय सांगतात” अशा आशयाचं ट्वीट निलेश राणे यांनी केलं आहे.
शिवसेनेत बाहेरच्यांचीच संख्या जास्त आहे, संज्या मोजून बघ. मोबाईलची बटन दाबणारे शिवसैनिक भरलेत आजच्या शिवसेनेत. आदेश बांदेकर जय महाराष्ट्र म्हणतो की होम मिनिस्टर म्हणतो हेच कळत नाही, ही अवस्था आजच्या अखंड शिवसेनेची. आजचे शिवसैनिक धड जय महाराष्ट्र बोलू शकत नाही, संज्या काय सांगतो.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 2, 2021
संजय राऊत काय म्हणाले होते?
शिवसेना भवन फोडण्याची भाषा करणारे भाजप आमदार प्रसाद लाड यांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सज्जड दम दिला होता. शिवेसना भवन फोडण्याची भाषा करणारे भूमिगत झाल्याचं कळलं आहे. हिंमत असेल तर समोर या. स्वत:च्या पायावर याल, पण खांद्यावर जाल, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला होता.
महाराष्ट्रातला कुठलाही राजकीय पक्ष किंवा त्यांचे नेते कार्यकर्ते असो, ज्यांना महाराष्ट्र आणि मराठी अस्मितेविषयी जाणीव आहे ते असे कोणतेच विधान करणार नाहीत. मूळ भाजचे लोक असे विधान कधीच करणार नाही. देवेंद्र फडणीस असतील आशिष शेलार असतील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहाही असतील. कोणीही असं विधान करणार नाही. जे बाहेरून आलेले लोक आहेत. जे बाटगे आहेत. ते आपली निष्ठा दाखवण्यासाठी असं विधान करून लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात, असंही राऊत म्हणाले होते.
आदेश बांदेकरांचा राजकीय प्रवास
आदेश बांदेकर यांनी सप्टेंबर 2009 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. 2009 च्या विधानसभा निवडणुका त्यांनी माहीम मतदारसंघातून लढवली, मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस नितीन सरदेसाई यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. त्यानंतरही त्यांनी शिवसेनेच्या नेतृत्वात आपले काम चालू ठेवले. 2012 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. चार वर्षांपूर्वी (जुलै 2017) आदेश बांदेकर यांची श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. 2018 मध्ये फडणवीस सरकारच्या काळात या पदाला राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला. आदेश बांदेकर यांची श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी जुलै 2020 पासून पुढील तीन वर्षांसाठी पुनर्नियुक्ती करण्यात आली
सदा सरवणकरांवरही टीकास्त्र
त्याआधीही “हे काय ऐकतोय मी, की संजय राऊत धमकी द्यायला लागले, संजय राऊत तुम्ही फटाके खाणारच आहात, पण खास तुमच्यासाठी, तुम्हाला सेनाभवनच्या आत नेऊन फटके टाकणार. काय दिवस आलेत शिवसेनेचे संपादक धमक्या देत आहेत आणि काँग्रेस सोडून शिवसेनेत गेलेले सदा सरवणकर सेनाभवनची रखवाली करतायत.” अशी टीकाही निलेश राणेंनी केली.
हे काय ऐकतोय मी की संज्या धमकी द्यायला लागलाय, संज्या तू फटाके खाणारच आहेस पण खास तुझ्यासाठी तुला सेनाभवनच्या आत नेहून फटके टाकणार. काय दिवस आलेत शिवसेनेचे संपादक धमक्या देतोय आणि काँग्रेस सोडून शिवसेनेत गेलेले सदा सरवणकर सेनाभवनची रखवाली करतायत.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 2, 2021
संबंधित बातम्या :
हिंमत असेल तर समोर या, स्वत:च्या पायावर याल, पण खांद्यावर जाल; संजय राऊतांचा इशारा
पुन्हा भावोजीच! आदेश बांदेकर यांची श्रीसिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती
(BJP Leader Nilesh Rane slams Shivsena Leader Aadesh Bandekar while answering MP Sanjay Raut)