आम्हाला आता उद्धवजींमध्ये राहुल गांधी स्पष्ट दिसू लागलेयत; नितेश राणेंचा खोचक टोला
Nitesh Rane | उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यात आता फरकच उरलेला नाही, हे मी आत्मविश्वासाने सांगतो, असे ट्विट नितेश यांनी केले. त्यामुळे आता शिवसेनेकडून या टीकेला काय प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
मुंबई: दसरा मेळाव्यातील भाषणानंतर आता आम्हाला उद्धवजींमध्ये राहुल गांधी स्पष्टपणे दिसू लागले आहेत. यामध्ये कोणतीही शंका उरलेली नाही, अशी खोचक टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली. उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यात आता फरकच उरलेला नाही, हे मी आत्मविश्वासाने सांगतो, असे ट्विट नितेश यांनी केले. त्यामुळे आता शिवसेनेकडून या टीकेला काय प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या भाषणात राणे कुटुंबीयांवर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. आज काहीजण केवळ माझं भाषण संपण्याची वाट पाहत असतील. भाषण कधी थांबतंय आणि कधी एकदा चिरकतोय, अशी काहींची अवस्था आहे. कारण शिवसेना आणि ठाकरे कुटुंबावर टीका करणं, चिरकणं यातून त्यांना रोजगार मिळतो, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते.
After Dussehra speech..
With full confidence I can say..
Humko uddhavji mein Rahulji ekdum clear dekte hain!!!
Koi doubt nahi!!
— nitesh rane (@NiteshNRane) October 15, 2021
उद्धव ठाकरेंचा पुन्हा हिंदुत्वाचा नारा, मुंबई पालिकेसाठी ‘बंगाल पॅटर्न’ राबवण्याची हाक?
दसऱ्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलं होतं. स्वातंत्र्य लढ्यातील पश्चिम बंगालच्या योगदानाचे दाखले देत उद्धव ठाकरेंनी मुंबई पालिकेसाठी ‘बंगाल पॅटर्न’ राबवण्याची हाक दिली. भाजपमुळेच हिंदुत्व धोक्यात असल्याचा इशारासुद्धा त्यांनी दिलाय.
‘आम्ही तुमच्या पालखीचे भोई नाही’
आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी भाजपला प्रत्युत्तर दिले. केवळ तुमची पालखी वाहत नाही म्हणून शिवसेना भ्रष्टाचारी झाल्याचे आरोप होत आहेत. मागेही सांगितलं आम्ही पालखीचे भोई आहोत. जरूर आहोत. पण ती आमची राष्ट्रभक्ती आणि देशभक्तीची पालखी आहे. हिंदुत्वाची पालखी आहे. तुमची पालखी वाहणारे आम्ही भोई नाही आहोत. तुमच्या पक्षाच्या पालख्या वाहण्यासाठी शिवसैनिकांचा जन्म झाला नाही. देव, देश आणि धर्मासाठी जन्म झाला आहे. तो शिवसैनिक तुम्ही भ्रष्ट ठरवत आहात? का तर तुमच्या पालख्या वाहत नाही म्हणून? वाईट काळात शिवसैनिक चालत होता. आता मात्र चालत नाही. हर्षवर्धन पाटील तुमच्यात आले तर पवित्र झाले. गटाराचं पाणी तुमच्यात टाकलं तर गंगा. ते पाणी दुसरीकडे टाकलं तर गटारगंगा. ही जी काही थेरं सुरू आहेत ते हिंदुत्व नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
संबंधित बातम्या:
केंद्राच्या लुडबुडीचा अतिरेक होतोय? उद्धव ठाकरे म्हणतात, आता सर्व राज्यांनी एकत्र येण्याची वेळ
भाजप, हर्षवर्धन पाटील आणि उद्धव ठाकरेंच्या भाषणात ‘गटारगंगा’, उद्धव ठाकरे नेमके काय म्हणाले?