Radhakrishna Vikhe Patil : ‘अजितदादा परत आमच्यासोबत या’, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विधानानं खळबळ

नुकतंच राज्यसभा निवडणूक पार पडली यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षांना मागे सारत भाजपने सहावी जागा आपल्या पारड्यात पाडली. यानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांनी तर अजित पवारांना भाजपसोबत येण्याचं आमंत्रणच दिलं आहे.

Radhakrishna Vikhe Patil : 'अजितदादा परत आमच्यासोबत या', राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विधानानं खळबळ
Follow us
| Updated on: Jun 13, 2022 | 12:40 PM

मुंबई : भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केलेल्या वक्तव्यानं चर्चांना उधाण आलंय. अजितदादा परत आमच्यासोबत या, असं विधान त्यांनी केलंय. या विधानानं महाराष्ट्राच्या राजकारण पुन्हा खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबाबत प्रश्न विचारला असता राधाकृष्ण विखे पाटील यांनी अजितदादांचं कौतुक केलंय. तसंच त्यांना पुन्हा सोबत येण्याच सल्लाही दिलाय. पुष्कर श्रोत्री यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीमध्ये त्यांनी हे विधान केलंय. दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेलं हे विधान त्यांचं वैयक्तिक मत आहे, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय.

नेमकं काय म्हणाले विखे पाटील?

पुष्कर श्रोत्री यांनी विखे पाटील यांना प्रश्न विचारताच, राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय की…. “अजितदादा परत आमच्यासोबत या, अजित पवार स्पष्टवक्ते आहेत, त्यांची कमिटमेन्ट आहे! त्यांना माझा एवढाच सल्ला आहे, आता परत तुम्ही बरोबर या, हाच मला त्यांना सल्ला द्यायचाय! बरोबर या, असा मला त्यांना सल्ला द्यायचाय…”

नुकतंच राज्यसभा निवडणूक पार पडली यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षांना मागे सारत भाजपने सहावी जागा आपल्या पारड्यात पाडली. यानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांनी तर अजित पवारांना भाजपसोबत येण्याचं आमंत्रणच दिलं आहे.

हे सुद्धा वाचा

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्याची राजकीय गणितं बदलली. अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जात पहाटेचा शपथविधी केला. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. त्यामुळे आताही अजित पवारांनी आमच्या सोबत यावं, असं आमंत्रण राधाकृष्ण विखे पाटील दिलं आहे.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...