नाथाभाऊंचा उपयोग राज्याच्या भल्यासाठी करुन घ्यावा, विरोधकांवर टीकेसाठी करु नये, रावसाहेब दानवेंचा सल्ला

विरोधी पक्षनेत्यांवर किंवा पक्षातील अध्यक्षावर काही परिणाम होईल अस काही नाही," असेही दानवे म्हणाले. (Raoshaheb Danve On Eknath Khadse NCP Joining)

नाथाभाऊंचा उपयोग राज्याच्या भल्यासाठी करुन घ्यावा, विरोधकांवर टीकेसाठी करु नये, रावसाहेब दानवेंचा सल्ला
Follow us
| Updated on: Oct 23, 2020 | 11:24 AM

औरंगाबाद : भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसेंचा उपयोग हा राज्याच्या भल्यासाठी करुन घ्यावा, विरोधकांवर टीका करण्यासाठी करु नये, असा सल्ला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. गेल्या 4 दशकांपासून राजकारणात सक्रीय असलेले एकनाथ खडसे आज राष्ट्रवादीत जाहीररित्या प्रवेश करणार आहेत. यावरुन रावसाहेब दानवेंनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना राष्ट्रवादीला सल्ले दिले. (Raoshaheb Danve On Eknath Khadse NCP Joining)

“नाथाभाऊ जर तिथे गेले तर त्यांचा उपयोग अशा कामासाठी न करता, ते ज्येष्ठ आणि अभ्यासू कार्यकर्ते आहेत. त्यांचा उपयोग या राज्याच्या भल्यासाठी करावा. नाथाभाऊंचा उपयोग विरोधकांवर तोफ डागण्यासाठी करुन घेऊ नये. त्यांचा उपयोग भल्यासाठी करुन घ्यावा,” असे रावसाहेब दानवे म्हणाले.

“कोणाच्या रोखल्याने कोणी रोखलं जात नसतं. 2019 च्या निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे, असं वाटतं भाजपलाही अशापद्धतीने काही मोठे नेते फोडून नुकसान पोहोचवता येत का, असा त्यांचा प्रयोग सुरु आहे. ते आता सरकारमध्ये आहेत. त्यामुळे त्यांच्या जाण्याने आमच्या नेत्यांवर, विरोधी पक्षनेत्यांवर किंवा पक्षातील अध्यक्षावर काही परिणाम होईल अस काही नाही,” असेही दानवे म्हणाले.

“आम्हाला उत्तर महाराष्ट्राची चिंता नाही”

“आमच्या सरकारमध्ये पारदर्शक काम झाली आहेत. कुणी कितीही आरोप केला तरी त्याचा परिणाम आमच्यावर होत नाही. आम्हाला उत्तर महाराष्ट्राची चिंता नाही. पण नाथाभाऊ गेल्याचं दु:ख आहे,” असेही रावसाहेब दानवेंनी सांगितले.

“ज्यांनी त्यांच्यावर आरोप केले. त्याच पक्षात जाण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे. त्यांनी जाऊ नये यासाठी अनेक प्रयत्न केले,” असेही दानवेंनी यावेळी म्हटलं.

“नाथाभाऊ माझे चांगले मित्र”

“नाथाभाऊ माझे चांगले मित्र आहेत. मी त्यांच्या प्रत्येक वाढदिवसाला जातो. त्यांच्या शेतात, फार्महाऊसवरही जातो. ते पंढरपूरला आल्यावर माझ्या घरी येतात. आम्ही अगदी घरगुती संबंध आहेत,” असेही त्यांनी यावेळी सांगितले. (Raoshaheb Danve On Eknath Khadse NCP Joining)

संबंधित बातम्या : 

‘तुम मुझे व्होट दो, हम तुम्हे व्हॅक्सीन देगें’; संजय राऊतांचा भाजपला टोला

एकनाथ खडसेंचा आज राष्ट्रवादीत प्रवेश, खडसेंसोबत 8 ते 10 माजी आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.