‘सत्ता येणार असल्याचे स्वप्न पाहणाऱ्या मविआत खातेवाटपावरुन भांडणे सुरू’, सुधीर मुनगंटीवार यांचा टोला

"मोदी पंतप्रधान होणार नाहीत आणि भाजप पक्ष फुटणार हे मुंगेरीलाल के हसीन सपने असून अशा टीका थांबवता येत नाही. सत्ता येणार असल्याचे स्वप्न पाहणाऱ्या महाविकास आघाडीमध्ये खातेवाटपावरुन भांडणे सुरू झाली आहेत", असा टोला भाजप नेते तथा मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला.

'सत्ता येणार असल्याचे स्वप्न पाहणाऱ्या मविआत खातेवाटपावरुन भांडणे सुरू', सुधीर मुनगंटीवार यांचा टोला
सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते
Follow us
| Updated on: May 16, 2024 | 11:00 PM

चौथ्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार अचानक गायब झाल्याच्या चर्चांवर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिलीय. “अजित दादा कमी ठिकाणी प्रचाराला गेल्याची हूल उडवणाऱ्यांची कीव येते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार प्रचारात कुठेही कमी पडले नाहीत”, अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. “मोदी पंतप्रधान होणार नाहीत आणि भाजप पक्ष फुटणार हे मुंगेरीलाल के हसीन सपने असून अशा टीका थांबवता येत नाही. सत्ता येणार असल्याचे स्वप्न पाहणाऱ्या महाविकास आघाडीमध्ये खातेवाटपावरुन भांडणे सुरू झाली आहेत”, असा टोला भाजप नेते तथा मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला. तर 5 जूनपर्यंत त्यांना आनंदात राहू द्या असे म्हणत पब्लिक हैं सब जानती हैं असे सांगत मुनगंटीवार यांनी महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.

“जिरेटोप हे प्रतीक आहे. मोदींनी जिरेटोप घातला नाही तर कार्यकर्त्यांनी प्रेमापोटी सत्कार करताना घातला. यात मोदींजींचा काय दोष? विरोधक शरद पवारांना जाणता राजा म्हणतात. अफजल गुरूला फाशी देऊ नका म्हणत कसाबला बिर्याणी खाऊ घालतात. अमेरिकेत जाऊन देशाची निंदा करतात. मणिपूरमध्ये भारत मातेचा मृत्यू झाला असे सांगतात. त्यांच्या बुद्धिची कीव येते. हा राजकारणाचा विषय असू शकतो का? देवाने यांना चांगली बुद्धी दिली असती तर त्यांनी अशी वक्तव्ये केली नसती. मोदींजींच्या डोक्यावर घातलेल्या जिरेटोपावर केलेली टीका म्हणजे बुद्धी कमी असल्याचे प्रतीक”, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

‘ते स्वतःच्या मनाचे समाधान करून घेतात’

“विरोधकांकडे विकासाचे मुद्दे नाहीत. वैफल्यग्रस्त झाल्याने आशा पद्धतीचे वक्तव्य केली जात आहेत. मोदी प्रधानमंत्री बनणार नाहीत अशी वक्तव्ये करून स्वतःच्या मनाचे समाधान करून घेत आहेत. परंतु ते खोटं समाधान आहे. 20 जागांवर लढणारे ठाकरे आणि 10 जागांवर लढणारे शरद पवार पंतप्रधान होऊ शकतील का? असा सवाल इंडिया आघाडीत अस्थिरता आहे. महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीमधील कोणीही पंतप्रधान पदाच्या उमेदवाराबद्दल बोलत नाही. पहिल्यांदा गुणपत्रिका द्या. नंतर आम्ही उत्तरपत्रिका देऊ अशी अवस्था आहे”, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

‘सत्ता येणार नसल्याचे लक्षात आल्याने…’

“इंडिया आघाडीला फुटण्याची शक्यता असल्याने पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करत नाहीत. सत्ता येणार नसल्याचे लक्षात आल्याने प्रादेशिक पक्ष काँग्रेस पक्षात विलीन करण्याचा नवीन विचार पुढे आला आहे. आपण सर्व एकत्र आलो तरीही मोदीजींचा पराभव करणे शक्य नाही, म्हणून त्यांनी असा निर्णय केला आहे. काँग्रेसमध्ये जायचं आणि थोड्याशा इक्विटीच्या भरोशावर काँग्रेस पक्ष ताब्यात घ्यायचा. काँग्रेसमध्ये प्रादेशिक पक्ष विलीन करण्याचा नवीन विचार आहे. काँग्रेस नावाची पारिवारिक कंपनी चालवायची”, अशी जहरी टीका मंत्री मुनगंटीवार यांनी सातपाटी येथे केली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.