AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेत इनकमिंग सुरु, भाजपमध्ये गेलेल्या माहिमच्या माजी आमदाराची घरवापसी होणार?

Suresh Gambhir | बऱ्याच काळापासून ते भाजपवर नाराज होते. परिणामी ते भाजपमध्ये कधीच फारसे रमले नाहीत. सुरेश गंभीर यांनी नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे सुरेश गंभीर आणि त्यांच्या दोन्ही कन्यांची शिवसेनेत घरवापसी होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

शिवसेनेत इनकमिंग सुरु, भाजपमध्ये गेलेल्या माहिमच्या माजी आमदाराची घरवापसी होणार?
शिवसेना-भाजप
Follow us
| Updated on: Sep 06, 2021 | 12:19 PM

मुंबई: आगामी वर्षात होऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेत इनकमिंगला सुरुवात झाली आहे. माजी आमदार आणि भाजपचे विद्यमान नेते सुरेश गंभीर हे लवकरच शिवसेनेत घरवापसी करणार असल्याचे समजते. त्यामुळे आता मुंबईत पालिका निवडणुकीच्यादृष्टीने फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. (BJP leader Suresh Gambhir may join Shivsena soon)

सुरेश गंभीर हे शिवसेनेचे माजी आमदार होते. 2016 मध्ये त्यांनी शिवबंधन सोडून भाजपचे कमळ हातात घेतले होते. मात्र, बऱ्याच काळापासून ते भाजपवर नाराज होते. परिणामी ते भाजपमध्ये कधीच फारसे रमले नाहीत. सुरेश गंभीर यांनी नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे सुरेश गंभीर आणि त्यांच्या दोन्ही कन्यांची शिवसेनेत घरवापसी होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

सुरेश गंभीर यांनी उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर यावर स्पष्टपणे बोलण्यास नकार दिला. परंतु, मी मनाने अजूनही शिवसैनिक असल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी केले. सुरेश गंभीर यांनी 2016 साली शीतल आणि शामल या आपल्या दोन मुलींसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. यापैकी शीतल गंभीर या सध्या वॉर्ड क्रमांक 182 मधील भाजपच्या नगरसेविका आहेत. तर भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवलेल्या शामल यांचा पराभव झाला होता. आता या तिघांच्या घरवापसीमुळे राजकीय वतुर्ळात काय पडसाद, उमटणार हे पाहावे लागेल.

कोण आहेत सुरेश गंभीर?

सुरेश गंभीर हे शिवसेनेच्या जुन्या फळीतील नेत्यांपैकी एक आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात 1978 साली ते माहीम परिसरातून पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. नंतरच्या काळात सुरेश गंभीर माहीम मतदासंघातून चारवेळा विधानसभेवर निवडून गेले होते.

शिवसेना-भाजपमध्ये काँटे की टक्कर

भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पातळी सोडून केलेली टीका आणि त्यानंतर त्यांना झालेली अटक यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्षाची मोठी ठिणगी पडली आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळेल. मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेचा भगवा खाली उतरवण्यासाठी भाजपने वर्षभरापूर्वीच मोर्चेबांधणीला सुरुवात केली होती. त्यासाठी भाजपचे आक्रमक नेते अतुल भातखळकर यांची प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली होती.

तर काही दिवसांपूर्वीच नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिपद देऊन भाजपने त्यांना शिवसेनेविरोधात सक्रिय केले आहे. नारायण राणे यांच्या नुकत्याच पार पडलेल्या जनआशीर्वाद यात्रेमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. यावेळी शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये झालेला संघर्ष आगामी काळात आणखी तीव्र होणार, हे निश्चित आहे.

संबंधित बातम्या:

मुख्यमंत्र्यांचं अज्ञान, अनिल परबांचा दबाव, राणेंच्या अटकेमागची CBI चौकशी करा, Video दाखवून भाजपची मागणी

भाजपचा शिवसेना भवनावर फटकार मोर्चा, शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांची प्रचंड हाणामारी

PHOTOS : राम मंदिर जमीन घोटाळ्यावरुन सेना भवनासमोर राडा, शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड हाणामारी

(BJP leader Suresh Gambhir may join Shivsena soon)

पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक.
नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य
नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य.
400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; काय काय झालं? कुरेशींनी सगळंच सांगितलं
400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; काय काय झालं? कुरेशींनी सगळंच सांगितलं.
आम्ही भारतीय सैन्यासोबत; सीमेवरील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
आम्ही भारतीय सैन्यासोबत; सीमेवरील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; काय झाली चर्चा?
मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; काय झाली चर्चा?.
जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, रामगडमध्येही सापडले बॉम्बचे तुकड
जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, रामगडमध्येही सापडले बॉम्बचे तुकड.
गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र
गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र.
IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?
IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?.
पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?
पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?.
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण.