सनी देओल ‘हे’ 7 दमदार डायलॉग प्रचारात वापरणार?

अभिनेता सनी देओलने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत सनी देओलचा भाजपप्रवेश पार पडला. यावेळी सनी देओलला माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांची आठवण झाली. मात्र, निर्माला सीतारमण यांना सनी देओलच्या ‘बॉर्डर’ सिनेमा आठवला. सनी देओलचे असे अनेक डायलॉग आहेत, जे सिनेरसिकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. आजही […]

सनी देओल 'हे' 7 दमदार डायलॉग प्रचारात वापरणार?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:58 PM

अभिनेता सनी देओलने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत सनी देओलचा भाजपप्रवेश पार पडला. यावेळी सनी देओलला माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांची आठवण झाली. मात्र, निर्माला सीतारमण यांना सनी देओलच्या ‘बॉर्डर’ सिनेमा आठवला.

सनी देओलचे असे अनेक डायलॉग आहेत, जे सिनेरसिकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. आजही त्या डायलॉग्जची लोकप्रियता कायम आहे. हे डायलॉग भाजप आपल्या प्रचारात वापरण्याची शक्यता आहे. पाहूया असे कोणते डायलॉग आहेत, ज्यांचा भाजप वापर करु शकते.

  1. जेव्हा सनी देओल निवडणुकीच्या प्रचारासाठी व्यासपीठावर येईल, तेव्हा –

आप अपने बच्चों को एक ऐसा शहर विरासत में देना चाहते हैं जो गुंडे, बदमाश और ख़ूनी चला रहे हों. – नरसिम्हा

  1. भाजपचे सर्व नेते आपापल्या भाषणात पाकिस्तानवर डायलॉगबाजी करत असतात. सनी देओललाही अशी संधी मिळाली, तर भाजपचे घीसेपीटे डायलॉग वापरण्यापेक्षा तो त्याच्या सिनेमातीलच डॉयलॉग मारेल. फक्त त्याला ‘अशरफ अली’च्या जागी पाकिस्तानच्या विद्यमान पंतप्रधानाचं नाव रिप्लेस करावं लागेल.

अशरफ अली! आपका पाकिस्तान ज़िंदाबाद है, इससे हमें कोई ऐतराज़ नहीं लेकिन हमारा हिंदुस्तान ज़िंदाबाद है, ज़िंदाबाद था और ज़िंदाबाद रहेगा! – गदर

  1. सनी देओलला जेव्हा व्हिक्टिम कार्ड खेळायचं असेल, तेव्हा तो काय करेल? म्हणजे चहावाला, चौकीदार तर मोदी बनले आहेत, मग सनी देओलसाठी काय उरलं? तर इथेही सनी देओलला काळजी करण्याचं कारण नाही. कारण यावेळी ‘घातक’मधील डायलॉग त्याच्या मदतीला धावून येईल.

ये मज़दूर का हाथ है कात्या, लोहा पिघलाकर उसका आकार बदल देता है! ये ताकत ख़ून-पसीने से कमाई हुई रोटी की है. मुझे किसी के टुकड़ों पर पलने की जरूरत नहीं.- घातक

  1. जेव्हा एखादा विरोधी पक्षातील नेता ‘कमल कमल कमल कमल कमल कमल कमल कमल कमल कमल कमल’ सारखं काही नौटंकी करत असेल, तर त्यावेळी सनी देओल म्हणेल…

जाओ बशीर ख़ान जाओ, किसी नाटक कंपनी में भर्ती हो जाओ, बहुत तरक्की मिलेगी तुम्हे, अच्छी एक्टिंग कर लेते हो. – घायल

  1. सनी देओल सोशल मीडियावरही सक्रीय होईल. कधीतरी फोटोशॉप्ड इमेजही शेअर करेल. मग ट्रोल होईल. त्यावेळी संतापून सनी देओल म्हणेल…

डरा के लोगों को वो जीता है जिसकी हडि्डयों में पानी भरा हो. इतना ही मर्द बनने का शौक है न कात्या, तो इन कुत्तों का सहारा लेना छोड़ दे. – घातक

  1. पुन्हा एकदा व्हिक्टिम कार्ड खेळायचं असल्यास, सनी देओल म्हणेल…

जो दर्द तुम आज महसूस करके मरना चाहते हो, ऐसे ही दर्द लेकर हम रोज़ जीते हैं. – घातक

  1. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्यासाठी सनी देओल प्रचाराला गेल्यावर म्हणेल…

चिल्लाओ मत, नहीं तो ये केस यहीं रफा-दफा कर दूंगा. न तारीख़ न सुनवाई, सीधा इंसाफ. वो भी ताबड़तोड़. – दामिनी

सनी देओल प्रचारात यातील कोणते डायलॉग प्रचारात वापरेल का, ते माहित नाही. मात्र, त्याच्या प्रचारसभांवेळी अशा डायलॉगची मागणी समोरील प्रेक्षकांमधून नक्कीच होईल. पंजाबमधील गुरुदासपूरमधून सनी देओलला तिकीटही मिळालं आहे. त्यामुळे तिथे प्रचारादरम्यान सनी देओल नक्की कुठले डायलॉग म्हणतो, हे येत्या काळात कळेलच.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.