खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदार संघात भाजपचा दुसरा दौरा, कल्याण लोकसभेवर नेमका दावा कुणाचा?

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदार संघात अनुराग ठाकूर यांचा सलग दुसरा दौरा असून लवकरच तिसरा दौराही होणार असल्याचं सूतोवाच त्यांनी यावेळी केलं.

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदार संघात भाजपचा दुसरा दौरा, कल्याण लोकसभेवर नेमका दावा कुणाचा?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 14, 2023 | 2:19 PM

निनाद करमरकर, कल्याणः राज्यात शिंदे-भाजप (Shinde BJP) युतीचं सरकार आहे. आगामी विधानसभा (Assembly Election) आणि लोकसभा (Loksabha) निवडणुकांमध्ये हीच युती कायम ठेवण्याचे सूतोवाच करण्यात आले आहे. भाजपचे दिग्गज नेते अन् शिंदे गटाकडूनही हे वारंवार सांगण्यात येतंय. मात्र शिवसेनेच्या आणि आता शिंदे गटाच्या ताब्यात असलेल्या महत्त्वाच्या जागांवर भाजप दावा ठोकणार की काय अशी स्थिती आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या मतदार संघातवरच भाजप दावा सांगणार की काय, अशी स्थिती आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण डोंबिवली मतदार संघात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी नुकताच दौरा केला. भाजपच्या मंत्र्याचा हा सलग दुसरा दौरा आहे.

अनुराग ठाकूर काय म्हणाले?

कल्याण डोंबिवली मतदार संघात बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप एकत्रितरित्या अधिक लक्ष देऊन लढू तसेच पहिल्यापेक्षा अधिक मतानी निवडून येऊ अशी आशा अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केली. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे भाजप पक्षवाढीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघात आले होते. पत्रकारांशी बोलताना त्यांनी विरोधी पक्ष आणि यूपीए सरकारचा चांगलाच समाचार घेतला.

लोहा लोहे को काटत है…

देशात खेळाची टीम असो किंवा सैन्य.. कुणाची निवड जाती धर्माला बघून नाही तर आपल्या उत्कृष्ठ कर्यावरून निवड केली जाते, असा टोला अनुराग ठाकूर यांनी जदयूनेता गुलाब रसूल यांना लगावला आहे. ते म्हणाले, ‘ लोहा लोहे कों काटत आहे गाजर नाही… आतंकवाद्यांबरोबर लढायचे असेल तर तीस टक्के सेनेत मुस्लिम तरुणांना भरती करा अशी मागणी jdu नेता गुलाब रसूल यांनी केंद्राकडे केली होती . या वर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी देशांमध्ये खेळाची टीम असो किंवा सैन्याची टीम असो कोणत्याही जाती धर्मावरून निवड केली जात नाही तर त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्यावरून निवड केली जाते असे उत्तर दिले.

‘संजय राऊतांच्या घोटाळ्यांवर बोला..’

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केलेला शपथ विधीवर संजय राऊत यांनी दहा अजूबे दुनियेत असून दोन दिल्लीत आणि एक महाराष्ट्रात असल्याची टीका देवेंद्र फडणवीसांवर केली होती. यावर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रत्युत्तर देत त्यांच्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. यापेक्षा संजय राऊत यांनी केलेल्या घोटाळ्यावर चर्चा केली तर अधिक बरे होईल, असे मत ठाकूर यांनी व्यक्त केले.

हे सरकार कोसळणार नाही-अनुराग ठाकूर

विरोधी पक्ष कायमच सरकार कोसळणार असे मत व्यक्त करत आहेत. यावर प्रत्युत्तर देताना अनुराग ठाकूर यांनी ते नुसतीच आशा धरून बसलेले आहेत. मात्र त्यांची निराशा होणार आहे. हे सरकार कोसळणार नाही तर अधिक मजबुतीने महाराष्ट्राचा विकास करणार आहे अशी प्रतिक्रिया अनुराग ठाकूर यांनी दिली.

‘तिसरा दौऱाही लवकरच’

अनुराग ठाकूर यांनी गेल्या दोन महिन्यापूर्वी केलेल्या दौऱ्यामध्ये आयुक्त भाऊसाहेब दांडगे यांचा स्मार्ट सिटीच्या अर्धवट कामावरून समाचार घेतला होता. या संदर्भात पत्रकारांनी पुन्हा प्रश्न विचारला असता नक्कीच कामाची गती वाढली असून पुढल्या वेळी जो दौरा करीन त्यात महापालिकेने काय कामे पूर्ण केली आहेत, याचा आढावा घेईन आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करेन असे सांगितले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.