BJPचं मिशन 2024 लोकसभा! 2019 मध्ये जिथे पराभव तिथेच ताकतीनं घाव, मोदी-शहा डावपेचांतले 5 मुद्दे

एकिकडे विरोधी पक्ष काँग्रेसला अध्यक्ष शोधण्यापासून तयारी करायची आहे. तर दुसरीकडे मिशन 2024 साठी भाजपने कंबर कसली आहे. उच्च पातळीवर रणनीती आखल्यानंतर मोदी-शहा जोडगोळीकडून राजकीय डावपेचांची अंमलबजावणीही सुरु झाली आहे.

BJPचं मिशन 2024 लोकसभा! 2019 मध्ये जिथे पराभव तिथेच ताकतीनं घाव, मोदी-शहा डावपेचांतले 5 मुद्दे
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Sep 02, 2022 | 10:40 AM

नवी दिल्लीः मिशन 2024 लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) भाजपने (BJP) मोठी रणनीती आखली आहे. विजयासाठी जे जे काही करता येईल, ते ते सर्व काही करण्याची तयारी भाजपची असते, हे तर आता जगजाहीरच आहे. अनुभवाअंती शहाणपण या उक्तीनुसार भाजपने आधी आपल्या उणीवा दूर करण्यावर भर दिल्याचं दिसून येतंय. 2019 लोकसभा निवडणुकीत जिथं जिथं पराभवाचे वार झेललेत तिथेच सर्व ताकतीनिशी उतरण्याचं भाजपनं ठरवलंय. मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या (NCP) बालेकिल्ल्यात भाजपच्या नेत्यांचे दौरे सुरु झालेत. तर तिकडे उत्तर प्रदेशातल्या गाझियाबादमध्येही स्थानिक राजकीय नेत्यांचे मेळावे, संवाद कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. महाराष्ट्रातल्या शिवसेना खासदारांना आपल्या गोटात वळवण्याचे प्रयत्न तर अनेक दिवसांपासून सुरु असल्याची चर्चा आहे. याशिवाय मोदी-शहांच्या मिशन लोकसभेसाठी आणखीही काही महत्त्वाचे मुद्दे आहेत.

टार्गेट बारामती

बारामती लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्यासाठी भाजपने मोठी रणनीती आखली आहे. येत्या 5 सप्टेंबर रोजी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बारामतीत येत आहेत. तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्याही दौऱ्याची चर्चा रंगली आहे. अजून निवडणुकांसाठी बराच अवधी असला तरी बारामतीत भाजप नेत्यांचे दौरे, उद्घाटन कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.

काँग्रेसचा बालेकिल्ला गाझियाबाद

काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या गाझियाबाद मतदार संघावर मागील दोन निवडणुकांमध्ये भाजपने बाजी मारली आहे. मात्र यंदादेखील ही जागा आपल्याच ताब्यात राहण्यासाठी मोठी रणनीती आखली आहे. गुरुवारी गाझियाबाद प्रदेश समितीचे जिल्हाध्यक्ष इतर पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. 2019 मध्ये येथे भाजपने मेजर व्ही के सिंह यांना तिकिट दिले होते. सपाच्या उमेदराला पराभूत करत सिंह यांचा विजय झाला होता.

हे सुद्धा वाचा

शिवसेनेच्या खासदारांवर नजर

येन केन प्रकारेण.. या उक्तीप्रमाणे लोकसभेतील प्रभावी चेहरे आपल्या गोटात वळवण्याचेही भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे गटाकडे अनेक आमदार वळाल्यानंतर शिवसेनेच्या खासदारांनाही गळती लागली. शिवसेनेच्या 18 पैकी 12 खासदारांना शिंदे गटाकडे वळवण्यात भाजपला यश आलंय. त्यापुढची रणनीतीही आखली जातेय.

महाराष्ट्रात मिशन 48

महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. 2019 मध्ये भाजपने 23 तर शिवसेनेनं 18 जागांवर विजय मिळवला होता. आता या जागा काबीज करण्यासाठी भाजपने आक्रमक रणनीती आखली आहे. गेल्या महिन्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक दिल्ली वाऱ्या झाल्या. त्यात या मुद्द्यावरून डावपेच आखले गेल्याची चर्चा आहे.

भाजपचे 9 मंत्री दौऱ्यावर

महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या 16 लोकसभा मतदार संघांसाठी भाजपची विशेष प्लॅनिंग असल्याची चर्चा आहे. यासाठी 9 केंद्रीय मंत्रीही दौऱ्यावर येणार आहे. पुढील 18 महिन्यांत राज्यातील मुंबई, दक्षिण मुंबई, पालघर, रायगड आणि शिर्डी, बारामती औरंगाबाद, बुलडाणा, चंद्रपूर या मतदार संघात केंद्रीय मंत्र्यांचा दौरा आहे. देशभरातील अशा 144 लोकसभा मतदार संघांसाठी भाजपने रणनीती आखल्याची माहिती अंतर्गत सूत्रांनी दिली आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.