दारुच्या दुकानांमुळे नाही तर मंदिरं उघडल्यामुळे रुग्ण वाढले, महारापौरांचा तर्कट, हा शिवसेनेचा खरा चेहरा : अतुल भातखळकर

महापालिका आयुक्त किशोरी पेडणकेर यांनी रुग्णवाढीबाबत केलेल्या वक्तव्यावरुन भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे (BJP MLA Atul Bhatkalkar slams Kishori Pednekar).

दारुच्या दुकानांमुळे नाही तर मंदिरं उघडल्यामुळे रुग्ण वाढले, महारापौरांचा तर्कट, हा शिवसेनेचा खरा चेहरा : अतुल भातखळकर
Follow us
| Updated on: Nov 20, 2020 | 9:02 PM

मुंबई : महापालिका आयुक्त किशोरी पेडणकेर यांनी रुग्णवाढीबाबत केलेल्या वक्तव्यावरुन भाजप आमदार अतुल भातकळकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. दिवाळीत राज्यातील प्रार्थनास्थळे उघडल्यामुळेच कोरोना रुग्णांची संख्या वाढली, असा दावा किशोरी पेडणेकर यांनी केला होता. या दाव्यावरुन भातखळकर यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत शिवसेनेवर टीका केली आहे (BJP MLA Atul Bhatkalkar slams Kishori Pednekar).

“दारुची दुकाने, बार आणि रेस्टॉरंट राज्य सरकारने केव्हाच उघडली आहेत. पण रुग्ण मात्र चार दिवसांपूर्वी उघडलेल्या मंदिरामुळे वाढले, हे महापौरांचे तर्कट आहे. हा तर्क नाही शिवसेनेचा खरा चेहरा आहे”, असा घणाघात भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला (BJP MLA Atul Bhatkalkar slams Kishori Pednekar).

किशोरी पेडणेकर नेमकं काय म्हणाल्या होत्या?

दिवाळीत राज्यातील प्रार्थनास्थळे उघडल्यामुळेच कोरोना रुग्णांची संख्या वाढली, असे वक्तव्य महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी केले. मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आलेली नाही. मात्र, ती येण्यास वेळही लागणार नाही. कोरोना खूप वाईट आहे, तो अजून संपलेला नाही. त्यामुळे योग्य काळजी न घेतल्यास हाहा:कार उडेल, अशी भीती महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केली.

दिवाळीनंतर राज्याच्या काही भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर यांनी शुक्रवारी ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी लोकल ट्रेन आणि शाळा सुरु करण्याबाबत अजूनही सबुरी बाळगली पाहिजे, असे मत व्यक्त केले. शाळा सुरु झाल्या की ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’, या मोहिमेत खंड पडेल. सोशल मीडियावरही पालक शाळा उघडू नका, हेच म्हणत आहेत. त्यामुळे मुंबई परिसरातील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे महापौरांनी सांगितले.

दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट, मुंबईकरांनो सावधान, पालिका आयुक्तांचे आवाहन गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट आल्याचे पाहायला मिळत आहे. दिल्लीत कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहे. तसेच त्या ठिकाणी कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी मुंबईकरांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे.

राज्यात सध्या जरी कोरोना नियंत्रणात असला तरी दिवाळीनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, असे बोलले जात आहे. दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वाढत चालली आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मुंबईत कोरोनाची स्थिती वाढू नये, याची काळजी घेत आहे.

संबंंधित बातम्या:

Mumbai School | दिल्ली इफेक्ट, मुंबईतील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार, आयुक्तांचा निर्णय

मुंबईतील सर्व शिक्षकांच्या अँटी पीसीआर चाचण्या, पालिका प्रशासनाचा निर्णय

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.