शरद पवारांविरुद्ध पुन्हा पडळकरांनी रान पेटवलं, पुतळ्याच्या लोकार्पणावरून पडळकर, खोत रस्त्यावर

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा शरद पवारांविरुद्ध रान पेटवलं आहे. कालचा दिवस किरीट सोमय्या आणि निलेश राणे यांनी गाजवल्यानंतर आजचा दिवस गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत गाजवत आहेत.

शरद पवारांविरुद्ध पुन्हा पडळकरांनी रान पेटवलं, पुतळ्याच्या लोकार्पणावरून पडळकर, खोत रस्त्यावर
गोपीचंद पडळकर पवारांविरुद्ध आक्रमकImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 27, 2022 | 4:33 PM

सांगली : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand padalkar) यांनी पुन्हा एकदा शरद पवारांविरुद्ध (Sharad Pawar) रान पेटवलं आहे. कालचा दिवस किरीट सोमय्या आणि निलेश राणे यांनी गाजवल्यानंतर आजचा दिवस गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत गाजवत आहेत. सांगलीतल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar) यांच्या पुतळ्याच्या लोकार्पणाचा वाद पेटला आहे. शरद पवारांच्या हस्ते लोकार्पण करण्यास भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी कडाडून विरोध केला आहे. त्यांच्या खांद्याला खांदा लावून सदाभाऊ खोतही पूर्ण ताकदीनिशी रस्त्यावर उतरले आहेत. पिवळे झेंडे घेऊन भाजप कार्यकर्त्यांनी सांगलीला आज पिवळं रुप दिलंय. ज्या शरद पवरांनी गोरगरिबांची फसवणूक केली. त्या पवारांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होऊ नये अशी आक्रमक भूमिका पडळकरांनी घेतली आहे. पुतळ्याच्या लोकार्पणासाठी हजारो कार्यकर्ते पुतळ्याकडे पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत.

आम्ही उद्घाटन करणारच-पडळकर

सदाभाऊ खोत यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे. सांगली जिल्ह्याशी काही संबंध नसताना शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन नको, त्यातर इतर स्थानिक नेत्यांची नावं वगळ्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच आतापर्यंत तुम्ही किती उद्घाटन केली कंटाळा आला नाही का ? असा खोच क सवाल सदाभाऊ खोत यांनी पवारांना केला आहे. आम्ही आता सिक्सच मारणार आणि उद्घाटन करणार, कितीही पोलीस बळाचा वापर केला तरी उद्घाटन होणारच अशी ठाम भूमिका गोपीचंद पडळकर यांनी घेतली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा पुतळ्याचा वाद पेटला आहे.

पडळकर काय म्हणाले?

आम्ही आमच्या परंपारिक पद्धतीने इथे आलो आहे. धनगरी नृत्यही यावेळी सादर करण्यात येणार आहे. हा आमच्यासाठी ऐतिहासिक क्षण आहे. हा लोकार्पण सोहळा आमच्या मंढपाळांच्या हस्ते पार पडणार आहे. मात्र अशा मेंढपाळांना सरकार विरोध करून पद मोठी मनं छोटी याचे दर्शन घडवत आहेत. असा हल्लाबोल गोपीचंद पडकर यांनी केला आहे. आम्ही पोलिसांना घाबरणार नाही, पोलिसांनी अडवूनही एवढे लोक याठिकाणी पोहोचले, हे उद्घाटन महाराष्ट्र बघेल असे थेट आव्हान गोपीचंद पडळकर यांनी दिलंय. ही कारस्थानं पालकमंत्री जयंत पाटील यांचं आहे. त्यांचं आयुष्य याच्यात गेलं.  त्यामुळे त्यांना उद्घाटनाला बोलवणार नाही, आमचे लोक आहेत, त्यांचं आम्ही स्वागत करतो असे म्हणाले आहेत.

Wardha | नगरविकास मंत्र्यांनी केली महामार्गाची पाहणी, समृद्धी महामार्गावर चालविली electric car

मी आज भलेही लोकसभेत गेलोय, मला पाठवण्यामध्ये अब्दुल सत्तारांचा हात, इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यानं खळबळ

आमदारांना घर देण्याऐवजी फुटपाथवर झोपणाऱ्यांना द्या, सदाभाऊंची परखड फेसबुक पोस्ट

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.