‘पेंग्विनको गोवा में, बॉलिवूड के Actors के साथ….’, भाजपा आमदाराची जीभ घसरली

भाजपा आमदाराने आज सकाळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दात पातळी सोडून टीका केली. "19 नोव्हेंबरला इंदिरा गांधी यांची जयंती, मग भारत जिंकला पाहिजे होता. मग खरी पनौती कोण?" असा सवाल त्याने विचारला.

'पेंग्विनको गोवा में, बॉलिवूड के Actors के साथ....', भाजपा आमदाराची जीभ घसरली
nitesh rane
Follow us
| Updated on: Nov 22, 2023 | 12:09 PM

मुंबई (महेश सावंत) : “आज सकाळी 10 जनपथचा नवीन कामगार, ज्याचा पगार राहुल गांधींकडून येतोय, तो नॅशनल हेराल्डची बाजू मांडताना दिसला. नॅशनल हेराल्ड काँग्रेसचे काम करते, तेच काम आता सामना करत आहे” अशी टीका भाजपा आमदार नितेश राणे यांनी केली. “19 नोव्हेंबरला इंदिरा गांधी यांची जयंती, मग भारत जिंकला पाहिजे होता. मग खरी पनौती कोण?” असा सवाल नितेश राणे यांनी विचारला. “नरेंद्र मोदी म्हणजे राष्ट्रपिता. जो आपल्या देशाचा नाही, त्या राहुल गांधीना देश प्रेम कधीच कळणार नाही” अशी टीका नितेश राणे यांनी केली.

“सकाळी 90 मारल्याचा इफेक्ट आहे. भाजपमध्ये आल्यावर कोणाची प्रॉपर्टी मोकळी झाली ते सांगावं. ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केलाय, त्यांची प्रॉपर्टी जप्त होणार” असं नितेश राणे म्हणाले. “ज्या डॉक्टर महिलेच्या घरावर दारूच्या बाटल्या मारल्या, त्यावर कारवाई करण्याची मागणी मी गृहमंत्रालयाला करणार आहे” असं नितेश राणे म्हणाले.

‘आता उद्धव ठाकरे मुल्ला झालेला आहे’

“मातोश्रीची नवीन मम्मी 10 जनपथ वर असेल तर हा राहुल गांधीची बाजू घेणारच. भाजपा सोबत ज्या शिवसेनेची युती होती, तो बाळासाहेब ठाकरे नावाचा वाघ होता. आता उद्धव ठाकरे मुल्ला झालेला आहे” अशी बोचरी टीका नितेश राणे यांनी केली आहे. आदित्य ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावरही त्यांनी टीका केली. “फिल्म फेस्टिवल आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळा बैठका ह्याच काय साम्य आहे. सिंधुदुर्ग तो बहाना है. पेंग्विनको गोवा मे बॉलिवूड के Actors के साथ नाचना है” अशा शब्दात टीका केली.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.