…तर तुझ्या मालकाला लोकांनी मातोश्री बाहेर काढून मारला असता, भाजपा आमदाराच वादग्रस्त वक्तव्य
"विनायक राऊत याने मिठाला जागावं. दीपक केसरकर जे बोलत आहेत, ते खोट असेल तर आदित्य ठाकरे व रश्मी ठाकरे यांनी आपले मोबाईल टॉवर लोकेशन व सिडीआर रिपोर्ट दाखवावेत. आम्ही किती खोटारडे आहेत हे त्यांनी सिद्ध करावे, ती त्यांची जबाबदारी आहे"
सिंधुदुर्ग (महेश सावंत) : “अमित शहा महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्यावर टीका करण्याची हिम्मत संजय राऊतने केली. 370 हटविण्याचा काय फायदा झाला? हे भांडूपमध्ये बसून समजणार नाही. त्यासाठी काश्मीरमध्ये जा. पाक व्याप्त काश्मीर आम्ही घेणारच, पण कधी घेणार? हे संजय राऊत सारख्या तीनपाट माणसाला का सांगावे?” अशी टीका भाजपा आमदार नितेश राणे यांनी केली. “अमित शाह साहेब मोदी महाराष्ट्र राज्यात येतात, ते राज्याला काही तरी देण्यासाठी. तुझ्या सारखी गद्धारी करण्यासाठी नाही. 370 ला पाठिंबा दिला नसता तर तुझ्या मालकाला लोकांनी मातोश्रीच्या बाहेर काढून मारला असता” असं वादग्रस्त वक्तव्य नितेश राणे यांनी केलं.
“जेव्हा तुझ्या ढुंगणावर पवार-ठाकरे लाथ मारतील तेव्हा आम्ही त्यांचे अभिनंदन करू. काठावर पास झालेला मतदानाची भाषा करतोय. याच दीपक केसरकरांना घेऊन तुझा मालक फिरत होता. तेव्हा तुला केसरकर वाईट दिसले नाहीत. दिशा सालीयन प्रकरणात माझ्या मुलाला वाचवा हे सांगण्यासाठी उद्धव ठाकरे नारायण राणे साहेबांना दोन वेळा फोन करतात तर मोदींजवळ गेले असतीलच” असं दावा नितेश राणे यांनी केला. “दिशा सालीयन प्रकरणात सबळ पुरावे सापडत असल्याने ठाकरे कुटुंबाची पायाखालची वाळू सरकली आहे” असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
‘देशाशी गद्धारी करावी यालाच इम्तियाज जलाल म्हणतात’
“संसद म्हणजे देशाच्या विकासाचे प्रश्न मांडायचे असतात. पिझ्झा बर्गरचे विषय नाही. विनायक राऊत हा राजकीय व्हेंटिलेटरवर आहे. विनायक राऊत नावाचा प्राणी आहे त्याला कायम स्वरूपी प्राणी संग्रहालयात पाठवणार आहोत” अशी टीका नितेश राणे यांनी केली. “देशाच्या भूमीत निवडून येऊन देशाशी गद्धारी करावी यालाच इम्तियाज जलाल म्हणतात” असं नितेश राणे म्हणाले.
‘राऊत तू पहिला शकुनी मामा बनून….’
“विनायक राऊत याने मिठाला जागावं. दीपक केसरकर जे बोलत आहेत, ते खोट असेल तर आदित्य ठाकरे व रश्मी ठाकरे यांनी आपले मोबाईल टॉवर लोकेशन व सिडीआर रिपोर्ट दाखवावेत. आम्ही किती खोटारडे आहेत हे त्यांनी सिद्ध करावे, ती त्यांची जबाबदारी आहे. राऊत तू पहिला शकुनी मामा बनून ठाकरे, पवार, पाटकर कुटुंब फोडलेस. त्याचा हिशोब दे आणि मग मोदींजवळ हिशोब माग” असं नितेश राणे म्हणाले.