‘सामना’च्या धमाका मुलाखतीपूर्वी नितेश राणेंचं ट्विट; उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर शेलक्या शब्दात टीका
शिवसेनेचे कट्टर विरोधक नितेश राणे यांनी एक ट्विट करुन उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. | Nitesh Rane
मुंबई: महाविकासआघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav Thackeray) यांची विशेष मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत शुक्रवारी सकाळी प्रसारित होणार आहे. त्यापूर्वी शिवसेनेचे कट्टर विरोधक नितेश राणे यांनी एक ट्विट करुन उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. (Nitesh Rane take a dig at CM Uddhav Thackeray )
महाविकासआघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना मुलाखत द्यायला हवी होती. ही मुलाखत कंगनाच्या कार्यालयात व्हायला पाहिजे होती आणि त्यामध्ये सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणावर चर्चा झाला पाहिजे होती. तो खरा धमाका ठरला असता. पण सरतेशेवटी मुलाखत कोणाला द्यायची हा उद्धव ठाकरे यांचा निर्णय आहे, असे नितेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. यामध्ये संजय राऊत यांच्यावर अत्यंत शेलक्या भाषेत टीका करण्यात आली आहे.
On 1 st Anniversary of His Gov.. Maha CM shud b givin a interview 2 Arnab 4 Republic while sitting in Kanganas off n discussin SSR death! That’s called a DHAMAKA! After all those were his priorities! Ghar ke paltu doggie ko toh koi bhi biscuit khela shakta hai..No fun in that!
— nitesh rane (@NiteshNRane) November 26, 2020
अनेक नाट्यमय घडामोडीनंतर सत्तेत आलेल्या ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीच्या या मुलाखतीची राजकीय वर्तुळाला उत्सुकता आहे. संजय राऊत यांनी गुरुवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या मुलाखतीचे दोन प्रोमोही शेअर केले. पहिल्या प्रोमोत जीवघेणा कोरोना ते विरोधकांचे राजकारण अशा मुद्द्यांवर प्रश्न विचारण्यात आले आहेत. या मुलाखतीच्या दुसऱ्या प्रोमोमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य, वाढीव वीजबिल यासंबंधी प्रश्न विचारले गेले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील अतिशय परखडपणे राऊतांच्या प्रश्नांची उत्तरे देताना दिसत आहेत.
महाराष्ट्रात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ले? second promo pic.twitter.com/EMKyjB3SNy
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 26, 2020
यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांवर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. गेल्या काही दिवसांपासून एक बेडूक आणि त्याची दोन पोरं डराव डराव करत आहेत. आपण गोष्टीत बेडकीने बैल पाहिला हे ऐकले असेल. पण या बेडकाच्या पिल्लांनी वाघ पाहिला. त्यानंतर ही पिल्ले आपल्या वडिलांकडे गेली. तेव्हा मोठ्या बेडकाने ओरडायचा प्रयत्न केला. पण त्याचा आवाज आता चिरका झालाय, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती.
संबंधित बातम्या:
आम्ही इंदिरा गांधींचं ऐकलं नाही, तुम्ही कोण आहात? भाजपचा संजय राऊतांवर पलटवार
Narayan Rane | दादागिरी केली तर ‘मातोश्री’च्या आतलं-बाहेरचं सगळं बाहेर काढेन : नारायण राणे
(Nitesh Rane take a dig at CM Uddhav Thackeray )